शब्दसखी सुनिता

Romance Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Romance Others

नसतेस जेव्हा तु

नसतेस जेव्हा तु

3 mins
214


       केतन आणि स्वाती दोघेही नवरा - बायको शहरात राहायचे. केतन नोकरीला होता. स्वाती पीढच शिक्षण घेत होती. केतन तिला सपोर्ट करत होता. तिला पुढे शिकायची खुप ईच्छा होती. आईबाबाही केतनवर खुप खुश होते. स्वातीला त्याने पहिल्याच भेटीत पसंत केल, लग्न वगैरे सगळ झाल. ते दोघे केतनच्या नोकरीसाठी शहरात राहायचे. त्याचे आईबाबा गावी असायचे. केतनही स्वभावाने चांगला, समजदार होता. स्वातीही संस्कारी आणि तिही समजदार साथ देणारी होती.

दोघेही आपल्या राजाराणीचा संसारात  छान राहत होते.

केतनला ऑफीसला जाताना त्याचा टिफीन पासून ते सर्व वस्तु त्याच्या

हातात द्याव्या लागत. स्वातीला याची सर्व वस्तु काढुन जागच्या जागी ठेवायची सवय लागली होती. एखाद्या दिवशी एखादी फाईल कींवा वस्तु नाही सापडली तर केतन बघण्याचहि कष्ट घेत नव्हता, तो स्वातीला आवाज द्यायचा. मग ती शोधुन द्यायची. नेमकी ती वस्तु तिथेच असायची. अस बर्‍याचदा व्हायच त्याच त्याला खुप सवय झाली होती. स्वातीही अपल्या नवर्‍याचे

खुप लाड करायची. तो ही तिला खुप जपायचा जीव लावायचा. एक दिवस असच झाल.

केतनला महत्वाची फाईल वेळेला लागत होती. पण स्वातीने तर बघितलीही नव्हती. तिला त्याने ती फाईल काल घरी आणलेली

आठवत नव्हती. तर केतन स्वातीला खुप बोलू लागला. तिच काही ऐकूनही घेतल नाही . तिला लगेच डोळ्यांत पाणी आल तरी ती फाईल सगळीकडे शोधत होती पण नाही  मिळाली. शेवटी केतनने रागात स्वातीला खुप बोलला आणि रागानेच ऑफीसला

निघून गेला. स्वातीही त्याला रागवलेल पहिल्यांदा बघत होती. तोऑफीसला  निघुन गेला. स्वातीने सहज टिव्ही लागला. बातम्यांना कोरोना रूग्णसंख्या वाढिविषयी सांगत होते. तिला आता सगळ कस होईल थोडी सर्वांचीच काळजी वाटत होती.


   त्याच वेळेस तिच्या बाबांचा फोन आला, तिच्या आईच्या हाताला लागल होत, ती हातावर पडल्यामुळे हाताला लागल होत.

ते दोघेच राहायचे. सोबत कुणीही नव्हत. तिच्या बाबांचा आवाज ऐकुन त्यांना काय वाटतय याची तिला कल्पना आली. तिचे

बाबा हाॅस्पिटल वगैरे म्हटल की त्यांना भिती वाटायची. मग सांगितल्याबरोबर ती लगेच निघाली. तिने विचार केला केतनला

फोन करून नंतर सांगु, आता तो आज मिटींगमध्ये असेल, आधीच तो रागात आहे परत त्याला त्रास नको म्हणुन ती

ती बाबांनी सांगितलेल्या हाॅस्पिटलमध्ये पोहचते. 


     आईच्या हाताला बरच लागल होत. तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. हाताला  प्लास्टर केलेल होत. स्वातीला आईला

अश्या अवस्थेत बघुन रडू कोसळल. बाबांना ती आलेल पाहून जीवात जीव आला. या सगळ्यात संध्याकाळ झाली. ते घरी

आले. स्वाती आईची काळजी घ्यायला इथेच थांबणार होती. शेवटी ऑफीसमधुन आल्यावर केतनला आश्चर्य वाटल, की

" स्वाती मी ओरडलो म्हणुन तर नाही ना रागाने वगैरे गेली " तो मनातुन खुप घाबरला. खुप विचार त्याच्या डोक्यात येऊन गेले.

मग पटकन त्याने तिच्या माहेरी काॅल लावला. बाबांना काॅल कैल्यावर त्यांनी स्वाती आल्याच. आईला दुखापत झाल्याच सांगीतल, उलट त्यांनी काळजी घ्या. स्वातीला थोड्या दिवस तुमच्या जवळ असु द्या, तुमच्या मदतीला. तेव्हा बाबांना बर वाटल. 

स्वातीने काॅल घेतला. केतनने प्रथम तिला साॅरी म्हटल, " मी तुझ्यावर खुप रागवलो ती फाईल मिळाली मला, साॅरी.

तिनेहि त्याला लगेच माफ केल नि सांगितल " मी तर सकाळच केव्हाच विसरूनही गेले आणि मी तुमच्यावर रागवले नाही " त्याच्याही मनाला बर वाटल त्यानेच तिला आईची काळजी घ्यायला थांब सांगितल परंतु दोन दिवसांनी लाॅकडाउन पडला. स्वाती एक महीना माहेरी होती. आईही  बरी झाली होती. इकडे केतनला सगळ घरच आणि ऑनलाईन काम कराव लागे.

त्याला इतक काम कराव लागतय हे पाहुन स्वातीला कसतरी व्हायच पण तो म्हणायच मी मॅनेज करेल. तो घरातील सगळ काम

आणि इतर गोष्टी बघु लागला. एकट्याला सगळ बघाव लागे. तेव्हा त्याला स्वाती किती करते आपल्यासाठी याची जाणीव झालि. त्याला तिच महत्व कळल.  ती आहे म्हणुन मी आहे हे समजल. 

लाॅकडाउनमुळे खुप गोष्टी तो शिकला. खुप छान बदल झाला होता त्याच्यात.  तो फोनवर स्वातीला सगळ सांगायचा. ऑनलाईन काम आणि स्वतःच सगळ घरच तो करायचा. पण त्याला स्वातीची खुप  आठवण यायची. पण काय करणार हा लाॅकडाउन कडक होता. कोरोना रूग्णसंख्या वाढत होती. तिच्या आईसाठीही त्यानेही खुप तिला समजुन घेतल. तिलाही आपल्या

नवर्‍याच कौतुक वाटायच. लाॅकडाउन संपला आणि आईही आता बर्‍या झाल्या होत्या. कितीतरी दिवसांनी स्वातीला घरी आलेल

पाहुन केतनने आनंदाने तिला मिठी मारली आणी आपल्या जवळ घेतल. तिही त्याच्या मिठीत क्षणभर विसावली. त्याने तिला

सांगीतल की, " परत अस मला सोडून नाही ना जाणार, मि तुझ्याशिवाय नाही राहू शकत, आणि माझी चुक नसताना मी

तुझ्यावर ओरडायचो. पण आता नाही मला सगळ समजलय. माझ काम मी करत

जाईन " स्वातीला हे ऐकुन बर वाटल. तिला वाटल हा बदल थोड्याच दिवस असेन पण नाही. केतनमध्ये लाॅकडाउनमध्ये

चांगला बदल झाला होता. हे सगळ बघुन आपला नवरा इतका सुधरलेला बघुन तिलाही आनंद झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance