Rushikesh Mathapati

Others

3.4  

Rushikesh Mathapati

Others

माझी मैत्रीण

माझी मैत्रीण

3 mins
249


असं म्हणतात कि एकवेळ गर्लफ्रेंड नसली तरी चालेल पण एक मुलगी बेस्ट फ्रेंड असावी. आपला समाज हे एक मुलगा आणि मुलीला फ्रेंड म्हणून मान्य करत नाही . त्यांना वाटत कि एक मुलगा आणि मुलगी हे फक्त प्रियकर आणि प्रेयसी असतात .पण असं नाही , ते मित्रमैत्रिणी सुद्धा असू शकतात . अशीच एका मैत्रीणबाबत मी आज सांगणार आहे .


दोन वर्षांपूर्वी मी तिला भेटलो . म्हणजे कॉलेजमध्ये तिला भेटलो , तेंव्हा ती खूप शांत वाटत होती . बाहेरून तरी शांत वाटत होती . मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो , तिथे आमच्या डिपार्टमेंटच कोणताही कार्यक्रम असला तर आम्हा विद्यार्थ्यांना करावी लागे आणि आम्हीही ते उत्सुकतेने करत होतो . आमच्याकरिता पहिला कार्यक्रम ' शिक्षक दिन ' या दिवशी शिक्षकासंदर्भातली काही कार्यक्रम घ्यायची होती . आमचे सिनियर आम्हाला या कार्यक्रमातील सगळी जबाबदारी दिली होती . याच कार्यक्रमासंदर्भात माझी आणि तिची ओळख झाली . तीच काम हॉल मधील डेकोरेशनच होत आणि माझी जबाबदारी सकाळी हॉलची व्यवस्था बघणे होत . कारण मी कॉलेजवळच रूमवर राहत होतो .  याचीच तयारी करताना मला कळल कि हि वाटती तेवढी शांत नाहीये . तेंव्हा पासून आम्ही थोडंथोडं बोलत लागलो .


जशे कॉलेजचे दिवस जात होते , तशे आमच्यातली मैत्री वाढू लागली . ब्रेक मध्ये ती आणलेली टिफिन माझ्यासोबत शेअर करत होती आणि बाकी कोणताही प्रॉब्लेम तिला आला असेल तर ती माझ्यासोबत शेअर करू लागली . मला कोणताही प्रॉब्लेम आला तर ती ओळखून घ्यायची आणि मला विचारायची . ती माझ्या मनातील ओळखून होती . कधीकधी माझे खूपच वैयक्तिक समस्याही ती माहिती झाली तेंव्हा ती माझी समस्या सोडवली आणि ती जर समस्या सोडवू शकत नसली , तर मला आधार मात्र नक्कीच द्यायची. दुःखात हि नाही , तर सुखात हि ती मला साथ द्यायची . माझ्या वाढदिवस साजरा करण्याबाबत असोत किंवा माझ्या कोणत्याही सुखाचा क्षण असोत, ती माझ्या सोबत होती. तिच्या वाढदिवसाला मी एक छोटीशी गिफ्ट दिलो होतो आणि ते पण सहल जाण्याच्या आदल्या दिवशी ... तिच्या काही दिवसातच माझाही वाढदिवस होणार होता . पण ती तेंव्हा माझ्या सोबत नसणार होती. कारण तेंव्हा मी सहलीत असणार होतो आणि ती सहलीला येणार नव्हती .तिला त्याबद्दल दुःख हि वाटलं होत .


तिच्या घरचे मात्र कडक होते . म्हणून ती घरी लवकर जात असे . असेच दिवस गेले . शेवटचा सेमिस्टर आला . तोपर्यंत तिच्या सोबतचा क्षण खूप आनंदात जात होते . शेवटचा निरोप समारंभाची कार्यक्रम झाली . पण त्यात मी तिला काहीच बोलू शकलो नाही किंवा तीही काही बोलली नाही . याच खंत मला आजही वाटतो . पण नंतर परीक्षा होणारच होती कि कोरोना सारखी महामारी आपल्या देशात येऊन टपकली . परीक्षासंदर्भात का होईना मी तिला भेटलो असतो , पण असं नाही झालं . 


तेंव्हा आमची परीक्षा ऑनलाईनच झाले आणि आमची भेटण्याची एक संधी होती , तीही नाही भेटली . कोरोनाच्या त्या दिवस सारल्या नंतर मी माझ्या शहरातून परत माझ्या कॉलेजकडे जाण्याची योजना करू लागलो . तिथे जातच आहे , तर एकदा तिला कॉन्टॅक्ट करून तरी पाहुयात म्हणून कॉन्टॅक्ट केला . तर मला कळलं कि जॉब करू लागली होती . मी येत असल्याचं सांगितलं तर ती भेटण्यास लगेचच तयार झाली आणि तीही जॉबवरून फक्त काहीवेळासाठी येणार होती . मी तिथे पोहचलो , तर ती मला भेटली आणि माझ्या वाढदिवसाचा राहिलेला गिफ्ट मला दिली . ते लहानस गिफ्ट खूप काही सांगून गेलं . तेंव्हाही मी काही बोलू शकलो नाही . कारण तिला लवकर निघावं लागलं . 


त्यानंतर ती अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहे . बाकीचे सगळे कॉन्टॅक्ट सोडून गेले खरे पण ती कॉन्टॅक्ट मध्ये आहे . शेवटी एवढंच सांगतो कि मैत्रीला कोणताही शब्द पुरु शकत नाही , पण काही शब्दात मी ते मांडलो . तिला फक्त हेच सांगू इच्छितो कि माझ्यासोबत मैत्री केल्याबद्दल धन्यवाद


Rate this content
Log in