Gaurav Mane

Others

4.0  

Gaurav Mane

Others

माझा आदर्श व्यक्ती कोण ?

माझा आदर्श व्यक्ती कोण ?

6 mins
252


        काल स्वातंत्र्य दिन होता. मी शाळेचा माजी विद्यार्थी असल्याने आणि गावातील निवृत्त वरीष्ठ शासकीय अधिकारी होतो. शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व त्यांच्या भविष्यातील करियरच्या वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मला स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या व्यवस्थापकांनी आमंत्रित केले होतं. मी पण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमला गेलो होतो... स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यथासांग पार पडला. कार्यक्रमास अजूनही बरीच मंडळी उपस्थित होती.शाळेच्या मुलांचा प्रेक्षक वर्गही मोठा होता. मी सुध्दा स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द बोललो स्वातंत्र्य बद्दलचा आपला लढा आणि आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्य ची महतीही मी मुलांना सांगितली अखेर माझं भाषणही झालं. नंतर शाळेच्या प्रिन्सिपलचं भाषण झालं आणि शेवटी बक्षीस वितरण सोहळा सुरू झाला... मागच्या वर्षी शाळेत दहावीत पहिल्या आलेल्या मुलांची नाव पुकारले गेली... त्यांना त्यांच्या गुणाप्रमाणे बक्षीस वाटली गेली आणि त्यांना त्यांच्या या यशामागचं गमक , त्यांनी हे मिळवण्यासाठी केलेली मेहनत यांच्या उलगडा सर्वांसमोर मांडावा म्हणून चार शब्द सांगण्याची विनंती सुत्रसंचलकाने केली... प्रत्येक विद्यार्थी आपलं एक वेगळं मत मांडत होतं ,त्यांनी मिळवलेल्या यशाचं श्रेय कोणी शिक्षकांना नंतर कोणी आपल्या पालकांना देत होत... आपल्याला भविष्यात काय व्हायचंय याची पूर्वकल्पना सर्वांसमोर मांडत होत ...शेवटी प्रत्येकाने आपापला आदर्श व्यक्ती ( Role model ) कोण आहे हे पण सांगितलं , मी मन लावून त्यांची ती मत ऐकत होतो... प्रत्येकाचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्हिव होता...होता होता सगळ्यांची मत झाली अखेर कार्यक्रमाची सांगता झाली...मी शाळेत झालेल्या नवनवीन सुखसोई बघितल्या...शाळेचं हे नवरूप डोळ्यात साठवून घेतलं...स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमला मला बोलवल्याबद्दल मी मुख्याध्यापकांचे आभार मानले आणि घरी निघालो...पण या पूर्ण प्रवासात फक्त त्या मुलांचं ते मत आठवत होतो आणि त्याबद्दल विचार करत होतो त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या आदर्श व्यक्ती बद्द्लच्या संकल्पना आठवत होतो , काही वेळात घरी पोहोचलो.... थोड्या वेळात फ्रेश झालो आणि माझ्या रूम मध्ये येऊन बसलो आणि पुन्हा तेच विचार... त्यांचे आदर्श व्यक्ती का बरं तेच व्यक्ती असू शकतात ? 


      तीन विद्यार्थी बक्षीस मिळाले होते...प्रत्येकानं आपलं एक वेगळं मत मांडल... सर्वात जास्त गुण मिळालेली प्रथम आलेली मुलगी होती तिने आपला आदर्श व्यक्ती म्हणून आय.ए. एस सृष्टी देशमुख या प्रशासकीय अधिकारीचे नाव सांगितली...तिला सुद्दा त्यांच्या सारखं व्हायचंय अस ती म्हणाली... दुसरा आलेला मुलगा होता त्याने ए. पी.जे अब्दुल कलाम यांना आपलं आदर्श व्यक्ती म्हटलं... त्यांच्यासारखं मलाही देश्यासाठी काहीतरी करायचंय अस तो म्हटला...आणि आता तिसरा आलेला पण मुलगाच होता त्याने आय. पी. एस विश्वास नांगरे पाटील हे आपले आदर्श व्यक्ती असल्याचे सांगितले ,त्यांच्या व्यक्तीम्हत्वाने प्रभावित झाल्याचे पण त्याने सांगितले... यांची ती आदर्श व्यक्तींची नाव ऐकून मी तर चाट पडलो या तिघांनीही एकदम हाय प्रोफाइल व्यक्तींची नावे सांगितली कदाचित समोर बसलेल्यांपैकी बऱ्याच जणांना यातील काही नाव माहीतही नसतील... आता काय आहे मोबाईल सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे सर्वांनाच नेटवरील या प्रतिष्ठित व्यक्तींची नाव माहीत होतात...पण यांनी कदाचित त्यांना प्रत्यक्षात कधी बघितही नसेल परंतु व्यक्तिमत्त्व मात्र त्यांच्या सारखं बाळगण्याची ही मुलं स्वप्न पाहतात त्यांना आपलं रोल मॉडेल मानतात का तर म्हणे त्यांना त्यांचं भाषण ऐकून इन्स्पिरेशन मिळत म्हणून , खरंच इन्स्पिरेशन मिळत का हो ? कायमसाठी की तात्पुरत ? ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्षात बघितही नाही त्यांच्या बद्ददल आपल्याला एवढा आदर का वाटतो ? आपल्या आईवडिलांबद्दल का नाही आदर वाटत ते तर सतत आपल्या सोबत असतात , आपल्या प्रत्येक परिस्थितीत आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्या बद्दल का नाही आपल्याला आत्म्यता वाटत ? माझ्या मते सहवासाने माणसे कळतात अस मला वाटत , याला कदाचित तुम्हीही सहमत असाल... मग जे व्यक्ती दररोज आपल्या सोबत असता ज्यांच्याकडे आपल्या क्षणोक्षणी येण्याऱ्या अडचणींची सोल्युशन असतं त्यांना का नाही आपण आपलं रोल मॉडेल मानू शकतं ,शिवाय ज्यांचा आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना समजून न घेता जे आपल्या सोबत नाहीत त्यांच्या सारखं होण्याचा अट्टहास का करावा...आपला बाप जो पर्यंत आपल्या सोबत आहे ना तोपर्यंत तरी आपल्या काही गोष्टींची झळ लागत नाही , माझ्या मते आपला बाप आपल्याला नक्कीच इतरांपेक्षा चांगल ओळखतो ,आपल्या समस्येवर अगदी वयाच्या शेवट पर्यंत आपल्या काहींना काही उपाय अवश्य काढत असतो माझ्या सोबत पण असा एक प्रसंग घडला होता...

साधारण 1987 चा काळ असावा मी तेव्हा दहावीचा होतो , आमच्या गावाला दर शनिवारी आठवडे बाजार भरायचा , तेव्हा मला बाजारात जायचा खूप कंटाळा यायचा कारण तेव्हा आता सारख्या घरोघरी मोटारसायकल नव्हत्या....आमच्या नानांकडे ( म्हणजेच आमच्या बापाकडे )एक फार जुनाट झालेली सायकल होती , नानांनी त्यांचं पूर्ण आयुष्य त्या सायकलीसोबतच घालवल होतं , तर नानांनी मला एकदा बाजारात जबरदस्ती घेऊन गेले आणि बाजार झाल्यावर ती जुनाट सायकल वर तो बाजार घेऊन घरी जायला लावला आता तर माझी पुरती वाट लागली होती...आमचं घर गावापासून तीन मैलावर आणी त्यात ही जुनाट सायकल... आणि त्यात सायकलची चैन परत परत पडायची मी गावपासून साधारण १५०-२०० मिटर आलो असेल आणि केली सायकलने आपली नाटक सुरू परत चैन पडली मी परत बसवली अजून काही अंतर गेलो आणि परत चैन पडली मला आधीच कंटाळा आला होता त्यात ही सायकल माझ्या तर डोक्यात च गेली मी तसचं सायकल एक जवळच्या झाडाखाली लावली आणि बसून घेतलं...काही वेळाने नाना आले "काय झालं रं ,का बसला व्हय इथं ?" नानांनी मला विचारलं...मी सरळ सांगितलं ही "तुमच्या या लाडक्या सायकलनचं बसायला लावलं की मला इथं " "आरं एवढंच ना मग बसवायची की चैन त्यात काय अवघड " नाना...  " आवं नाना ह्या सायकलची चैन बसवून बसवून माझ्या हाताची बोट पार तुटायला आली की " मी जरा वैतागलोच.... "आरं मग ती बाजारची पिशवी घेकी खांद्यावर आणि निघ वाटा वाटानि " नाना...आता सर्व माझ्यावरच आल्यामुळे मी शांत बसणंच पत्करलं... काही वेळात सायकलची चैन बसली आणि मी मागे बसलो आणि नानांनी सायकल चालवायला सुरुवात केली , बऱ्याच वेळाने आम्ही घरी पोहचलो पण या तीन मैलाच्या प्रवासात किमान पाच- सात वेळेस चैन पडली असावी...नाना चैन पडली की बसवायचे त्यांचं हे चक्र चालूच होत... एवढया वेळेस चैन पडली पण नानांच्या चेहऱ्यावर साधे वैतागल्यासाचे भाव पण नव्हते , कायही कटकट म्हणून कपाळावर आठयांचं लवलेशही नव्हता...पण मला एक कळतं नव्हतं की नाना एवढं करून त्रासून बरं जात नाही माझा तर संयम कधीच ढळला असता , मी कधीच इतक्या वेळेस ती चैन बसू शकलो नसतो पण नानांचं तसं नव्हतं....त्यांना पण नक्कीच कंटाळा आला असेल ती सायकल चालवण्याचा परंतु ते सांगू कोणाला शकत होते शिवाय जबाबदारीमुळे ते त्या पासून पळू पण शकत नव्हते...ते पण म्हणून शकले असते की 'जा मला काय त्या सायकलशी घेणं तुला जायचं तर नाही तर राहा इथं ' कदाचित त्यांच्या कडे दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना ती गोष्ट करणं भागचं होत.. अश्याच बऱ्याच वेळेस माझ्या समोर नवनवीन प्रॉब्लेम्स आले आणि नानांनी ते अगदी सहजच सोडलवले असतील , ज्या छोट्या गोष्टींचा मी बाहू करायचो ते ती गोष्ट चुटकीसरशी करून टाकायचे...मला त्यांच्या याच गोष्टीच खूप अप्रूप वाटायचं , तेव्हा मी कोणा दुसऱ्यालाच माझा रोल मॉडेल म्हणून घेत होतो परंतु जेव्हा पासून नानांच्या सोबत असल्यामुळे मला माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमस सोल्युशन ते काढून देत म्हणून मीहि दुसऱ्या कुणाला आपलं आदर्श व्यक्ती म्हटल्यापेक्ष्या का बरं आपले वडील ती जागा घेऊ शकत नाही...तेव्हापासून तर आज पर्यंत नानांचं माझे रोल मॉडेल राहिले आहे आजही जेव्हा एखादा मोठा प्रॉब्लेम माझ्या समोर येतो तेव्हा मी नानांचं बोलणं आठवतो आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो...माझं अस काही म्हणणं नाही की तुम्ही दुसऱ्या कुणाला आपलं रोल मॉडेल म्हणू नये परंतु जे आपल्या दररोज सोबत असता , ज्याच्या सोबत आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवतो त्यांना का नाही आपण आपलं रोल मॉडेल म्हणू शकत ? कोना दुसऱ्या ला आपल्या रोल मॉडेल बनवतांना त्यांच्यात आणि आपल्यातील साधर्म्य आपण तपासतो का ? आपण आपल्या आयुष्यातील विविध गोष्टीं किती एकनिष्ठ आहोत हे फक्त आपल्या माहीत असत...आणि जेव्हा आपण आपला स्वभाव इतरांशी जुळवायला बघतो ना तेव्हा नक्की काहितरी त्रुटी नक्कीच राहतात , आणि आपल्याला त्यांच्या सारखं नाही होता आलं तर कदाचित आपल्या न्यूनगंड देखील तयार होतो...इच्छाशक्ती फक्त अंतर्मनातून येत असते ,असं रोल मॉडेल बनवून नक्कीच नाही आपण जेव्हा खस्ता खातो ना तेव्हा खरं मोटीवेशन मिळत तर...असो तर मूळ विषय हा आहे की आपण दुसरं कुणाच्या तत्वांना स्वीकारण्यापेक्षा आपली स्वताची तत्व तयार करावी ज्याची जपणूक करतांना इतरांचा आधार नसावा व आपण आपल्या आईवडीलांच आपलं रोल मॉडेल म्हटलं तर इतर कुठूनच प्रेरणा घेण्याची गरजच नसते , कारण पावलोपावली समस्या असतात आणि प्रचंड इच्छाशक्ती , संयम , सातत्य असणारे आपले आईवडील आपल्या सोबत असतात त्यामुळे चिंता , काळजी करण्याची भीती मनातून कायमची डिलीट होते...आदर्श व्यक्ती ठरवण्याची गरजच संपते... बस इतकंच ! 

   

   नमस्कार वाचकांनो मांडला हा विषय मांडला आहे याबद्दल नक्कीच तुम्ही पण आपलं स्वतःच अस मत मांडा . मला नक्की कंमेंट करून मी लिहिलेल्या लेखाबद्दल तुमचं सकारात्मक किंवा नकारात्मक मत मांडा . या लेखविषय नक्कीच विचार करा...



Rate this content
Log in