Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

लाॅक डाऊन नंतरचा दुसरा दिवस

लाॅक डाऊन नंतरचा दुसरा दिवस

1 min
310


मी आरोग्य खात्यात काम करीत असल्याने मला घरात राहणे शक्यच नव्हते मी रेगुलर कामावरच जात आहे त्यामुळे घरात कसा टाईमपास केला हे सांगण्यापेक्षा बाहेर काय परिस्थिती आहे हे मी छान सांगू शकते


बेस्ट वाल्यांकडून आमची छान सोय झालेली आहे त्यांच्या बसेस चालू आहे फक्त ज्या बस मध्ये खचाखच ट्रिपल लाईन लावून उभे असायचे त्या बसमध्ये आता हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माणसे असतात अगदी एकाच सीटवर एक बसला तरी पण बघ भरत नाही शिवाय सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चा प्रवासी एकमेव मी सगळ्यांनी आपली तोंडे बांधलेली ड्रायव्हर कंडक्टरसहित सध्या बसमध्ये खूपच चुकल्यासारखे वाटते ढकलाढकली नाही सीटवरून कोणाची भांडणे नाहीत तुम्ही कुठे उतरणार तू कुठे उतरणार म्हणून सीटचे रिझर्वेशन नाही जरा तुमची बॅग तिकडे घ्या अंगावर रेलू नका इत्यादी गोष्टी नाहीत.


बसचे ड्रायव्हर तर विमान बस चालवल्या सारखी बस चालवत आहे. जिथे रोजच्या प्रवासाला तीन तास लागत होते तेथे 50 मिनिटात गाडी आपल्या जागी पोहोचवते त्यांना पण एक सॅल्यूट मारला पाहिजे कारण अशा आणीबाणीच्या वेळी ड्रायव्हर कंडक्टरदेखील आपल्या ड्युटी निभावत आहे. पुन्हा एकदा मागचेच गाणे रिपीट करते


खाली खाली तंबू है

खाली खाली कुर्सी है

खाली खाली डेरा है

पहला घंटा बचपन है दुसरा जवानी है

तिसरा बुढापा है

तशी आता या करोना नामक राक्षसाची दुसरा घंटावाली जवानीची स्टेज सुरू आहे 

तेव्हा सर्वांनी स्वतःची कुटुंबाची आणि देशाची काळजी घ्या रस्त्यावर बाहेर फिरू नका


Rate this content
Log in