Prasad Kenjale

Drama Inspirational

3  

Prasad Kenjale

Drama Inspirational

लग्न... सुशिक्षित बेरोजगारचे

लग्न... सुशिक्षित बेरोजगारचे

5 mins
203


        एकटक नजर खिळली होती त्याची, त्या रखरखत्या उन्हात रानातून निघणाऱ्या धगी वरती. विचारांचा काहूर माजलेला डोक्यामध्ये, नैराश्याचे ओझे वाहून कंटाळला होता तो.

अहो! तो कोण? तो कोण म्हणजे सुशिक्षित बेरोजगार शिरीष. 


अचानक त्याला फोन आला अन त्याची खिळलेली नजर मोबाईलकडे वळली पाहिलं तर आबांचा (शिरिषचे वडील) फोन येत होता, फोन उचलताच आबा म्हणाले 'तडक घरी निघून ये'. शिरीष हो म्हणून डोक्याला टॉवेल गुंडाळून घरच्या रस्त्याने चालू लागला पण त्याच्या डोक्यात येणारे विचार काही थांबत नव्हते. घरी पोहचताच आई म्हणाली "आवर पटकन बाळा हात पाय धु आपल्याला एका पाहुण्यांकडे जायचे". शिरिषने प्रश्न केला 'का?' तेवढ्यात आबा म्हणाले "अरे एक स्थळ चालून आलेय, ते पोरगी बघायला जायचे आपल्याला, आवर पटकन आता बोलण्यात वेळ नको घालवू." शिरीष आवरून तयार झाला पण नैराश्यामुळे चेहऱ्यावरचा आनंद मात्र हरवून गेलेला......


       आबा आणि शिरीष गाडीवरती निघाले, वाटेत वाण्याच्या मिठाईच्या दुकानातून त्यांनी पावशेर सातारी कंदी पेढे घेतले आणि ते निघाले. पाहुण्यांकडे पोहचले, आणि आबांची आणि मुलीच्या वडिलांची बोलनी सुरू झाली. मुलीच्या वडिलांनी पहिलाच प्रश्न केला, 'शिक्षण काय झालंय पोराचे?' आबा पाहुण्यांना म्हणाले "समदं पोरालाच विचारा की तो सविस्तर सांगेल सर्व." शिरीष त्याच्याच विचारात दंग होता, तेवढ्यात मुलीच्या वडिलांनी पुन्हा प्रश्न विचारला होय पाहुणे, के शिक्षण काय झाले तुमचे? शिरीष उत्तरला एम. कॉम. उत्तर देताच त्यांनी दुसरा प्रश्न केला 'नोकरी करता का नाही?' तो थोडा वेळ निशब्ध झाला आणि नंतर म्हणाला नोकरी शोधतोय. एवढे ऐकताच त्यांनी त्यांच्या मुलीला आवाज दिला, "रूपा ए रूपा, झाले असेल तुझं तर चहा, कांदेपोहे घेऊन ये बाहेर". 2 मिनिट पूर्ण शांतता पसरली होती, नंतर त्यांची मुलगी बाहेर आली. मुलीचे वडील म्हणाले काय विचारायचे असेल विचारून घ्या. आबांनी काही प्रश्न विचारले, आणि शिरीष ला म्हणाले 'पोरा तुला काय विचारायचे ते विचार'. तो म्हणाला मला एकांतात बोलायचे मग मुलीला आणि शिरीष ला त्यांच्या टेरेस वर बोलण्या साठी पाठवले.


       शिरीष काही वेळ गप्पच बसलेला, सायंकाळचा वारा घोंगावू लागला. शेवटी रूपा च म्हणाली बोला ना तुम्हाला काय बोलायचे ते, मग शिरीष बोलू लागला, माझं शिक्षण तर पूर्ण झालय पण अजून मला नोकरी मिळाली नाही आणि सध्याची परिस्थिती पाहता ती मिळेल असे ही काही वाटत नाही. सध्या शेतीच करतोय, तसे मी 4 5 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेत पण तिथे पगार खूपच कमी सांगत होते, एवढे शिक्षण घेऊन पण ते 8 10 हजार देत होते म्हणून मीच ते नाकारले करण 10 हजार पगारात जेवढे वर्षभर कमावतो तेवढे तर शेतीतूनच मी दर 4 महिन्याला कमावतो, मग नोकर म्हणून राहण्या पेक्षा मी शेती मध्ये मालक म्हणून राहण्याचे ठरवले. त्याचे बोलणे मधेच थांबवत रूपा म्हणाली, पण माझ्या काही अपेक्षा आहेत, मुलाला पुण्यात किंवा मुंबई मध्ये नोकरी हवीय, त्याच तिथे स्वतःचे घर असावे, मुलगा निर्व्यसनी असावा. शिरीष तेवढ्यात बोलला सुपारीच्या खंडाचे सुद्धा व्यसन नाहीये मला. रूपा बोलली तो एक गुन असेल तुमच्या कडे पण राहिलेल्या पहिल्या दोन अपेक्षे प्रमाणे तर नाही तुमच्या कडे काही. काही वेळ दोघे पण शांत राहिले, नंतर शिरीष त्या शांततेला तोडत बोलला मग तुम्ही सांगताय का, की मी सांगू? रूपा म्हणाली काय? तो म्हणाला नकार आहे ते. रूपा म्हणाली तुम्हीच सांगा मी नाही सांगू शकत. 


        दोघे पण खाली आले बसले, अन तो आबांना हलक्या आवाजात म्हणाला 'चला आबा'. आबा पाहुण्यांना म्हणाले फोन वरून कळवतो तुम्हाला. आबा आणि शिरीष घरी पोहचले, घरात पोहचताच आईने विचारले काय रे बाळा पडली का पसंद मुलगी? शिरीष म्हणाला नाही. आई पुन्हा म्हणाली का रे काय झाले? त्यांच्या अपेक्षे प्रमाणे माझ्या जवळ काहीच नाही, ना पुन्या मुंबईत नोकरी आहे ना तिथे माझं घर आहे. तेवढ्यात आबा चिडुन म्हणाले एवढी पंधरा एकर ची बागायत आहे, हा अवाढव्य वाडा आहे मग कशाला पाहिजे ती नोकरी अन दुसरं घर. शिरीष त्यांना उत्तर देत म्हणाला आबा आजकालच्या पोरींना सासू सासरे नको असतात म्हणून त्यांच्या पासून लांब राहण्या साठी पुणे मुंबई मध्ये नोकरी अन घर हवं असते त्यांना, दुसरं काही नाही. एवढं बोलजन शिरीष घरातून बाहेर पडला. पाठी मागून आईने आवाज दिला, बाळा ऐक बाळा ऐक पण शिरीष ने त्या वर दुर्लक्ष केले.


         बाहेर सोन्या, दिन्या आणि पक्या या मित्रांच्या सोबत नदीच्या घाटावर जाऊन बसला. दिन्याचे नुकतेच लग्न झालेले, पक्याने त्याला विचारले काय भावा मग कस के जुळलं रे तुमचं? दिन्या म्हणाला हे बघ मित्रा आजकाल प्रामाणिक राहून काही मिळत नाही बघ कधी कधी खोटं बी बोलायला लागत बघ. तेवढ्यात शिरीष म्हणाला म्हणजे तू वहिनींना आणि त्यांच्या घरातल्यांना खोटे काही तरी सजगीतलेस वाटते. दिन्या म्हणाला हे बघ शिर्या आजकाल जशी दुनिया तास आपण चालावं अन बोलावं लागते नाहीतर जगणं मुश्किल हाय बघ. सोन्या म्हणाला तेवढ्यात अस काय खोटं बोलला रे तू? दिन्या म्हणाला मी सांगितले पुण्यात जॉब ला आहे? तिथेच त्याला टोकत पक्या म्हणाला तो तर तू करतोयसच की. दिन्या म्हणाला थांब ना जरा मला बोलू तर दे, मी सांगितले पुण्यात मला जॉब आहे तिथे 40000 पगार आहे आणि नुकताच पुण्याच्या मध्यभागात एक भव्य 2 बीएचके फ्लॅट बुक केलाय. शिरीश म्हणाला आणि उद्या वहिनी म्हणल्या मला तुमच्या सोबत घेऊ चला पुण्याला तर काय करशील? दिन्या म्हणाला आज उद्या, आज उद्या करत करत 1 वर्ष तिला इथेच ठेवायची, नंतर तिला दिवस गेल्या नंतर माहेराला पाठवायचे आणि आपण तिथला जॉब वगैरे सोडून इथे शेती करायला सुरुवात करायची, तास ही त्या 10 हजाराच्या पगारात भागत नाही काही, त्या पेक्षा इथे आपण जास्त कमवू, तिची डिलिव्हरी झाली की तिला सांगणार जॉब गेला म्हणून. सोन्या म्हणाला हे ऐकून वहिनी इकडे आल्याच नाही तर काय रे?


हे बघ सोन्या एकदा पोर बाळ झालं की तिला माझ्या कडे येण्या वाचून दुसरा पर्याय उरत नाही. सोन्या हसत टाळी देत म्हणाला भारी प्लॅन आहे रे भावा तुझा. पण एवढे ऐकून शिरीष तिथून उठला, तेवढ्यात पक्या म्हणाला का रे बस की इथं. शिरीष म्हणाला तुमचे हे विचार माझ्या बुद्धीला पटत नाहीत अजिबात. तेवढ्यात पक्या म्हणाला हे बघ शिरीष या पोरींच्या अपेक्षा आभाळभर झालेत, जे ह्यांच्या 50 वर्षाच्या बापाला जमले नाही ते आपल्या सारख्या 25 वर्षाच्या पोराला कास जमल? या पोरींशी आसेच वागायला हवे अन ते बरोबरच आहे. तेवढ्यात सोन्या म्हणाला ए पक्या कुणाला सांगतोय तू, तो शिर्या म्हणजे हरिश्चंद्राची अवलाद आहे, आत्ता पर्यंत ह्याने 10 किलो पेढे पोरी बघण्यात घालवले असतील, म्हणजे 40 तरी पोरी याने पाहिलेत. दिन्या तेवढ्यात म्हणाला होय रे शिरीष या सर्व पोरीतल्या एक तरी मुलगी अशी सापडली का जिच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, नाहीतर आपल्या होणाऱ्या नावऱ्यातच आपले सुख आहे अशा विचारांची भेटली का तुला? शिरीष निःशब्दच राहिला अन तिथून निघून गेला.


         दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच रखरखते उन्ह आणि रानात निघणारी धग आणि त्यावर खिळलेली शिरीषची नजर. सर्व काही स्तब्ध आणि निःशब्द होत, विचारच अन नैराश्याचे ओझं पुन्हा डोक्यावर तांडव करत होत...


Rate this content
Log in

More marathi story from Prasad Kenjale

Similar marathi story from Drama