Seema Kulkarni

Others

4  

Seema Kulkarni

Others

लहानपण खेळण्यातलं

लहानपण खेळण्यातलं

3 mins
359


लहानपण असेच गोड असतं. कितीही मोठे झालो तरी मुंगी होऊन साखर खावीशीच वाटते. परत परत ते बालपण अनुभवावं वाटतं. ती बालपणातल्या मजेची सर, आयुष्यभर परत कधीही मिळत नाही. तो निरागस आनंद, मोठेपणाच्या चौकटीत हरवून जातो. काळ जसा बदलत जातो तसा, खेळातही बदल होत गेला. पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती, विना मोबाईल विना सोशल मीडिया अशीच होती. त्यामुळे त्या वेळच्या मुलांचं लहानपणीच्या खेळाची मजा, आत्ताच्या मोबाईल गेम ला मुळीच नाही. त्यातून शारीरिक व्यायाम, मानसिक संतुलन योग्य होत असे. मुलांना शारीरिक व्याधी कमी जडत असत. या विषयामुळे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.

आमच्या लहानपणीचे खेळ. 


ग्राउंड मधले खेळ. _ खोखो कबड्डी, हे खेळ तर आजही खेळले जातात. पण स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनच. आम्ही तर इतर वेळी हे खेळ खेळायचो.

लंगडी _ तसा लंगडी हा खेळ सर्वांना परिचित असा आहे. एक पाय दुमडून एका पायाने धावत जाऊन दुसऱ्याला पकडणे. ज्याचं स्टॅमिना जास्त, तो जास्त वेळ लंगडी घालत असे. लंगडी हा खेळ मुलींनीच खेळायचा. असं आमच्या लहानपणी समजलं जायचं. मुले खेळत नसायची.


उभ्या स्थितीतले खेळ__

विटी दांडू__ लाकडाचा पुढे टोक असलेला एक दांडू. आणि विटी म्हणजे दोन्ही बाजूनी टॉक असलेला छोटा लाकडी तुकडा. जिथे खेळायचे तिथे छोटा एक खड्डा करायचा, जावर विटी बसेल. खेळणाऱ्याने पहिल्यांदा विटी उडवून खेळायला सुरुवात करायची. विट्टीच्या एका टोकावर दांडूने मारले की विटी उंच उडत असे. आणि दोन तीन वेळा वरच्यावर जर दांडूने विट्टी उडवली तर, तो खेळा मध्ये हुशार समजला जाई. जेवढे विटी लांब जाई, तेवढा पळण्याचा व्यायाम होत असे.


 लपंडाव__ 10, 20, 30 ने सुरुवात व्हायची. ज्याच्यावर राज्य त्याने 100 पर्यंत आकडे मोजायचे. तो पर्यंत सर्वांनी लपायचे. मग शोधताना बराच वेळ निघून जायचा.


विषामृत__ विषामृत किंवा तळ्यात मळ्यात., एकच प्रकार पण शब्द वेगळे. एकाने विष, अमृत असे शब्द कसेही उच्चारायचे. त्याप्रमाणे विष म्हटले की वरती अमृत म्हणले की खाली, जसे ठरले असेल त्याप्रमाणे उभे राहायचे. जरा चुकले की आउट असायचे. आंधळी कोशिंबीर खेळायचो. हळूच बघण्याची चिटिंग चालायची.


चिकट भोपळा__ दोन्ही साईडला समान खेळणारे असत. एकमेकांना पकडायचे. आणि दुसऱ्या साईड च्या लोकांना ओढायचे. ज्याचा जोर कमी तो हरत असे. हसून हसून खूप पुरेवाट व्हायची.


जिबली__ हा खेळ फक्त मुलीच खेळत असत. पेन्सिलने फरशीवर 10 मोठे चौकोन आखायचे. एक छोटा फरशीचा तुकडा बरोबर हव्या असलेल्या चौकोनामध्ये पडला पाहिजे. तिथपर्यंत लंगडी घालत घालत जायचे. आणि ज्या चौकोनात फुली असते, तिथे थांबायचे. "डोंगराला आग लागली पळा पळा पळा" असे म्हणून ठराविक अंतर पळायचे. आणि "मूर्ती" म्हटलं की स्तब्ध होऊन जायचे. मग काहीही करून मूर्ती झालेल्यांना हसवायचे. परत शिवाजी म्हणतो हे करा शिवाजी म्हणतो ते करा, असे म्हणून काहीही बनायचे. खूप मज्जा आणायचे हे खेळ.


बैठे खेळ__

यामध्ये फक्त मुली गजगे किंवा बिट्ट्या खेळायच्या. काही ठिकाणी याला सागरगोटे असेही म्हणतात. एक सागरगोटा वरती टाकायचा तेवढ्या वेळात खालून दुसरा उचलायचा. असा तो खेळ चालायचा. परत काचांचे तुकडे जमा करून, न हलवता एकेक बाजूला काढायचे. तसंच आइस्क्रीमच्या कांड्या, जमा करून एकत्र टाकायच्या आणि एका काडीने न हलवता बाकीच्या सर्व काढायच्या. भातुकलीचा खेळ तर खूप रंगात यायचा. दोरीवरच्या उड्या तर आवडीचा खेळ असायचा.


मामाचं पत्र हरवलं__ हातात रुमाल घेऊन, गोल बसलेल्या मुलांच्या पाठीमागून पळायचे. आणि हळूच एका च्या पाठीमागे तो रुमाल टाकायचा. आणि तो उठला की त्याच्या जागेवर जाऊन बसायचे. मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं असे म्हणत म्हणत पळावे लागे.


पत्ते__ यामध्ये लाल बदाम सात, झब्बू, 5 _3 _2, 7_ 8, बुद्धिबळ, गरीब-श्रीमंत, असे खूप प्रकार चालायचे.


नवा व्यापार__ खोट्या नोटांचा हा खेळ असायचा. भरपूर पैसे कमवायचे आणि आपलं नशीब आजमवायचं.


कागदापासून वस्तू__ यामध्ये कागदापासून खुर्ची ,टेबल पंचपाळ, बॉल ,आकाश कंदील अशा कितीतरी वस्तू बनवायचो. परत दोन्ही हाताचा अंगठा आणि तर्जनी यामध्ये दोरा अडकवून एकमेकात गुंतवून एक विशिष्ट आकृती तयार करायची. 


        आम्ही या खेळाची खूप पुरेपुर मजा घेतली.आता इंटरनेटच्या जमान्यात, हे सर्व खेळ विस्मृतीत गेले आहेत. आजच्या कृत्रिम मोबाईल गेम मुळे, मुले खेळण्यातला मोकळेपणाच विसरून गेली आहेत. आज आवर्जून एका लहानपणीच्या गाण्याची आठवण झाली.


घालू बेडूक उडी, गड्यांनो घालूया लंगडी,

लपाछपी आता खेळूया, झाडामागे दडी. !!

      सुट्टी लागली सरली शाळा,

       कोण पहाटे उठतो खुळा,

    अभ्यासाला बसा मुलांनो ओरडते घडीघडी. १.

गावाबाहेर वाहे नदी,

झाडे बघती पाण्यामधी,

सळसळणाऱ्या पाटामध्ये घेईल कोणी उडी? २.

     कुणी पाडते चिंचा बोरे,

     एक आकडा मलाही दे रे,

झाडाखाली उभा राहूनी लावे लाडीगोडी. ३.


Rate this content
Log in