Suman kamble

Others

3  

Suman kamble

Others

मैत्री - एक रूप असेही भाग - 3

मैत्री - एक रूप असेही भाग - 3

3 mins
272


कॉलेज सुटल्यानंतर विहन घरी येतो . फ्रेश होऊन हॉल मध्ये येतो . आजी : आई अजून आली नाही का ? ( विहनाची आई एक NGO चालवत होती . ) नाही अरे अजून नाही आली ति येईल ईतक्यात . मग कसा गेला आजचा दिवस ? अंग आज्जी खूप छान गेला आजचा दिवस , खूप छान कॉलेज आहे . आणि माझा एक मित्र पण झालं रोहन नाव आहे त्याच आणि काय ? पुढे बोल , अंग आजी मी क्लास शोधताना एका मुलीला माझा धक्का लागला आणि ति खाली पडली . मग ? काय मी तिला सॉरी बोललो , माझा चुकून धक्का लागला होता तिला माझ लक्ष नव्हत . 

जाऊदे रे तू मुद्दाम नाही ना केल काही मग जाऊदे . 

काय गप्पा चालल्या आहेत मला पण सांगा ? विहानची आई आत मध्ये येत म्हणाली . 

आजी : काही नाही कॉलेज कस आहे विचारत होते . 

सुमती : मग विहान कस वाटल कॉलेज ? शिकवायला सुरुवात केली असेल ना ? 

विहान : खूप छान आहे कॉलेज , एकदम फ्रेश वातावरण आहे . माझा एक मित्र पण झालं . हो शिकवायला सुरुवात झाली आहे . रोहन मला मदत करणार आहे स्टडी मध्ये . 

  रेवा , अवनी , नेहा पण घरी पोहचतात . आणि बाय बोलून निघतात . रेवाचा हात थोडास दुखत असतो हात धरून ती घरात येते . 

आई : काय गं रेवा हात पकडून का तशी उभी आहेस ? काही लागले का तूला ?

रेवा : हो अगं सकाळी पडले मी कॉलेज मध्ये . 

आई : काय गं नीट बघून चालत येत नाही का तूला , अशी कशी गं वेंधळी तू . 

रेवा : अगं आई मी निटच चालत होते , बर जाऊदे मला भूक लागली आहे खायला दे काही तरी मी आलेच फ्रेश होऊन . 

अवनी : आई मी नेहा आणि रेवा कडे जाऊन आले .

काय गं अवनी दिवस भर तर तुम्ही सोबत असताना मग रात्री टेरेस वर जाऊन काय करता ?

अग आई आलेना पाच मिनिटांत , तुझी पाच मिनिटे म्हणजे तास भर तू काय येत नाही. 

काय गं अवनी आज पण आईने थांबले काय तूला ? नेह अवनी ला म्हणाली . अगं तीच सोड आज तर आई मला येऊन देत नव्हती म्हणाली हात दुखतोय तर झोप म्हणून . 

अवनी : काय गं रेवा हात अजून दुखतोय तुजा ? 

रेवा : नाही अग आता नाही दुखत . 

नेहा : काय गं रेवा तू तर खूप झापल असेल ना त्याला ? बिचारा एक तर त्याची चुकी नव्हती . 

रेवा : काही बिचारा नव्हता तो , त्याने मुद्दाम केल असणार बघ , सॉरी सॉरी बोलत होता , तरी मी जास्त काही नाही बोलले त्याला परत माझ्या वाटेला जाऊदे त्याने मग सांगते त्याला . 

नेहा : हम्म मला माहीत होते तू शांत कशी बसणार , तुझा राग चांगलाच माहिती आहे मला , आणि तो कशाला आता तुज्या वाटे जाईल तो तर तुझ महाकालीच रूप बघून पळून जाईल . 

रेवा : अच्छा म्हणजे तूला म्हणायचे का मी खूप रागीट आणि खडूस आहे तर ? 

नेहा : हम्म ,हो 

तूज्या तर अस म्हणत रेवा नेहाच्या मागे पळाली , त्यांची ही टॉम अँड जेरीची भांडण बघून अवनी पोट धरून हसत होती . शेवटी ति मध्ये पडली , तुमच भांडून झाले असेल तर जायच का आपण ? मग तिघींनी एकमेकींना गुड नाइट विश करून निघतात . रोजचा दिवस जरी सोबत घालवला असला त्या रोज रात्री टेरेस वर भेटायच्या गप्पा मारायच्या , मस्ती करायच्या आणि मग घरी जायच्या . 

ईकडे विहान रात्री झोपताना विचार करत होता . उद्या तिला परत एकदा सॉरी बोलतो . एकाच क्लास मध्ये आहोत आणि माझ्या मुळे बहुतेक तिच्या हाताला पण लागलेय दिसतय . 

दुसऱ्या दिवशी विहान लवकरच कॉलेजलला येतो आणि रेवाला शोधत असतो पण ति अजून आली नसते . तेवाढयात रोहन तिथे येतो , काय रे आज लवकर आल तू ? हम्म एक काम होत , आणि तो रोहन ला कालचा प्रसंग सांगतो . 


आत बघू रेवा काय म्हणते विहनाला तो पर्यंत stay tune gay's आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा नाहीतर मला कस कळणार तुम्हाला स्टोरी आवडते की नाही ?   


Rate this content
Log in