Shrikant Kumbhar

Abstract Tragedy

3.5  

Shrikant Kumbhar

Abstract Tragedy

मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह (M.R.)

मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह (M.R.)

2 mins
77


मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह हा शब्द ऐकला की सर्वांना आठवतो तो एकच शब्द तो म्हणजे 'M.R'. मग M.R. म्हणजे कोण 'अरे म्हणजे तू तोच ना जे डॉक्टर च्या क्लीनीक मध्ये लायनीत उभे असता'. 


हो तोच मी. मी M.R. जो एका डॉक्टर ला भेटण्यासाठी दोन दोन तास उभा असतो. जो एका मेडिकल वाल्याकडे जातो आणि एक मिनिटांचा वेळ घेण्यासाठी 4-5 फेऱ्या मारतो. कधी कधी अपमानित होतो तरी पुढच्या वेळेस त्याच केमिस्ट च्या माणसाला स्मित हास्य देऊन भेटतो. 


हो तोच मी. ज्याच्यासाठी एखाद्या हॉस्पिटलमध्ये बसण्यासाठी कधीच जागा नसते. एखादा पेशंट आला तर तो लगेच उभा राहण्याचं सौजन्य सुद्धा दाखवतो .


हो तोच मी. जो एखाद्या ठिकाणी वेटिंग मध्ये बसलेला असतो आणि सीट्स रिकाम्या असून सुद्धा एक आवाज येतो... " M.R's बाहर जाइये... ये आपके बैठने के लिये जगह नही है". आणि तो तोंडातून एक शब्द सुद्धा न काढता बाहेर जातो. 


हो तोच मी. जो दिवसभर जवळजवळ 10 किलो वजनाची बॅग घेऊन फिरतो. आणि डबा खाण्यासाठी एखादा बस स्टॉप किंवा गार्डन शोधतो. आणि जेवता जेवता त्याला एखादा कॉल आला की डबा तसाच टाकून त्या डॉक्टर ला भेटण्यासाठी पळतो. 


हो तोच मी. हो मी सुद्धा एक तुमच्या सारखाच माणूस आहे. जो त्याचं काम प्रामाणिकपणे करायचा मनापासून प्रयत्न करतो. जो सर्वांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो. ज्याला भेटेल त्याला स्माईल देतो. मग हे सर्व त्याला परत का मिळत नाही? काय अपेक्षा असते त्याची? समोरच्याकडून फक्त थोडा रिस्पेक्ट, थोडीशी आपुलकीच तर अपेक्षित असते त्याला. आणि त्या माणसाला माणूस म्हणून तरी माणुसकीची वागणूक मिळावी हीच तर अपेक्षा असते. 


हो तोच मी. एवढा वाईट असतो का ओ तो माणूस? की त्याला हाच प्रश्न पडावा की मी खरंच माणूस आहे का? 


माझ्या सर्व 'मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह' मित्रांनो तुमच्या कामाला माझा मनापासून सॅल्यूट आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract