SAMPADA DESHPANDE

Thriller

2.0  

SAMPADA DESHPANDE

Thriller

खूनी

खूनी

3 mins
1.3K


शहरात खूनांचे सत्र !............. , पोलीस अपयशी ! ....., अशा बातम्यांनी वर्तमानपत्रे, वृत्त-वाहिन्या ओसंडून वहात होत्या. शहरात काही महिन्यांपासून खूनांचे सत्र चालू होते. खूनी सफाईदारपणे खून करून जात असे,कोणताही सुगावा न सोडता! या सर्व गोष्टींमुळे पोलीस डिपार्टमेंट मात्र हैराण झाले होते. वरिष्ठ, मीडिया आणि जनता या सर्वांनाच त्यांना सामोरे जावे लागत होते. 

या खूनसत्रातून पोलिसही सुटले नव्हते. सिनियर इन्स्पेक्टर राजे यांच्या पत्नीचा निर्घृण खून झाला होता. राजे ड्युटीवर होते. त्यांची पत्नी घरी पार्टीची तयारी करत होती. आज त्यांच्या लग्नाचा विसावा वाढदिवस होता. राजेंची पत्नी मीरा त्यांचा आवडता केक करत होती. अचानक तिला घरात हालचाल जाणवली. तिला वाटले कि आपले पतीराज सरप्राईझ देण्यासाठी म्हणून लवकर आले आहेत. ती आनंदात होती, तोच आनंद तिच्या आयुष्यात शेवटचा आनंद ठरला. मागून येऊन कुणीतरी तिच्या गळ्यावरून सुरा फिरवला. राजे घरी आले तेंव्हा आपल्या पत्नीचे प्रेत पाहून त्यांनी टाहो फोडला. 

पोलीस कॉलनीमध्ये खून झाल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. न्युजवाल्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले. "जे स्वतःच्या घरातल्या माणसांना सुरक्षित ठेऊ शकत नाहीत ते जनतेचे काय रक्षण करणार! " अशा बातम्या झळकू लागल्या. इतर खूनांप्रमाणेच याही खूनाची कसून चौकशी झाली. खूनाच्या वेळचे CCTV फुटेजसुद्धा डिलिट केलेले होते. कोणीही संशयित व्यक्तीला येता-जाताना पहिले नव्हते. खूनाच्या जागी एकही हाताचा ठसा किंवा कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. राजे या दुःखातून सावरले व कामावर हजर झाले. त्यांनी काही झाले तरी या खून्याला शोधून काढायचाच असा निश्चय केला होता. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी म्हणून CID ऑफिसर अवधूत आला होता. अवधूत आणि राजे दोघे झालेल्या एकूण दहा खुनाच्या फाईल घेऊन बसले. एक एक करून सामान मुद्दे शोधू लागले. बळी पडलेल्या सर्व स्त्रियांचे पतीशी आणि कुटुंबियांशी संबंध अतिशय चांगले , खेळीमेळीचे होते. त्यांना कोणीही शत्रू नव्हता. एकूण परिस्थिती पहाता त्यांना मारण्याचे काहीच ठळक कारण समोर येत नव्हते.       

खूप रात्र झाल्यावर राजे निघून गेले. अवधूत तिथेच बसला होता हे पाहून हवालदार तिकडे आले. अवधूतला म्हणाले," साहेब ! मला जरा बोलायचंय पण इकडे नको." मग दोघे समोरच असलेल्या चहाच्या टपरीवर गेले. बाजूला बसल्यावर हवालदार म्हणाले," साहेब, मी राजे साहेबांबरोबर या खुनांच्या तपासासाठी चौकशीसाठी हिंडत होतो. ज्या बायकांचे खून झाले त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्यावर संशय होता. बाहेरख्यालीपणाचा !" अवधूत दचकला तो म्हणाला," राजेसारांना ही गोष्ट सांगितलीत का ?" हवालदार म्हणाले," हो सांगितली त्यांनी त्यादृष्टीने तपाससुद्धा  केला. काहीच उपयोग झाला नाही. हे सगळं नीट ऐकून अवधूत अचानक म्हणाला," म्हणजे राजे सरांना त्यांच्या पत्नीवर संशय होता का ?" 

इतक्यात अजून एक खून झाल्याचा फोन आला, कधी नव्हे तो खुन्याने पुरावा मागे सोडला होता. खुन्याचा पेन मृत स्त्रीच्या प्रेताजवळ पडला होता. ती स्त्री गरीब घरातली अशिक्षित होती तिच्याकडे पेन असणे शक्यच नव्हते. राजे तिकडे पाहोचले होते. त्या स्त्रीचा नवरा पूर्ण नशेत तिथे डोकं धरून बसला होता. राजे घरात जाऊन पाहणी करत होते. इतक्यात अवधूत आला," यावेळीही काही पुरावा नाही." राजे वैतागून म्हणाले. "माझ्या घरची कामवाली आहे ही. " पण सर मला तर कळले कि खुन्याचा पेन पडलाय प्रेताजवळ. तिच्या नवऱ्याने पहिला." मान हलवत राजे म्हणाले," तो पूर्ण नशेत आहे. मी कसून शोधलं तिकडे काहीच नव्हतं. वाटल्यास जाऊन पहा." अवधूतलाही काहीच सापडलं नाही. इतर खुनांप्रमाणेच ह्याही खुनाचे गूढ उकलले नाही.

आपल्या चुकून प्रेताजवळ पडलेल्या आवडत्या पेनावरून राजे रक्त साफ करत होते. यावेळीही त्यांनी एका बाहेरख्याली पापी स्त्रीला जगातून संपवले होते.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller