Sanjana Kamat

Classics

2  

Sanjana Kamat

Classics

जुन्या शाळेतील मैत्रिणीची भेट

जुन्या शाळेतील मैत्रिणीची भेट

2 mins
323


      मुलींची लग्न झाली की त्या कुठल्या कुठे संसाराला लागतात. त्यामुळे जुन्या शाळेतील मित्र मैत्रिणींना भेटण्याचा माझा अनुभव फारच कमी आहे. सध्या तीनच मैत्रिणी संपर्कात असून आठवण आली की विडियो काॅल करून मैफिल रंगवतो.

    तिसरी ते सातवीची बाल मैत्रीण, स्वःता पहिला नंबर काढायची व मला अभ्यासात प्रोत्साहन देऊन सातवी ते दहावीची स्काॅलरशिप मिळवून देणारी निला खवळे ही आहे. तशी मीच कोणात सहज मिसळत नव्हते त्यामुळे माझ्या मैत्रिणी ही कमीच आहेत.

   पंचवीस वर्षा नंतर माझ्या भावाच्या गेट टू गेदर मुळे भेट झाली.ती सध्या डोंबिवलीत राहते व डाॅक्टरच्या दवाखान्यात क्लार्कचे काम करते. मी तिच्या घरी जावून भेटले,तिचा नवरा व मुलगी तसेच तिची माहेरची ही जवळच राहत होते. सर्वांच्या भेटीचा आनंद कायम स्मरणात राहिल असा होता.

    दुसरी बाल मैत्रिण दया साळगावकर आता हाॅस्पिटल मधे परिचारिकांची मुख्य अधिकारी म्हणून काम करते.

   तिसरी बाल मैत्रिण विजया दळवी, हिच्या मुळे मी ५ वर्ष बाल शिशु शिक्षिकाचे काम केले.घाटकोपरला एका खाडीच्या जागेवर शाळा उभारली आता सरकार मान्यता मिळाली पण मुख्यधापिकेने नातेवाईकांची नावे शिक्षिका म्हणून दाखवली व जिने कष्ट केले तिचे नाव शिपाईत टाकले व काढून टाकले.शाळेतील राजकारणी कारभार पाहून मी थक्कच झाले,अर्धा पगार देण्याचे व व्यभिचारी पर्यंत सारे ऐकले नंतर वाशीला ८वर्षे स्पेशल शिक्षिका म्हणून अंध-मुक बहिरे मुलाना कलाकौशल्य शिकवण्याचे काम केले. माझ्या नवऱ्याने नोकरी सोडण्यास सांगितले व मी नोकरी सोडली त्या नंतर ती ही शाळा सरकार मान्य झाली.

    एकदा घाटकोपर शाळेतील मैत्रिणीने दळवीच्या घरी भेटलो तेव्हा शिक्षिका वर्षा चोपकर हिच्या कडून कथा कविता समुहा बाबत माहिती मिळाली व माझ्या धुळ खात बसलेल्या कविताना १५०प्रमाणपत्र मिळाले.व काव्यरत्न पुरस्कार ही मिळवू दिले.

     माझ्या सारखे सर्वांचे नशीब चांगले नसते.माझ्या मैत्रिणीच्या भावाला डिप्रेशन मध्ये नेणारे ही मित्रच होते. मैत्री ही कधी कडू तर कधी गोड अनुभव देणारी असते. खरी मैत्री मिळणे व टिकवणे हे तितकेच महत्वाचे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics