Mitesh Kadam

Others

4.7  

Mitesh Kadam

Others

मला एक बहीण हवी...

मला एक बहीण हवी...

3 mins
1.6K


वेदांत... लहानपणापासून तो एकटाच वाढला त्याच्या सोबत खेळायला कुणीच नसायचं तो सतत आई बाबांना म्हणायचा आई बाबा मला एक लहान बहीण द्याल का आणून???


त्याला कुणीतरी सांगितलेल असत की देव बाप्पा येतो आणि बहीण भाऊ देऊन जातो. तो लहानगा सतत देवाला सांगायचा की मला एक गोड गोंडस अशी बहीण दे पण कधी आई बाबांनी त्याच ऐकल नाही आणि कधी देव बाप्पा ने ही त्याच ऐकल नाही.


कालांतराने तो शाळेत जायला लागला शाळेत खुप साऱ्या मुले मुली असायचे पण त्याच्या मनात एकच खंत असायची की माझ्या शाळेतील सर्वाना एक भाऊ आणि बहीण आहेत मी एकटाच आहे. देवाने का मला एकट ठेवलं असेल की काहीतरी चुकीचं केलं की???


एके दिवशी तो संध्याकाळी शाळेतून घरी आला आणि देव घरात जाऊन मुसमुसत रडत होता आई ने पाहिलं की आपला वेदांत घरी आलाय वाटत पण आज मला आवाज न देता रडत का बसला आहे हे बघण्यासाठी ती देव घरात जाते?????


आई:- काय झालं बाळा??

वेदांत:- मला बहीण हवी माझ्या सोबत खेळायला मी एकटाच आहे देवाने मला एकट्याला का आणलं माझ्या सोबत एक बहीण पण आणायची होती ना त्याला समजत नाही का ????

आई:- अरे बाळा अस नाही काय तो देव बाप्पा खुप कामात असल्यामुळे तुला बहीण नाही आणू शकला मग त्यात रागवण्याच कारण काय???

वेदांत:- शाळेतील मुलं बोलत होती की तू वाईट आहेस म्हणून तुला बहीण नाही दिली?????

आई :-अस काही नाही बाळा ते तुला मुद्दाम चिडवण्यासाठी तस बोलत होते तू जा बघू आधी फ्रेश हो मग तुझ्या आवडीचे लाडू देते मी तुला


तो तसाच पाय आपटत हात पाय धुवायला निघून गेला रात्री त्याचे बाबा आले तोवर वेदांत झोपला होता त्यांनी विचारलं काही खाल्लं का त्यांनी एवढ्या लवकर कसा काय झोपला आज तो

आई म्हणते त्याला बहीण हवी कुठून आणूया त्याला बहीण..........


मला एक बहीण हवी...................


प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत भांडणारी,

प्रत्येक रक्षाबंधन च्या दिवशी राखी बांधणारी,

त्याचे खुप खुप लाड करणारी,

प्रत्येक भांडणात आई बाबांना मध्ये आणणारी,

ती घरात नसेल तर घर मोकळं मोकळं वाटणारी,

स्वतःचा खाऊ खाऊन माझा खाऊ मागणारी,

आई नसताना आई च प्रेम देणारी,

आई च्या जेवणाची नक्कल करणारी,

देखणी नसली तरी सतत आरश्या समोर नटणारी,

सतत दादा दादा करणारी मला एक बहीण हवी..... होती


आज तो तरुण झालाय त्याला त्याच्या आई बाबांनी दत्तक घेतले होते हे त्याला वयात आल्यावर त्याच्या आई बाबांनी सांगितले. त्यावेळी जर एखादी मुलगी दत्तक घेतली असती तर तिच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च येऊ नये म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेतला कारण मुलगा आई वडिलांच्या म्हातारपणाचा आधार असतो आणि मुलगी हे ओझं असत म्हणून अनाथ मुलींना लवकर कोणीही दत्तक घेत नाही आजही खुप भेदभाव केला जातो मुला मुलींच्या मध्ये हे चित्र कधी बदलेल देव जाणे


पण त्याला नेहमी हीच खंत असायची मला एक बहीण हवी...


पण आज वाटत की खरंच मला बहीण नाही ते खुप बर आहे आज तर ती असती तर ती कितपत सुरक्षित असती समाजात काही कल्पना नाही याची पावला पावलावर नराधम उभे आहेत तिचा डोळ्यानेच बलात्कार करणारे नराधम आहेत शाळेत, कल्लासेस, ऑफिस, समाजात नुसते नराधम आहेत ती कुठेच सुरक्षित नाही. घरातून निघाल्यापासून तिला शाळेत, ऑफिसात जाई पर्यंत स्वताचे कपडे सांभाळावे लागतात. आणि नकळत शरीराचा एखादा भाग दिसला की लोक अशी बघतात की त्यांनी कधी हे चित्र पाहिलच नाही आणि त्यावरून मुलीवर वाईट संस्कार झालेत असे दोष लावले जातात.


जर प्रत्येक पुरुषाने हे जाणून घेतले पाहिजे की आपण दुसऱ्याच्या आई बहिणीवर वाईट नजरेने पाहतो त्याच नजरेने जर कोणी आपल्या आई बहिणीकडे पाहिलं तर तळ पायाची आग मस्तकात जाते तशीच आपण पाहणारी स्त्री सुद्धा कुणाचीतरी आई आणि बहीण आहे. पुरुष कधी स्त्री किती त्रास सहन करते यावर विचार करीत नाही. महिन्यातील पाच दिवस म्हणजे नरकयातनेपेक्षा कमी नसतात पुरुष त्यावरूनसुद्धा त्यांची खिल्ली उडवतात पण ते त्यांनाच माहिती की किती त्रास होतो.


गर्भधारण झालेल्या स्त्रीला बघून आपण हसतो पण कधी विचार करावा की अडीच ते तीन किलोचा गोळा पोटात ९ महिने ९ दिवस तळहातावरील भाजलेल्या फोडासारखा जपावा लागतो. अनुभव घ्यायचा असेल तर एक दिवस रात्र अडीच किलोचा गोळा पोटाला बांधून फिरावं तेव्हा नक्की कळेल की आपल्या आईने ९ महिने ९ दिवस किती त्रास सहन केला असेल.


छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त पायांची नखे बघून त्यांच्या मुखातून उद्गार निघाले होते "अशीच आमुची आई असती,

आम्हीसुद्धा इतकेच सुंदर झालो असतो"


मला देवाने सख्खी बहीण नाही दिली पण नकळत इतक्या गोड बहिणी दिल्या की तिची कधी कमी भासली नाही.


Rate this content
Log in