Author Sangieta Devkar

Inspirational Others

4  

Author Sangieta Devkar

Inspirational Others

लाईकस अँड कमेंटस

लाईकस अँड कमेंटस

4 mins
242


स्नेहाने नोटिफिकेशन आले म्हणून फोन ओपन केला पाहते तर काय पूजाने तिचा एक फ़ोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यात ती शार्ट टॉप फ़क्त तिची छाती कव्हर करेल इतका छोटा टॉप घातला होता आणि खाली तशीच शार्टस. तिचे जवळजवळ पोट आणि मांड्या व्यवस्थित दिसत होत्या. स्नेहा ऑफिस मध्ये होती सो तिला पूजा ला कॉल करता नाही आला. पण तिने संध्याकाळी भेट असा मेसेज पुजाला केला. दिवसभर स्नेहा च्या डोक्यातुन पूजा चा तो फोटो जात नव्हता. ही मूलगी वेडी बिड़ी झाली काय? असे फोटो तिने या आधी कधीच टाकले नव्हते मग आता का? असे ख़ुप सारे प्रश्न स्नेहाला पड़ले. संध्याकाळी चांगले खड्सावुन सांगू पुजाला शेवटी बेस्ट फ्रेंड आहे ती. असा विचार करत स्नेहा आपल्या कामाला लागली. संध्याकाळी दोघी कैफेत भेटल्या. पूजा तुला वेड लागले आहे काय? कसला फोटो तू इंस्टा वर टाकला आहेस? स्नेहा अग इतकी का हायपर होतेस आजकाल चा हा ट्रेंड आहे. सरार्स मुलीं असे आणि याहुन कमी कपडयात फ़ोटो पोस्ट करतात. पूजा त्या मुली आणि तू यात जमीन आसमान चा फरक आहे. तुला शो ऑफ करायचा आहे का? तू काय शो पीस आहेस का? स्नेहा आज जमाना कुठे चालला आहे आणि तू अजुन ही जुन्या काळात जगतेस. तुला ना जास्त मेकअप आवडतो ना सव्हताला प्रेजेंट करण.


पूजा आजचा जमाना भले फॉरवर्ड असेल पन लोक ही तशीच आहेत ग. आपणच लोकांना आपल्या शरीराच का म्हणून प्रदर्शन करायच? स्नेहा मी इतके पन कमी कपड़े नाही घातले यार आणि इंस्टा वर जितके जास्त लाईक आणि फॉलोअर्स असतिल तर आपण फेमस होतो. ख़ुप लोक आपल्याला ओळखू लागतात. पूजा अस अंग प्रदर्शन करून फ़ॉलोअर्स मिळवायचे हे योग्य आहे का? स्नेहा इतके काही होत नाही लगेच चील. पूजा तुला नाही ना पटत माझ बोलण ओके काहीतरी मोठा फ़टका बसला ना तुला मग समजेल. अग आपण आपल्या चांगल्या कामाने फेमस व्हायचे असते अस फोटो पोस्ट करून नाही. स्नेहा सोड तुझे आणि माझे विचार ख़ुप वेगळे आहेत पण मैत्री तरी आहे ना आपली पूजा? हम्म स्नेहा काही होत नाही डोन्ट वरी. होप सो स्नेहा बोलली.


त्यानन्तर पूजा रोजच नवनवीन फोटो टाकत राहिली. कधी टि शर्ट खांद्या वरुन बाजूला केलेला आणि ब्रा ची पट्टी दाखवनारा फोटो. कधी लॉन्ग गाउन त्याला मधून कट असणारा जेणे करुन पाय मांड्या दिसतील असा. असे फोटो बघुन ख़ुप लोक पूजा ला फॉलो करू लागले. कमेंटस ही देवू लागले. हॉट, सेक्सी, हॉट केक असे कमेंटस तिला येऊ लागले त्यामुळे पूजा जाम खुश होती. तिचे फ़ॉलोअर्स वाढत होते स्नेहा ला मात्र पूजा ची काळजी वाटत होती. एक दिवस पूजा ला कमेंटस मध्ये कोणीतरी बोलले की तू ख़ुप सेक्सी आहेस तुझी टेस्ट घ्यायला मला आवडेल. त्याच्या बदल्यात तू मागशील ती कीमत देइन. ही कमेंट बघुन इतर ही लोक तशाच प्रकारची कमेंटस देत राहिली. पूजा ने हे बघितले पण त्यांना काय उत्तर द्यावे हे तिला सुचेना कारण असे फोटोज टाकून तिनेच बदनामी ओढ़वून घेतली होती तिला स्नेहा ची आठवण झाली.


आता तर खूप सारे लोक तशीच कमेंटस देत राहीले त्या कमेंटस डिलीट करता करता तिच्या नाकीनऊ आले . मग जेव्हा हे सगळ असहय होऊ लागले तेव्हा पूजा ने तिचे इंस्टा अकॉउंट बंद केले. स्नेहा ने हे बघितले तिला पूजाचा ख़ुप राग येत होता. जी भीती तिला वाटत होती तेच झाल. ती ऑफिस मधुन घरी आली आणि पुजाला कॉल करायला फोन घेतला तितक्यात पूजाच तिच्या कड़े आली आणि स्नेहा च्या गळ्यात पडून रडु लागली. पूजा मी बोलले होते तुला की लोक विचित्र असतात तुझ्या फ़ोटोंचा अर्थ काय लावला बघ त्यांनी. तू त्या कमेंटस डिलीट केल्या का? हो स्नेहा पन मी कुठे इतके वल्गर पिक्स टाकले का? पूजा लोकांना सारासार विचार करण्याची बुद्धि नाही. त्यांना बाईच जरा जरी अंग दिसल तरी वाटेल ते कमेंटस करतात. पण इतर मुलीं ही टाकतात ना ग असे फ़ोटोज. पूजा त्यांना ही लोक तसच कमेंटस देत असतील ही पण त्या मुलींना चालत असेल ते तुला चालणार आहे का? आपण चांगल्या घरातून आलो आहोत आपल्या आई वडिलांनी आपल्याला दूर शहरात राहून नोकरी करायला परवानगी दिली कारण आपल्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणून मग त्याच्या विश्वासाला आपण तड़ा जाईल अस काम करायचे का सांग? स्नेहा माझ चुकल.


हेच मी सांगत होते तुला पन तुला जास्त फ़ॉलोअर्स हवे होते ना घे आता. रियली सॉरी ना स्नेहा माफ कर परत नाही अस मी करणार मी माझे पिक्स पण नाही अपलोड करणार.पूजा झाल ते झाल पुन्हा असा मूर्खपणा करु नकोस. नाही करणार स्नेहा प्रॉमिस. चांगला धड़ा मिळाला मला. पूजा तुला गान म्हणता येते ना? त्याच काय ? तू तुझ्या गायनाचे विडिओ बनव आणि ते अपलोड करत जा. नको ग आता आवाज पण पूर्वी सारखा नाही लागणार कॉलेज मध्ये ग़ायची मी. पूजा ट्राय कर आणि आपण शिकलेली कला कधी विसरतो का? तू छान गातेस मला माहित आहे. छान छान गाणी म्हण आणि ते विडिओ टाकत जा मग बघ किती लोक लाइक़ करतील. आणि चांगल्या कामाचे कौतुक करणारे ही ख़ुप लोक आहेत. कोणी सांगावे यातून तुला कोणीतरी गाणयाची संधी देईल. अस होईल स्नेहा? हो नक़्क़ी होईल तू प्रयत्न कर मनापासून मग एक दिवस फेमस सुद्धा होशील. वन ऑफ सुपर सींगर मिस पूजा अस लोक तुला कमेंटस देतील. नक़्क़ी स्नेहा मी पुन्हा माझ गाण सुरु करेन. पूजा च्या चेहऱ्यावर आता छान हसू होते


आजकाल इंस्टाग्राम आणि एफ़ बी वर भड़क मेकअप करून आपल अंग प्रदर्शन करणारे फोटोज आणि काही ही एक्टिंग येत नसताना देखील तसे वीडिओ काढुन पोस्ट केले जातात. यामुळे आपले फ़ॉलोअर्स वाढतिल ख़ुप कमेंटस येतील असा गोड गैरसमजही मंडळी बाळगुन असतात त्यांना मला इतकेच सांगायचे आहे की आपण आपल्या कर्तृत्वाने फेमस व्हा त्यासाठी आपले कलागुण लोकांसमोर आणा ना की कसले ही विक्षिप्त हावभाव असणारे फ़ोटोज पोस्ट करा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational