Hrucha Nilima

Romance

3  

Hrucha Nilima

Romance

जरा विसावू ह्या वळणावर

जरा विसावू ह्या वळणावर

6 mins
762


    शारिवाचा आज वाढदिवस होता; परंतु नेहमीप्रमाणे काहीच न बोलता ती निमूटपणे ऑफिसला जायची तयारी करत होती. फक्त तिच्या चुलत भावाचा (पश्मिनचा) मेल आला एवढंच. अचानक तिच्या हातात ड्राॅवरमधून एक फोटो आला आणि क्षणभर तिला दोन वर्षांपूर्वीचा भूतकाळ डोळ्यांसमोर आला. क्षणभर डोळ्यात पाणी तरळले पण नेहमी give up करण्याच्या स्वभावाने तिला हायसे वाटले. क्षणाचाही विलंब न करता ती ऑफिसला जायला निघाली. एका टाॅप आयटी कंपनीची head employee असून तिच्या कोणत्याही प्रकारचा शिष्टपणा नव्हता; म्हणून ती त्यांच्या ऑफिसमध्ये खूप फेमस होती. ती ऑफिसमधे पोचल्यावर शिपायाने boss च्या केबिनमध्ये जाण्यास सांगितले त्यामुळे ती जरा चिंताग्रस्त झाली. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपले काय चुकले? आता काय होणार? नोकरी नको जायला असे ना ना विचार मनात येत असताना bossचं केबिन कधी आले हे तिला कळलेच नाही. तिने दरवाज्यावर knok केले.


बाॅस : अरे, मिस. शारिवा हळदणकर ! come in... come in. 

शारिवा : सर, मी कांबळी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या memo ची फाईल कम्प्लिट केली. त्याची साॅफ्ट काॅपी पण तुम्हाला मेल केली.

बाॅस : जस्ट रिलॅक्स मॅडम! मला माहित आहे की तुम्ही तुमच्या कामात किती चोख आहात आणि किती प्रामाणिक. मी हे सांगायला तुम्हाला बोलायला आलो की तुमचे promotion झाले आहे पण तुम्हाला पुण्याला बदली घ्यावी लागेल.

शारिवा : थॅन्क यू सो मच सर. माझं स्वप्न पूर्ण झालंय एका प्रकारे. मी तयार आहे जायला.

बाॅस : By the way, Happy Birthday. 

शारिवा : Thank you sir.


सगळ्यांच्या शुभेच्छा आणि केलेल्या कामाची पोचपावती घेऊन शारिवा घरी निघाली पण दोन वर्ष मनात जे साठवून ठेवलं होतं ते बंड करू पाहात होती. कशीतरी ती घरी पोचते आणि न राहून ड्राॅवरमधून फोटो काढून रडू लागते. तो फोटो तिच्यासाठी खूप special होता. तिचा आणि त्याचा!! Engineering college मध्ये असताना एक दिवस त्यांची एकमेकांना झालेली टक्कर सगळ्यांच्या हसण्याचं कारण झालेली. Sorry my mistake म्हणून शारिवा निघून गेली, पण एखादी मुलगी माफी मागते हे मात्र त्याला पचनी पडले नाही. नंतर त्या महाभागाला कळले की ती आय. टी. ब्रांचची आहे वरून टाॅपर. मग काय एकाच branch चे फक्त ती दोन वर्षे junior. साहेबांना तिच्याशी मैत्री करायची होती. सारखे तिला notes देणे, तिच्या अभ्यासात मदत करणे हे चालूच. त्यात ती एक कवयित्री असल्याने तिच्याविषयी त्याच्या मनात प्रेमभावना आहेत ते कसे सांगणार बिचार्‍याला कळेच ना. तसा तो पण काही कमी नव्हता. अभ्यासासोबत संगीत विशारदची तयारी करत होता.


तिच्याही मनात त्याच्याविषयी तीच भावना होती. पण पहले आप, पहले आपच्या नादात दोघेही अबोल होते. बोलताना त्याचं नाव सांगितलंच नाही. त्याचं नाव भार्गव देसाई! आप्पाची टपरी म्हणून एका ठिकाणी त्यांचा आणि त्यांच्या इतर group members चा official अड्डा होता. एक दिवस भार्गव अचानक सर्वांसमोर गुडघ्यावर बसून तिला म्हणतो, "तुला पाहता पहिल्यांदा मी बावरलो आस तुझ्या भेटीची घेऊन सावरलो तुझ्या मनातील प्रेमभाव येऊ दे ओठावर क्षणभर का होईना जरा विसावू ह्या वळणावर" 

शारिवाला काही कळेना. तिनेही नकळत त्याच्या प्रेमाला होकार दिला. असेच दिवस जात होते; परंतु कितीही प्रेम असले तरी त्यांनी अभ्यास नेटाने केला. नाही नाही म्हणत त्याचं M.E. आणि तिचं B.E. complete झाले. वेगवेगळ्या का असेना पण नामवंत कंपनीमध्ये कामाला लागले. तसे त्यांनी त्यांच्या घरच्यांना त्यांच्याविषयी सांगितले. परंतु तो एका गर्भश्रीमंत घरातला आणि ती मध्यमवर्गीय म्हणून त्यांच्या घरातून ह्या नात्याला कुणीच स्वीकारले नव्हते. भार्गवने आपण वेगळा संसार थाटू असे सुचवले परंतु ती ह्या गोष्टीच्या पुरेपूर विरोधी होती. फक्त शारिवाचा चुलत भाऊ त्यांच्या साथीला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तिने तिचं सारं लक्ष कामात वेधलं आणि कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरात तिला नेहमी गृहीत धरले जाऊ लागले. ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून तिने बदलीला होकार दिला.


तेवढ्यात आईचा आवाज येतो, "अगं काय करतेस इतका वेळ आतमध्ये? जरा बाहेर ये."

"हो आई!" शारिवा उत्तरली. हातातील फोटो ठेवून ती बाहेर जाते.

"अगं तुझ्यासाठी एक स्थळ आलंय." आई बोलली.

तिचा विषय कापत शारिवा बोलली, "आई थांब माझं promotion झालंय आणि बदलीसुध्दा, तर माझा लग्नाचा विचार नाही. मी उद्याच तिथे join होईन. मी तुमचं सारं मान्य केलं आता मला माझ्यासाठी जगायचे आहे."

तिचा हा पावित्रा बघून सारे अवाक होऊन बघत होते. शेवटी ती पुण्यात ऑफिसला गेली. काही दिवसांनी ती पुण्यात शिफ्ट झाली. तिचे काम बघून बाॅसच काय इतर सहकारी पण खूप खुश होते. तिथल्या सारा नावाच्या मुलीशी तिची छान गट्टी जमली होती. असेच चार महिने झाले. मार्च ending मुळे ऑफिसात खूप काम होते आणि त्यात inspection कमिटी येणार असल्याने branch manager असल्याने शारिवावर कामाची सारी जबाबदारी वाढली होती. ज्या दिवशी कमिटी आली तेव्हा शारिवाने तिची जबाबदारी चोख पार पाडली.


अचानक आईची तब्येत बरी नाही कळल्याने ती काही दिवसांसाठी घरी तातडीने यायला निघाली. पूर्ण प्रवासात ती आईची चिंता करत होती. आपल्या बदलीच्या निर्णयामुळे असे झाले तर नसेल ना? की आपण अजूनही भार्गवला विसरलो नाही म्हणून? असे नाना विचार तिच्या मनात येत होते. घरी गेल्यावर बघते तर काय तिची आई एकदम ठणठणीत होती आणि घरी पाहुणे आले होते हे जाणवले पण कुणाचा चेहरा दिसला नाही.

तिकडून पाहुण्यांचे शब्द तिच्या कानावर पडले, "तुमची लेक आम्हाला पसंत आहे; पण एकदा तिला विचारले तर बरे होईल की आमचा मुलगा पसंत आहे की नाही." घरात एकटीच मुलगी असल्याने तिच्याविषयी बोलत आहेत हे तिच्या लक्षात आले. जरा गुश्यातच पाहुण्यांसमोर जाते आणि बघते तर काय समोर भार्गवचे आई बाबा, भार्गव आणि त्याची धाकटी बहीण ओजस्वी होती. शारिवाला काय बोलावे हेच कळत नव्हते. 

तेवढ्यात ओजस्वी तिच्यापाशी येऊन बोलली, "शर्वी, कसा आहे माझा भाऊ? लग्न करशील त्याच्याशी?"

लगेच भार्गवची आई बोलली, "ओजू आता पुरे, आता तिला फक्त वहिनी हाक मारायची."

"एक मिनिट, काय चाललंय काय आई हे, बोला ना बाबा?" शारिवा बोलली.

पण भार्गवला दोन वर्षांनी बघून तिच्या डोळ्यात आलेले अश्रू स्पष्ट दिसत होते. तेवढ्यात भार्गवची आई तिच्याजवळ आली आणि प्रेमाने डोक्यावर हात फिरवून म्हणाली, "बेटा मला माफ कर. मला वाटायचे की मी माझ्या लेकाला चांगली बायको आणेन. त्याच्या तोडीस तोड. पण माझी अन् ह्यांची कल्पना चुकीची ठरली. आम्ही पैशाला महत्त्व देत होतो. पण तुमच्या प्रेमापुढे सारे फिके पडले. तुला हवं तर तू पळून माझ्या मुलाशी लग्न केलं असतं; पण तुला त्यापेक्षा जास्त कुटुंबाची प्रतिष्ठा महत्त्वाची होती. माझ्या घरची सून होशील?"  


ह्या बोलण्याने ती एकदम निःशब्द झाली होती आणि समोर भार्गवचा निरागस चेहरा. बराच वेळ शांत असलेला भार्गव बोलला, "हरकत नसेल तर मी एकदा शारिवाशी एकट्यात बोलू का?"

"हो ! शरू जा दोघेही गच्चीवर." शारिवाचे बाबा बोलले.

काहीच न बोलता शारिवा आणि भार्गव गच्चीवर गेले. खूप वेळाने तिचा संयम सुटला आणि भार्गवला मिठीत घेऊन ती मनसोक्त रडली.

भार्गव : वेडाबाई आता रडायला काय झालं? तुझ्या हट्टापायी मी तुला पळवून जाऊन लग्न केलं नाही. माझी सगळी स्वप्न धुळीस गेली. मी तुझ्यापेक्षा जास्त रडायला पाहिजे. अन् खोटंखोटंच भोकाड पसरू लागला.

शारिवा : मी बोलायची की तू डोक्यावर पडला आहेस हे आज सिद्ध झाले. अशावेळी पण तुला मस्करी सुचते.

भार्गव : बोला बोला branch manager आता आयुष्यभर तुमचाच हुकूम ऐकायचाय. जरा प्रश्नार्थक नजरेने ती त्याच्याकडे बघू लागली. तो हसून बोलला, "हे बघ शर्वी लोकांना म्हणून आपण वेगळे झालेलो पण प्रेम संपलं नव्हतं. वरून आमचे सालेसाहब, तुझा पश्मिन दादा होताच की."

शारिवा : हे सगळं खोटं आहे ना? माझा भ्रम?

भार्गव : ओ कवयित्री! भानावर या. हे खरं आहे. स्वप्नातून बाहेर या. तशी तिने त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली, पण आता तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते.

तेव्हा ओजस्वी अचानक आली आणि म्हटली, "पुरे आता ही गच्ची आहे. सगळे खोळंबले. दादाला पटकन घेऊन ये. वहिनी!" भार्गवने तिच्या डोक्यावर टपली मारली. तशी ती खाली उतरून गेली अन् मागोमाग दोघेही.

भार्गव : आम्हाला हे लग्न मान्य आहे.

भार्गवची आई : बस शारिवा! बाळ मला खरंच माफ कर गं.

शारिवा : आई आता मी तुमची लेक होणार ना. आईने लेकीची माफी मागायची नसते.

भार्गव : आह हा! क्या सीन है! आँखे भर आई!! त्याच्या ह्या वाक्यानंतर दोघीही त्याच्याकडे रोखून बघू लागल्या.

भार्गवची आई : ह्याचा हा filmy पणा जरा कमी कर गं! लगेच पश्मिन येतो आणि शारिवाने जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. पश्मिन : सगळं okay झालं वाटतं.

भार्गव : हो दादा !! फक्त तुझ्यामुळेच हे शक्य झालं. thank you so much!

पश्मिन : मी एकटा नाही ही आपली चिमणी ओजू आहे ना तिची पण खूप मदत केली.

ओजस्वी : But दादा प्लान तुझाच होता ना!

पश्मिन : आता सगळं सुरळीत झालं तर जावईबापू तुमच्या आवाजात एखादं गाणं झालंच पाहिजे.

भार्गव : मी शारिवाचे आवडते गाणे गातो. पण शारिवा तू पण मला साथ दे. मग दोघेही गाऊ लागतात. 


    भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर।

    जरा विसावू ह्या वळणावर, ह्या वळणावर।।


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance