Prem Gaikwad

Abstract Tragedy

4.0  

Prem Gaikwad

Abstract Tragedy

कहाणी..

कहाणी..

3 mins
480


विठ्ठलरावांना आजोबा झाल्याची नुसती बातमी समजली नी गगणात मावेनासा आनंद झाला.अगदी आनंदाने नाचायला च लागले. ते म्हणाले सुध्दा , आजोबा होण्याचा आनंद, पिता होण्याच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो.आणि ते मनात म्हणाले सुध्दा' आरे बाळा तुला आज जेवढा आनंद होतोय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आनंद तूझ्या जन्माच्या वेळी आम्हाला झाला होता... आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.त्यानी लगेच नाक आणि डोळे पुसले...

    ते स्वतःलाच म्हणाले ,खरंच बाप होण्याचा आनंद किती मोठा असतो !.आईबाप आपल्या मुलांवर किती लाड करतात ! अंजारणे , गोंजारणे,अंगा खांद्यावर घेऊन लाड करणे,खाऊ पिऊ घालून मोठं करणं... केले तितकें कमीच.. ! केवढा लाड.. !सारं काही करुन लहाणाचं मोठं केलं , शिक्षण शिकवलं ,कर्ज काढून, मोलमजुरी करून शिक्षणाचा खर्च केला आणि मोठ्या जिद्दीने मुलाला मोठा साहेब,अधीकारी केलं.गावात नावं झालं . लोक व्वा ! व्वा ! करायला लागले . वाटलं जन्माचे चिझ झाले.. पण घडले ते निराळेच.. मुलगा साहेब होऊन मोठ्या शहरात गेला.. आई-वडील थकलेले, म्हातारे गावाकडचे राहिले.. तिकडे त्या साहेबांनी दुसऱ्या जातीची ,मोठी नौकरी असलेली बायको करुन घेतली . आई-बापाला कधीच काही विचारलं नाही..

   आई आजारी पडली.जवळ पैसा नाही पोराचा पत्ता नाही.अन्नपाणी बंद झालं नी माझा बापू, माझ्या वाघा, माझ्या सोन्या, माझ्या वासरा, माझ्या राजा, माझ्या पिल्ला म्हणत आईने जीव सोडला..! लोकांनी मुलाला फोन करून कळवले.अखेरचं तोंड पहायला, अंत्यविधीस ही मुलगा येवू शकला नाही.. !

  विठ्ठलरावांचं सारं सरलं.. !पोरगं विचारायला तयार नाही.त्यांच कोणी उरलं नव्हतं . जगावं का मरावं तेच कळत नव्हतं.. गावात पारावर बसून लोकांनी दिलेले शिळे ,पाते खाऊन कसेतरी दिवस ते काढीत होते.. ओट्यावरुन पडून कमरेच हाड मोडले होते.. दवाखान्यात न्यायला कोणी जवळचं नव्हतं.जवळ पैसे नव्हते.तोंडात दातं न्हवते, डोळ्याला दिसत नव्हतं, कानाला ऐकू येत नव्हते . वाटतं होतं पटकन मरण यावे.पण काय भोग होते कुणास ठाऊक ? अजून किती हाल व्हायचे, किती भोगायचे देव जाणे !.. शेवटी गावकऱ्यांनी त्यांना एका वृध्दाश्रमात नेऊन ठेवलं.तिथं जाऊन आठवडा झाला होता.. त्या वृद्धाश्रमात रोज एक अधिकारी यायचा त्याला ना आई ना वडील...तो अधीकारी वृध्दाश्रमातील सर्व वृध्दांना दररोज न चुकता, बिस्कीट,लाडू, चिवडा,शिरा, फळं काही ना काही खाऊ घालायचा. सर्वांसोबत रमायचा..

    विठ्ठलरावांच्या जवळ बसून तो अधीकारी रात्रीच्या वेळी मोबाईल वरील व्हाट्सअप, फेसबुक, यूट्यूब,दाखवत,ऐकवत होते.अचाणक व्हाट्सअप वरील स्टेटस,डिपी दाखवताना एक स्टेटस दाखवून ते म्हणाले की आजच आमच्या साहेबांना मुलगा झाला, त्यांनी ऑफिसमध्ये पार्टी दिली.असं म्हणून ते सर्व मोबाईल मधील फोटो,बाळ, पार्टी सर्व दाखवू लागले.विठ्ठलरावांनी सहज विचारलं तुमच्या साहेबांचं नाव काय ? तो अधीकारी म्हणाला, विजयकुमार सुर्यवंशी ! आणि हा विजयकुमार दुसरा तिसरा कोणी नसून विठ्ठलरावांचा मुलगा होता..! 

    जो शिकून मोठा अधिकारी झाला,आई वारली तरी आईला पाहीले नाही की कधी बापाला विचारले नाही.. विठ्ठलरावांना कळून चुकले की हा अधिकार विजयकुमार म्हणजे आपलाच मुलगा...!ते एक शब्दही बोलले नाहीत . ...मनात मात्र म्हणाले..बाप होण्याचा आनंद काही वेगळाच असतो.. त्यापेक्षा कितीतरी मोठा आनंद आजोबा होण्याचा..आज ह्या विजयला केवढा आनंद झाला..! त्यानं किती मोठी पार्टी दिली, मोबाईल वर फोटो टाकले, त्यांच्या पेक्षा मोठा आनंद आम्हाला झाला होता त्याच्या जन्माच्या वेळी..!आज विजयची आई असती तर तिलाही किती मोठा आनंद झाला असता..

   काय लिला आहे देवाची !या पेक्षा मरण बरे ! कशाला ठेवले असेल देवाने, देव मरण का देत नसेल ? अशी औलाद जन्माला न आलेली बरी...आज मला वाटतंय मुला पेक्षा मुलगी झाली असती तर बरं झालं असतं.. निदान या वृध्दाश्रमात तरी राहायची वेळ आली नसती.मेल्यावर तरी तिच्या डोळ्यात दोन थेंब आले असते..नी धन्य झालो असतो..!

   शेवटी ते स्वतःला च म्हणाले बापू विजय आमच्या जन्माची नी मरणाची कहाणी वाईटच आहे पण तुझी कहाणी या हुनही वाईट असेल... तुझ्या जन्माच्या वेळी सुद्धा तुझ्या आईने गावभर साखर वाटली होती... अचानक हुंदका आला...नाका तोंडातून रक्त आले ते जमिनीवर कोसळले .श्वास थांबला.. प्राण ज्योत मालवली...!

विठ्ठला...! हे विठ्ठला...!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract