Ajinkya Rathod

Abstract

2  

Ajinkya Rathod

Abstract

मी वेळ मात्र गमावली

मी वेळ मात्र गमावली

1 min
122


 आयुष्याच्या परीक्षेस जाता, भूक मला लागली...

      त्या भुकेने व्याकुळ झालेल्या चेहऱ्याकडे बघून..

        माझी पाऊले मात्र जागेवरच थांबली.....

         दोन घास जेवल्यावर, भूक माझी मिटली...

   भूक मिटल्यावर चालता चालता तहान मला लागली...

         स्मशानातील विहिरीने तहान माझी भागवली...

     एवढं सगळं करता करता, बस मात्र माझी हुकली...

         मग कळून चुकलं मला,मी वेळ मात्र गमावली..

         वेळेने खेळली मग तिची चाल...

          केले मला तिने बेहाल...

       माझ्या जगण्याचं कुठंच मिळेना सूर-ताल..

       क्षणापुरता झालो होतो मी कंगाल...

  शोधूनही कुठंच दिसतं नव्हता मला,माझा भविष्यकाळ

         दयनीय अवस्था झाली....

        गावातील कुत्रंही मला विचारणा झाली..

     शोधूनही सापडत नव्हती, मला माझीच सावली..

  मी एकटाच राहिलो होतो,सगळ्यांचीच इथं लग्न झाली.

 मन रडत होता एकटाच मनाच्या कोपऱ्यात आक्रोश करून

  विचारत होता सारखं मला,  का रे ती वेळ तू गमावली ....

       वेळेची गोष्ट मला नाही पावली...

  समोर बघत होतो, मांजर क्षणात त्या उंदरावर धावली...

क्षणभरही झाला असता उशीर, तर राहिली असती ती उपाशी...

    पण त्या क्षणाचीही किंमत तिला कळली...

  म्हणून आयुष्यात एक दिवस पुन्हा ती मजेत जगली....

   मन मात्र माझं जळत होता मेणबत्ती सारखा मनात..

   विचारत मला तोच प्रश्न, का रे तू वेळ ती गमावली....           


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract