vaishali salunkhe

Others

2  

vaishali salunkhe

Others

निस्वार्थ प्रेम

निस्वार्थ प्रेम

2 mins
117


   प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं

  प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं


    खरच प्रेमाची व्याख्या समजली तर खूप सोपी अन् खूप सुंदर आहे. 

     आजही जगाला माहीत नाही की राधा कृष्णाचं नात काय होत तरीही लोक त्यांच्या प्रेमाची शपथ घेतात त्यांची पूजा करतात इतकं पवित्र असत प्रेम . 

       प्रेम म्हणजे निस्वार्थ भावना जी मनात कधीही कोणासाठी ही उचंबळून येते .

    आई , वडील ,भाऊ ,बहीण, नवरा ,मुलं यांच्यावर जे केलं जातं ते प्रेम .

       मग एक प्रश्न पडतो प्रेम फक्त रक्ताच्या नात्यावर केलं जातं का ? एका बंधनात बंधलो गेलो म्हणून केलं जातं का ? प्रेमाची व्याख्या इतकी संकुचित आहे का ? 

     तर याच एकच उत्तर ते फक्त " नाही " , कारण जिथे मर्यादित असत तिथे प्रेम नसत जे अमर्याद असत तिथंच प्रेम दिसत .

     मित्रावर किंवा मैत्रिणीवर केलेलं निस्वार्थ प्रेम म्हणजे लफडं कस काय असू शकत ? ही पिढ्यानपिढ्या चालून आलेली समाजाची मानसिकता आहे . जी बदलणे कठीण आहे , असो......

       प्रेम म्हणजे फक्त बंधनात बांधन नाही किच एकत्र राहणं नाही , ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशी आपण लग्न केलंच पाहिजे असं ही नसत . 

       खरतर आज अशी किती बंधन ,आणि नाती अशी आहेत की ज्यात प्रेम दिसत नाही . 

       पण माझ्या मते स्त्री -पुरुष एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करू शकतात आणि यासाठी त्यांच्या नात्याला कोणत्या नावाची गरज आहे असं मला तरी वाटत नाही . 

      एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे , एकमेकांना संकटात साथ देणे , एकमेकांचे मनोबल वाढवणे , एकमेकांच्या सुखासाठी कायम प्रयत्न करणे , एकमेकांना समजून घेणे , आदर करणे , काळजी करणे म्हणजे प्रेम .

आणि हे सगळं ज्या नात्यात असेल तिथे प्रेम असणारच ना . मग त्यात गैर कुठे ? 

मग एक स्त्री पुरुष निस्वार्थ भावनेने स्वतःच्या मर्यादा राखून एकमेकांवर प्रेम करत असतील तर ते चूक का वाटावं? 

का तर त्यांच्यात कोणतं नात नाही म्हणून .....

कोणाशी तरी बोलून मन हलकं होत असेल तर का बोलून नये , कोणाशी तरी बोलून आनंद वाटत असेल तर तो आनंद का अनुभवू नये , आपला आनंद कोणाशी तरी वाटून जर द्विगुणित होत असेल तर का वाटू नये . 

कोणाचा तरी सहवास हवाहवासा वाटण , बोलणं आवडणं , आपलंसं वाटणे , या सगळ्या गोष्टी मनातून आवडत असतील तर का करू नये , 

मग ती व्यक्ती स्त्री की पुरुष का बघितलं जात .

त्यानुसार त्यांच्या प्रेमाला नाव दिल जात जर ती स्त्री असेल तर चांगल्या जीवाभावाच्या मैत्रणी आणि जर तो पुरुष असेल तर त्या दोघांच्यात लपडं हा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन ...... 

आणि मैत्रीत प्रेम असतच मग जर स्त्री पुरुष एकमेकांचे चांगले मित्र मैत्रिणी असतील आणि त्याच्यात जर निस्वार्थ प्रेम असेल तर ते प्रेम आणि ती मैत्री नक्कीच पवित्र आणि अतूट असते . 

 फक्त गरज आहे ती दृष्टी बदलण्याची 

दृष्टी बदलली की दृष्टिकोन आपोआप बदलेल

 प्रेम म्हणजे प्रेम असत सगळ्यांच सेम असत. म्हणून प्रेमाचे पावित्र्य राखून निवार्थ प्रेम देत रहावे आणि घेत रहावे


Rate this content
Log in