Arun V Deshpande

Others

3.0  

Arun V Deshpande

Others

कथा- एक सुरुवात नव्याने

कथा- एक सुरुवात नव्याने

3 mins
1.5K



गजाभाऊ- ऐकलं का मंगलाज्जी

भाऊसाहेबांकडे जाऊन येतो,

बीपी शून्य झालय म्हणे त्याचं 

दोन दिवस झालेत , पण 

अजून नॉर्मलला येईना..


मंगल आज्जी- 

अग बाई हो का,...

तरीच मीनावाहिनी 2 दिवस झाले

ओंनलाईन दिसत नाहीयेत..


गजाभाऊ-

हे इंटरनेट म्हणजे मोठ्यांची खेळणी,

जो तो आपल्या हातात मोबाईल घेऊन

बसला की बस,


मंगलाज्जी-

नाही तर काय..

समोर बसलेल्या माणसाशी बोलायच पण सुचत नाहीये.

मी म्हणते, मोबाईलपायी लोक आपलं हे जग सोडून ,

दुसऱ्या जगात जगायचं शिकलेत,


गजाभाऊ-

तुम्ही काही कमी नाहीत , टी व्ही समोर चालू आसतो 

आणि तुम्ही आपलं , हातातला मोबाईल कानाला लावून

माहेरच्या मंडळीशी गप्पा मारण्यात गुंग होऊन जाता , 

त्याच काय ?


मंगलाज्जी-

सगळे काही तुमच्या सारखे नसतात,

कशाची म्हणून आवड नाही,, तुमची आवड फक्त एकच -

दुसऱ्याला आवडीने नाव ठेवणे ते ही अगदी मनातून .


गजाभाऊ-

मंडळी -आपली जुगलबंदी पुढच्या भागात पुन्हा सुरु ठेवू..

आज आता भाऊ साहेबांना बघून येउत.


मंगलाज्जी-

मला नव्हती बरं हौस, असा उगीच वाद करण्याची, 

पण, तुमच्या संगतीत लागला हा 'गुण ",


गजाभाऊ-  

रिटायर झालेल्या हिरो नवऱ्याचा- झिरो नवरा " करण्याचा

कार्यक्रम - तुम्ही फार मन लावून करताय बरं का !

 ,

मंगलाज्जी -

तसे करते म्हणूनच बरी गत आहे माझी ,


गजाभाऊ - 

सध्या एक बदल मात्र झालाय आपल्यात , जाणवतंय का तुम्हाला काही ?


मंगलाज्जी -

मला तर बाई काही फरक नाही पडला , 

काल जसे होतात तुम्ही ,तसेच आता ही आहात ..

त्यात काडीमात्र बदल नाही .


गजाभाऊ -

बोला बोला , एकदा कानफाट्या नाव पडल की ,पडल .


मंगलाज्जी -

ते जाऊ द्या ,

तुम्ही ते छान बदल झाला म्हणालात , ते सांगा ..


गजाभाऊ-

अहो - आपण नातवंडांच्या समोर ,सगळ्यांच्या समोर 

एकमेकांना कधी नव्हे ते ..नावाने आवाज देतोय चक्क ..


मंगलाज्जी -

हे काय अजून नवीन ?


गजाभाऊ-

तुम्हीच बघा ना - मी आवाज देतो आवाज - अहो मंगलआज्जी ..किती छान -

आणि 

तुमचा तो ओरडून / (सोरी ..) आवाज देणे -

अहो -गजाभाऊ -आबा , ऐकता का जरा ..


मंगलाज्जी-

काय हो ? एक विचारू का ?

अचानक इतका गोड स्वर कसा लागलाय आज ?


गजाभाऊ -

तुमच्या आवडत्या सिरीयलचा एपिसोड मधलं गोड बोलणारे सिनियर जोडपे पाहून

 मला पण स्फूर्ती आली ,

आणि ठरवल ,

तुमच्याशी सेम टू- सेम गोडी गुलाबीन राहायचं आणि वागायचं आता या पुढे .


मंगलाज्जी -

अहो महराज - या गोष्टी मनातून याव्या लागतात , असे कुणाच पाहून नसते जमत .

कॉपी ला ओरीजनल ची कधीच सर येत नसते हो आबा .


 गजाभाऊ -

बघा तर खर , बोलल्याप्रमाणे आम्ही वागू की नाही ,जरा दम काढा .


मंगलाआज्जी- 

खरं म्हणजे या सगळ्या सिरीयल तुम्हाला अगदी मनात्तून पहायची इच्छा असते 

, पण,

बायकोच्या आवडीला नाव ठेवल्याशिवाय जसा घास उतरत नाही ना ,

,तसेच ती पाहते त्या सगळ्या सिरीयलला नाव ठेवीत 

प्रत्येक सिरीयल आणि एपिसोड पाहता बसता तुम्ही 


गजाभाऊ -

अहो आता उशिरा का होईना हृदय परिवर्तन होतंय तर होऊ द्या की .


मंगलाज्जी -

अग बाई, तुम्ही कधी पासून बायकोचा

विचार करायला लागले ?

 पण मी कशी विसरेन हो, तुमचे टोमणे , 


गजाभाऊ -

जाउद्या कुठ आमचं बोलन मनाला लावून घेताय मंडळी ? 


मंगलाज्जी -

बोलायचं आणि वर पुन्हा म्हणयच ,विसरून जा ..


गजाभाऊ -

खरे सांगतो तुम्हाला मंडळी , विस्वास ठेवा .

अलीकडे आराम करीत पडलो की ,सारखं 

झालेल्या ,आणि केलेल्या चुका आठवतात ,


मग - पश्चातापाचे हुंदके आतल्या आत गिळून टाकीत असतो.

या आधी भले ही ,आमचा सूर विसंवादी होता ,पण तुम्ही मात्र 

तुमचा स्वर कधी बेसूर होऊ दिला नाहीत ,याची जाणीव आता होते .


मंगल्ज्जी -

काय हो, असे काय बोलत आहात , 

ठीक आहे न तबियत ,?

की काही होतोय त्रास ? मोकळेपणाने सांगा .


आता या दिवसात आमची काळजी वाढवून त्रास देऊ नका.

चला बरं आपण जाऊन येऊ या ..भाऊसाहेबांना बघून येऊ ..


गजाभाऊ -

खरचं -आम्ही नव्याने सुरुवात करतोय ,संवादाची ..


मंगलाज्जी -

नका काळजी करू , मी देईन प्रतिसाद तुम्हाला 


Rate this content
Log in