Pratima Pai

Children Stories

3  

Pratima Pai

Children Stories

लिपस्टिक

लिपस्टिक

2 mins
175


नीता कामावर जायची तयारी करत होती. आज तिची सेकंड शिफ्ट होती. दुपारी जेवणासाठी जी पुरी भाजी केली होती तीच तिने डब्यात ही घेतली. ड्रेस घातला, केस विंचरले आणि आरश्या समोर उभी राहिेली. स्वतःच प्रतिबिंब पाहून ती खुश झाली. पण काही तरी मिसिंग आहे असं वाटलं. अरे हो लिपस्टिक लावायची राहिलीच की. मग तिने कपाट उघडले, त्यामधे एका छोट्याश्या टोपलीत तिने लिपस्टिक ठेवल्या होत्या. तिने त्यापैकी लाल रंग उचलला आणि लावला. वाह. स्वतः कडे बघुन ती खूप खुश झाली. एक लिपस्टिक लावल्यानं तिची सुंदरता खुलून आली होती.

नीता तैयार होताना तिची भाची तिला बारीक नजरेनं पाहत होती. "आत्या मला पण आणुन देशील असली लिपस्टिक,"तिने विचारलं.

"हो देईन की. उद्या सकाळी येताना घेवुन येईन," ठीक आहे ना सानु. "पण तु रोज लिपस्टिक लावायची नाही बरं का, कारण तु अजून छोटी आहेस. कबूल असेल तर सांग. तरच आणीन."

"ठीक आहे आत्या. पण प्लीज मला लिपस्टिक आण ह का."

"ठीक आहे बाळा, नक्की आणीन."

नीताची आई हा सगळा संवाद ऐकत होती. "आण हो लिपस्टिक. आत्ता पासुन करू दे सगळी रंग रंगोटी. बिघडवून ठेवा. जे सांगेल ते लगेच आणून द्या,"


"अगं आई लिपस्टिक लावल्याने कोण बिघडत नसतं. आणि तिने काबूल केलं आहे ना ती क्वचितच त्याचा वापर करेल म्हणून, झालं तर मग."

"तुला सांगते आई, आमच्या हॉस्पिटलमध्ये, त्या बेड नंबर पाच वर ज्या पेशंट आहेत ना, जोशी काकु त्यांना शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. जोशी काका आणि घरातली इतर मंडळी त्यांना भेटायला येत असतात. जोशी काका तर तिथेच बसून असतात. जोशी काकूंनी जरी हॉस्पिटलचा गाऊन घातला असला तरी रोज सकाळी केस विंचरून मस्त भडक रंगाची लिपस्टिक लावतात."

एकदा त्या मला म्हणाल्या,"एवढाच काय तो रंग उरला आहे आयुष्यात. आता कधी जाईन ते काही माहीत नाही. पण जाताना मात्र छान दिसायच आहे. म्हणून लावते ही लिपस्टिक."

"आत्ता तूच सांग आई. लिपस्टिक लावल्याने कोणी बिघडत का. नाही ना?"

लिपस्टिक का लावायची तर छान दिसण्यासाठी. जर एखाद्या गोष्टी मुळे आनंद मिळत असेल तर ते करण्यात काही गैर नाही. लिपस्टिक लावल्याने माझा आत्म विश्वास वाढतो. सकारात्मक वाटतें. मग खुशाल लावावी लिपस्टिक आणि जग जिंकून घ्याव. बाय आई. उद्या सकाळी भेटू.


Rate this content
Log in