Meghana Suryawanshi

Others

3.7  

Meghana Suryawanshi

Others

महारथी अंगराजना पत्र

महारथी अंगराजना पत्र

3 mins
120


                  || श्री ||


                         महारथी अंगराज कर्ण,

                         रा - स्वर्गलोक (------) 

                        दिनांक - 5 फेब्रुवारी, 2021. 


आदरणीय, 

      द्वापारयुगे महाभारत धर्मयुद्धातील कौरवसेनेचे सरसेनापती आणि युवराज दुर्योधन यांचे परममित्र महारथी अंगराज कर्ण यांना सादर प्रणाम. माफी असावी, आपण समोर असता तर दंडवत घातला असता परंतु, पञातूनच प्रणाम स्विकार करावा. आज द्वापारयुगातील महारथीस कलियुगातील एका सामान्य युवतीने संदेश लिहीने म्हणजे आपल्या करीता आगळीकच असेल ना! आपणास एक राधेय कर्ण म्हणून नाही तर, एक अंगराज म्हणून पञ लिहीले आहे. पञाची शैली आपल्यासारख्या कुशल व्यक्तीमत्वाने समजून नाही घेतली तर ते नवलच. एक राधेय म्हणून आपण कायम भावनेत जगत आलात आणि अंगराज म्हणून अधर्मात धर्म पारखण्याची समज आपल्याकडे नक्कीच आहे. कायम वचनांचे पक्के असणारे तुम्ही दानवीर कर्ण, अधर्मीय असणाऱ्या युवराज दुर्योधनांची साथ देऊन त्यात धर्माचे बीज पेरू लागलात हा आपला अतातायीपणा नाही का? मिञ प्रेमापोटी आपण नकळतपणे अधर्म करून बसलात. जन्माने एक क्षत्रिय राजकुमार असूनही आपल्या वाट्यास सदैव कष्ट आणि आपमानच आला. माता कुंतीच्या एका चुकीचे परिणाम जीवनभर सहन करावे लागले. असो.


आपण सदैव आपले जीवन परिवर्तनाच्या क्रांतीचे बीज पेरण्यात घालवले. अर्थातच द्वापारयुगातील दृढ परंपरा आणि सखोल विचारांत एकट्याने लढा देणे तसे कठीणच. नकळतपणे युवराज दुर्योधनांची साथ या कामी आपल्यास लाभून गेली. आपणास सुतपुञ पासून अंगराज करून समाजात उच्च स्थान प्रदान करणाऱ्या युवराज दुर्योधनांस तरी संपूर्णतः अधर्मीय कसे म्हणावे? तशी युवराज दुर्योधनांची सर्वांना समानतेच्या दृष्टीने पाहण्याची समज एकमेव कारण आहे काही काळासाठी स्वर्गप्राप्तीचे. सर्व जनतेला समानतेच्या भावनेतून पाहण्याचा आपल्या दोहोंचा दृष्टीकोन खरचं वाखाणण्याजोगा आहे. माफी असावी! परंतु, आम्ही द्रौपदीस वेश्या म्हणण्याच्या आपल्या भुमिकेत अधर्म तर, दानवीर भुमिकेच्या पाठील धर्म पाहिला. परंतु, परिवर्तनाच्या युगाचे स्वागत करण्याची किंमत आपणास जीव देऊन चुकवावी लागली. 


      अंगराज फक्त युग बदलेले पण, कालानुरूप चालत आलेल्या घटना आज ही तशाच आहेत. आजही द्रौपदी, पांडव, कौरव आणि महाभारतातील हर एक भुमिका अस्तित्वात आहेत पण फक्त महाभारतची जोड त्यास नाही. आज ही प्रत्येक द्रौपदी पांडवांकडे मदतीचा हात पसरते परंतु पुर्वीप्रमाणेच त्यांची झुकलेली मान अजूनही तशीच आहे. सतयुगातील सीतेच्या रक्षणाप्रती रामाने केलेले रामायण आणि द्वापारयुगातील द्रौपदीच्या चारित्र्य रक्षणाप्रती सन्मान प्राप्त करून देण्याचे अर्जुनाचे साहस, नाही कोणत्या रामामध्ये राहिले आहे अथवा नाही कोणत्याही अर्जुनात राहिले आहे. पुर्वीप्रमाणेच अधर्मीय अरण्यात धर्माचे इवलासा अंकुर फुटतो, पण तो उगायच्या आतच खुडून टाकला जातो. कधी युगांयुगे चालत आलेल्या विचारांचा तर कधी त्या विचारांमुळे एखाद्याचा नाहक बळी जातो. महाभारतातील महाराणी गांधारी प्रमाणेच प्रत्येकजण डोळे बंद करून वाईट गोष्टींस प्रवृत्त करतो. प्रत्येकवेळी खऱ्याची साथ देऊन धर्म जपणारे धर्मराज युद्धिष्ठर ही आता अस्तित्वात नाहीत. काही भिमांच्या बाहू फक्त सौंदर्याप्रती फुलल्या आहेत एखाद्याच्या रक्षणासाठी नाहीत. पैशांच्या डोंगरामागे बोगस नकुल आणि सहदेव तयार झाले आहेत. आज ही लाखो कर्ण आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत, समाजातील रूढी परंपरांचा त्याग करून पुर्ण समाजास एकत्रीत आणावयाचे काम करीत आहेत. पण, त्या मार्गावर निशस्ञ महाभारत आहेच. द्वापारयुगात महाभारत नंतर क्षुद्र जनतेस थोडाफार सन्मान भेटला पण, आज त्यास जनतेस पुर्ण सन्मान प्राप्त करण्यासाठी दारोदार भटकावे लागते, त्याचे काय अंगराज?


     आपले स्वप्न असणारे समानतेचे आरक्षण फक्त कागदावरच आहे. धर्म, जाती आणि वर्ण कोणी लागु केले याचे उत्तर आपल्याकडेही नसावे बहुधा. शतरंजच्या खेळात आज ही खऱ्या लोकांची प्रामाणिकता दावावर लागते. टेबलाखाली खरेपणा विकला जातो. सोंगट्यांच्या डावामागे कितीतरी जीवन उध्वस्त होतात. युगाचे फक्त नाव बदलले गेले आहे अंगराज, गोष्टी तर होत्या तशाच आहेत. द्वापारयुगातील परिवर्तनाचे स्वप्न सत्यात उतरले आणि युगांयुगे हे विचार जपले जातील अशा अंध विचारांत कसे काय गाफील राहिलात आपण? हाच आपला अंधविश्वास दुर करण्यासाठी आपणास पत्र लिहिले. युगे बदलत रहातील पण पुर्ण परिवर्तन येईल? की प्रत्येकवेळी त्याची किंमत महाभारत सारख्या रक्तरंजित प्रलयाने चुकवावी लागेल? तसदीबद्दल क्षमस्व! 

   कळावे, 

                              आपली नम्र, 

                               अ. ब. क. 


Rate this content
Log in