Malati Semale

Horror Action

2.2  

Malati Semale

Horror Action

मरणाच्या दारातून

मरणाच्या दारातून

3 mins
23.5K


      मार्च, एप्रिल महिना म्हटला की मुलाच्या परीक्षेचा काळ असतो.वेळेवर परीक्षा सेंटरवर पोहोचणे, रोलनंबर बघणे,अर्धातास आधीपासून बाकावर बसून राहणे , एकदाचा पेपर हातात आला, की मग पेपरातील प्रश्न पाहणे, नेमके अचूक उत्तर येत असलेले प्रश्न शोधणे, उर्वरीत प्रश्नावर प्रभुत्व संपादन करून तेही सोडवण्याची जिद्द, शेवटी पेपर दिल्यावर, मला गुण किती मीळणार याचे चिंतन, हे सगळ परीक्षा काळात करावं लागतं 

     राजूच्या आठवणीतला तो दुःखाचा दिवस नेहमीप्रमाणे त्या दिवशी राजू पेपरला गेला होता. राजुच्या घरापासून चाळीस कि.मी. अंतरावर परीक्षा केंद्राचे गाव होते. पोहोचायला दीड ते दोन तास वेळ लागायचा. राजू त्या गावला पोहोचला. एप्रिल महिना असल्याने ऊन खूप तापलेले होते, अंग घामानी भिजलेले होते, कंठ सुकलेला होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र पण होते. तो आपल्या मित्रांना म्हणाला, आपण थोड थंड पाणी पिउ आणि पेपर द्यायला सेंटरवर जाऊ. त्याला खूप थंड पाणी प्यावस वाटल्यामुळे तो रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या कोल्ड्रीकच्या दुकानातून बर्फ असलेली बिसलरी बाँटल घेतली . पहिल्यांदा आपल्या मित्रांना पिण्यास दिले व नंतर तो स्वतः बाँटल तोंडाला लावून व्याकुळ मनाने घटा घटा पाणी प्यायला लागला. त्याक्षणी काय झाले कुणास ठाऊक पाणी पीता पीता एक बर्फाचा तुकड्यासोबत बाँटल च्या तोंडाजवळ असलेली रिंग एकाचवेळी सरळ त्याच्या तोंडात गेली.व गळ्यात जाऊन ते फसले, क्षणात त्याचे बोलणे बंदच झाले. श्वास रोखायला लागला, मित्रांना हाक देतो म्हणावे तर त्याचा आवाज़ जात नव्हता, जनू् कंठच निश्चल झाले होते. मित्रांना सांगण्यासाठी हातवारे करत होता. पण त्याचे हातवारे मित्रांना समजत नव्हते. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या .त्याचे प्रेमळ आई बाबा त्याला आठवले. मी आता क्षणात संपलोय की काय असे त्याला वाटायला लागले होते .तेवढ्यात समोरच्या पाण्याने भरलेल्या पिंपाकडे राजूचे लक्ष गेले.तो धावत जाऊन त्या पिंपातले पाणी घटा घटा पिऊ लागला. तो पिंप ऊन्हात असल्यामुळे त्यातील पाणी गरम आलेले होते.गरम पाणी पिल्याने लगेच त्याच्या गळ्यात अडकलेला बर्फाचा तुकडा विरघळून मोकळा झाला .व बाँटलची रिंग पण पोटात गेली .तेव्हाकुठे राजूला श्वास आले होते .आणि तो बोलायला लागला होता. क्षणभरापुर्वी स्वतः वर घडलेला प्रसंग राजूने आपल्या मित्रांना सांगताच ,मित्र बाँटलची रिंग बाहेर पडण्यासाठी ते राजूच्या मानेवर व पाठीवर बुक्यांनी मारू लागले .राजू वाकून होता. काही वेळातच राजूला गरम पाणी पिण्यामुळे होय की काय लगेच खूप उलट्या व्हायला लागल्या. त्या उलट्यातच पोटात गेलेली रिंग पण बाहेर पडली. राजूला आता खूप बरे वाटत होते. पाच मिनीट तो नि:शब्द खुर्चीवर बसला व नंतर पेपर देण्यासाठी परीक्षा हालकडे गेला.

      राजुच्या अंगातील थरकाप अजून कमी झालेले नव्हते. तो पूर्णपणे स्वतःला मरणाच्या दारातूनच बाहेर आल्याचे समजत होता. परंतु पेपर हातात त्याच्या त्याची बुद्धी थोडी निश्चल झाल्यासारखी वाटत होती. तरीही, आपल्या मनावर एकाग्रता आणून पेपर सोडवणे सुरू केले. ईश्वराचीच कृपादृष्टी की मला आज पेपर देण्यास जीवनदान दिले. असे समजून त्याने धडाकेबाज पेपर सोडवला.

      पेपर देऊन घरी परतला.घरी येताच आईला कडकडून मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. आई बाबा घाबरून गेले. काय झाले आज.कधीच असा न रडणारा धिटाई असलेला. आज आल्या आल्या का रडतोय. आईच्या डोळ्यांनी तर अश्रूंची वाटच मोकळी केली होती. रडून थोडे शांत झाल्यावर राजुने,आपली आपबिती आपल्या आई बाबांना सांगितले.आता बाबांचे पण डोळे दुःखात डुबून गेले होते.राजुच्या जीवावर खूप मोठे संकट ओढवले होते. ईश्वराची कृपाच की काही झाले नाही. सर्वच ईश्वरालाच धन्य मानू लागले.

      जर का राजूचे त्याक्षणी काही बरेवाईट झाले असते, तर त्याचे आई, बाबा सर्व लोक नातेवाईक त्यालाच दोषी मानले असते.काहीतरी खाल्ला असेल? काहीतरी पिला असेल? उष्माघात झाला असेल? असे अनेक तर्क वितर्क काढले असते. राजूचा मृत्यू बर्फाचा तुकडा व बाँटलची रिंग गळ्यात फसल्याने झाले होते, ते फक्त त्यालाच माहित होते. आणि ते काही सर्वांना तो सांगू शकला नसता.

    

.......

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror