शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

हृदयी वसंत फुलताना

हृदयी वसंत फुलताना

5 mins
320


      

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे……

प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...


    किमया... शिक्षिका होती. लहान मुलांना

शिकवायची ती... मुलांची फेवरेट टिचर.

किमया रंगाने गोरी, मुलायम आणि मोठे

केस... तिला साजेशी हेऊर स्टाईल केलेली,

तिचे कोळेभोर डोळे... पण खुप बोलके...

उँच आणि अंगकाठी मध्यम... पण मनाने

तितकीच सुंदर आणि गालावर तिच्या पडणारी

खळी... सर्वांना समजुन घेणारी आणि सोबत

घेऊन चालणारी, तिला साध राहणीमानच

आवडायच... ट्रॅव्हलिंगची खुप आवड आणि

पुस्तक वाचण... तिचा छंद... खुप बडबड

करणारी... पण आवडणार्‍या व्यक्तींशी...

आणी तितकीच हळवी होती...

आईची आणि आजीची लाडकी... वडील

ती लहान असतानाच वारले होते.... आईनेच

जाॅब करून तिला शिकवल आणि मोठ केल

होत... त्यामुळे आईच तिच सर्वस्व होत...

अशी ही किमया रोज शाळेत शिकवायला

जात होती... कधीच कुणाच्या प्रेमात पडली

नव्हती... का तर तिला अजुन जसा पाहीजे

तसा मुलगा कुणी भेटला नव्हता... पण तिला

खुप सारे मित्र - मैत्रिण होते... 


    किमया शाळेत जाते... मुलांमध्ये ती

रमून जात असते... शाळेत गेल्यावर तिला

थोड मोकळ्या वातावरणात छान वाटत...

नाहीतर सकाळच्या ट्रॅफीकमुळे तिला कंटाळा

आला होता... शाळा सुटली....तिने पलकला

काॅल केला... पण मॅडमने फोनच नाही घेतला

कामात असेल म्हणून किमया स्वतःच निघाली.

ती शाळेतुन बाहेर आली. आज तिला थांबाव

लागणार होत... पलकसाठी... तिने थांबायला

सांगीतल तिथे किमया जाऊन थांबली...

चहा घ्यावा का पलीकडे जाऊन तर रस्त्याच्या

त्या बाजुला तिला तो दिसला... एका कार

मधुन उतरलेला... थ्री पीस सुट घातलेला

एक तरूण उतरला... दिसायला एकदम

हँडसम, Good looking... सेट केलेले हेअर,

उँचेपुरा, जीमला जाऊन कमावलेली बाॅडी,

त्याची पर्सनॅलिटी, त्याची शरिरयष्टी बघुन

कुणीही मुलगी सहज घायाळ होईल असा...

हाच कथेचा नायक... सावन देशमुख नाव

त्याच... त्याची कारमधुन एंट्री झाली...

इकडे त्या बाजुवरून किमया त्याला बघत

होती... त्याने handwast kel आणि तिथे

बसलेल्या एका वृध्दाला तो आपल्या हाताने

त्या स्टाॅलवरून घेऊन काहीतरी खाऊ घालत

होता... तो वृध्द व्यक्तिही आनंदाने त्याच्या

हाताने खात होता. जणु हा त्याला रोजच भेटत

असावा... ओळख असल्यासारख दोघे काही

तरी बोलत होते... तिला आर्श्चय वाटल...

की चांगला सूटाबुटाला तरूण अस वृध्दाला

भरवतो आहे... कस शक्य आहे कदाचित

प्रसिध्दीसाठी करत असावा... पण आजुबाजूला

कुणी नव्हत आणि तो मनापासुन करत होता...

तो गाडीत बसुन निघून गेला.... तरी किमया

मॅडम त्याच्यातच हरवून गेली... " अरे यार

हा तर आपल्या सारखाच आहे. कुणाच दुःख

आणि वेदना, कुणी उपाशी असलेल मला

नाही आवडत... काही म्हणा पण याच्या या

गोष्टीमुळे हा कोण आहे तो मला खुप आवडला...

नाहीतर एवढे लोक होते तिथे त्यालाच का

तस वाटल... या सगळ्या विचारांत वेळ

कधी होतो तिला कळत नाही. कीमया

अजूनही त्या दिशेकडे बघत असते. नकळत

तिच्या चेहर्‍यावर त्याच्यामुळे हास्य फुलत..


 तेवढ्यात पलकची एंट्री होते... ति तिच्याकडे

बघते... पण मॅडम त्यांच्याच धुंदीत हत्या...

पलक तिच्यासमोर चुटकी वाजवते...


" काय किमया मॅडम, कुठे हरवतात....

ये हॅलो... कुठे बघत आहेस तु... अग तिकडे

उभा असणार्‍या मनुष्याच वय तरी बघ...."


कीमयाची तंद्री भंग पावते... " काय ग

पलक, ती तिला जोरात मारते... माझ लक्ष

नाही म्हणून काहीपण बोलतेस... "

पलक - " मग सांग ना... कुणाकडे बघुन

अशी स्माईल करत होतीस... "


कीमया... - " पलक अस काहीही झालेल नाही

आणि मी कुणाकडे बघत नव्हते... तु मला

सांग आज घरी जायच का इथेच मुक्काम

करायचा.... "  


पलक - " ठीक आहे.... मला वाटल की कुणी

तुला भेटल की काय.... तुझ्यासारखाच.... "

कीमया तिला परत मारते लाडाने आणि

दोघीही हसतच घरी निघून जातात...


 आज घरी गेल्यावर रात्री किमया त्याच मुलाचा

विचार करत होती... त्याच ते रूप आणि ते

घडलेल दृश्य तिला समोर दिसत होत... ती

आज स्वतःशीच हसत होती... गाणे ऐकत

कधी झोप लागली तिलाही कळल नाही....


  दुसर्‍या दिवशी पलक किमयाची मैत्रिण

लवकर तिच्या ऑफीसच्या कामाला निघून

गेली... तर तोच काल बघीतलेला मुलगा

काही मुलांशी भांडताना तिला दिसला...

गर्दी खुप होती... पण तिने त्याला स्पष्ट

पाहिल होत. नक्की काय चाललय किमयाला

समजल नाही... पण त्या मुलाला पाहील्यावर

तिला खुप वाईट वाटल, किमयाला वाइट वाटल

की काल तर खुप चांगला माणुस वगैरे अस दाखवत होता हा मुलगा आणि आज बघा कस मुलांना मारत आहे ती मनातच बोलत होती तेवढ्यात गर्दीतील कुणीतरी म्हटल की , " बर झाल त्या मुलाने त्या टुक्कार मुलांना धडा शिकवला रोजच मुलींना छेडतात आज आतापासून त्या मुलीच्या वाटेलाही जाणार नाही " हे ऐकून मात्र तिचा गैरसमज दुर झाला. त्याला शोधत होती पण बाईकवर निघून गेलेला होता.

काही ना काही कारणाने म्हणा दोघे एकमेकांना दिसत होते पण बोलत कुणीही नव्हत पण नेहमी एकमेकांना स्माईल करत होते.


       एक दिवस सावन त्याच्या मित्राच्या सोबत मुलाला सोडायला शाळेच्या गेटजवळ गेल्यावर त्याला पलक दिसली. तिने त्याला पाहील नाही पण त्याने तिला स्पष्ट बघितल. तेव्हा माहीती पडल की ही टिचर आहे. तिला तो नेहमीच बघायचा. त्याला ती आवडली होती. तिच्या प्रेमात पडला होता. ऑफीसला उशीर झालेला सावन बाईकवरून येत असताना एका रोडसाईटला छोटी झोपडपट्टी होती तिथे एका झाडाखाली संध्याकाळी त्याला किमया दिसली.

किती सिंपल आहे पण छान आहे तिथेही ती मुलांना शिकवत होती. सावन दुरुनच बाइक थांबवून हे सगळ बघत होता. सेम ती त्याला त्याच्यासारखी दुसर्‍यांचा जास्त विचार करणारी वाटत होती. एकदम परफेक्ट आहे आपल्यासाठी म्हणून तो गालातच हसला. पण तिच लग्न झाल

असेल तर कींवा तिचा मित्र असेल तर हा विचार करून तो नाराज होत पुढे गेला. तो रोज देवाला प्रार्थना करायचा की ति मला माझ्या मिळू दे. ती दिसली की तो खुप खुश व्हायचा त्याचा दिवसच छान जायचा. इकडे किमयाही त्याच्याशी एकदा तरी बोलाव मैत्री करावी म्हणून नेहमी तिला वाटायच पण तो निघुन जायचा. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम होत इतके दिवस ते पाहत होते पण बोलत मात्र कुणीही नव्हत.


     दोन दिवस झाले. किमया सावनला दिसली नाही म्हणून तो काळजीत पडला होता.पण ती न येण्याच कारण घरी आजारी पडली होती. तो ऑफीसला निघाला. तेव्हा एक आजी वाटेत चक्कर आली म्हणुन पटक खाली बसल्या. उन्हही होत सकाळ. सावनने त्यांना पाणी प्यायला लावल. बर का विचारल पण त्याला त्या ठीक वाटत नव्हत्या. त्याच्या स्वतःच्याच गाडीत बसवून त्याने त्या आजींना हाॅस्पिटलला नेल. तिथे गेल्यावर डाॅक्टरांनी त्यांना चेक केल्यावर समजल की बीपी लो झाला होता डाॅक्टरांनी योग्य ती ट्रीटमेंट करून त्यांना काळजी घ्यायला लावली. सावननेही त्यांना काळजी घ्या आता म्हणून सांगितल त्या नको म्हणत असताना त्याने त्यांना व्यवस्थित घरी पोहचाव काळजीने त्यांना त्यांच्या घरी वरपर्यंत सोडून आला. त्याने डोअरबेल वाजवली. दरवाजा उघडला कीमयाने तिला तर सावन आणि आजीला समोर पाहून आश्चर्यच वाटल ती तशिच एटकट त्याला पाहत होती. तिला विश्वास बसत नव्हता की देवाने याला आपल्यासमोर पाठवलय. आजीने तिला म्हटल,


" अग किमया, आत तर येऊ दे आम्हांला ",

किमया भानावर आली तिने त्यांना आत बोलवल आणि पाणी दिल. आजीने किमयाच्या चेहर्‍यावर पडलेले प्रश्न बघुन सगळ जे घडल ते सांगितल .

आजीने किमयाची ही ओळख करुन दिली. तिने त्याचे आभार मानले. आजीने म्हटल की मी

आराम करते तु सावनला थंड काहीतरु प्यायला दे ति आत गेली. त्याच्यासाठी ज्युस घेउन आली. त्याने हिंमत करुन तिला म्हटल, " तुम्ही खुप चांगल काम करता खरच ग्रेट आहात तुम्ही ?"


" मी एवढ काही केल नाही ओ... ते मुलांची

शिकवणी घेत असते त्यांची परिस्थिती नाही आणि दहावीच वर्ष आहे म्हणून "


  

    तिनेही त्याने केलेल्या कामांच कौतुक केल. त्यालाही समजल की हीचही आपल्याकडे लक्ष

असत. तिथुन त्यांचा प्रेमाचा प्रवास सुरू होतो.

दोघांच्या भेटी वाढत होत्या. एकमेकांना समजुन घेण, भेटण- बोलण सुरु होत. त्यांची पहीली भेट होती. सावन चांगल गातो हे किमयाला माहीती होत. तिचा वाढदीवस होता म्हणून दोघेच बाहेर फिरायला चालले होते तिथे गेल्यावर किमया सावनला तिच्यासाठी दोन ओळी तरी गाण म्हण म्हणते... तो हो म्हणतो नि गाण सुरू करतो...

आतापर्यंत आपल्या मनातील भावना व्यक्त न

करणार्‍या किमयाला या गाण्यातुन त्याच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहचल्या.


"हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे……

प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे "


     त्याच गाण संपल तिला खुप आवडल.

इतक्या दिवस तिच्या उत्तराची वाट पाहत असलेल्या सावनला आज ती तिच्या मनातल्या भावना सांगुन टाकते. त्याला खुप आनंद होतो. दोघेही क्षणभर एकमेकांच्या मिठीत विसावतात.


           

           समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance