मागचे दिवस...
मागचे दिवस...
"बापू, आबाकाका आले हायती."
"अरे! मग बसव की त्यास्नी."
"काय रे आबा!
आज कशी आठवण काढलीस या मित्राची."
"थोडी नड व्हती पैशाची. "
"अरे! मग हक्काने बोल की किती पाह्यजेत?"
बापूच्या डोळ्यासमोर ती दंगल, त्यांचे धगधगणारे घर आणि मदत करणारे आबांच्या घरचे लोक उभे राहिले होते. कसे शक्य होते विसरणे मागचे दिवस?