Yogesh Shinde

Others

3  

Yogesh Shinde

Others

नटसम्राट_सरकार

नटसम्राट_सरकार

2 mins
1.0K



खेडेगावातुन तालुक्याच्या ठिकाणी आलेले हे जोडपे बोलण्यात दंग झाले होते.

 दवाखान्यात दाखवायला आले होते हे त्यांच्या बोलण्यातून उमजले

समोर भज्याची प्लेट अन् पोटात जाणारा एक एक घास

मुखी पांडुरंग पांडुरंगाची साद.

मला यांचा नकळत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.

मी तो घेतला देखील आणि त्यांना दाखवला देखील.

त्यांनी फोटो पाहीला आणि नविन जोडप्या सारखे दोघेही लाजले

पांडुरंग पांडुरंग फोटो पाहून त्यांनी प्रतिक्रिया दिली.


मी तिथून निघण्यासाठी वळलो पण आज्जी बाईंनी मला थांबवले 

काय करणार या फुटूचं ? या प्रश्नांने मला त्यांनी थोडं भांबवले 

मी मिश्कील हसलो ते देखील तसच हसले माझ्याकडे नजर रोखुन उत्तराच्या अपेक्षेने पाहत होते.

मी काय उत्तर देऊ याच विचारात होतो. मी का काढला यांचा फोटो ? 

यांच्याकडे पाहून माझ्या मनात प्रथम उमटलेली काय भावना होती ?


घाई होती पण उत्तर न देता निघून जाणं मला योग्य वाटत नव्हतं

मी समोरील बाकड्यावर बसलो.


आज्जी आजोबा तुमच्याकडे पाहून खरच मनातील ओलावा जिवंत झाल्यासारखे वाटले.

आजकाल मुलं आई बापाला विचारत नाहीत त्यांच्या सोबत राहत नाहीत. 

लाखौ रूपये उधळून लग्न झालेले वर्षाच्या आत वेगळे होतायेत.

स्वतःच्या स्वार्था पुढे कोणाचाही आदर नाही सन्मान नाही. रोजच्याच जगण्यात आजूबाजूला हेच पाहतोय आम्ही. पण,

तुमच्याकडे पाहून एक वेगळेच समाधान वाटले.मला माहित नाही तुमची मुलं तुम्हांला सांभाळतात कि नाही पण तुम्ही एकएकमेकांना लावत असलेला जिव मि डोळ्यांनी पाहिला आयुष्यात खुप उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिलेत संकटे आली असतिल, वाद झाले असतिल पण तुमच्या काळजी पुढं हे सारं फिकं पडले असच मला वाटले.


दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यात आणि मि त्यांच्याकडे पाहीलं

ओघळणारे अश्रू लपवले नाहीत येवढ्या निर्मळ मनाचे हे आज्जी आजोबा.


अस्सल #नटसम्राट आणि त्यांचे पाठिराखे #सरकार

दोघांनाही मला एक एक घास भरवला पांडुरंगाचा आशिर्वाद दिला 

कडकड बोटं मोडून माया केली. अश्रू बाहेर पडण्याच्या आत मि तिथून बाहेर पडलो. 


Rate this content
Log in