दिपमाला अहिरे

Romance

3  

दिपमाला अहिरे

Romance

पिवळा चाफा..(लघुकथा)

पिवळा चाफा..(लघुकथा)

1 min
44


"अरे काय तु? कधी पासून वाट बघतेय मी तुझी तीन तास झाले बघ..माझ्या तीन बसही चाल्ल्या गेल्या.. तुझ्या नादात. आता पुढची बस किती वेळाने भेटेल काय माहित? कुठे होतास तू?"

तिची आपली बडबड चालू होती.त्याचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते..

खांद्यावर टांगलेली आपली कापडी पिशवी हातात घेत.तिच्यात काहीतरी चाचपडत होता..हाताला कागदी पुडा लागताच त्याच्या चेहऱ्यावर हसु आले..

ती पुरचुंडी बाहेर काढुन तिच्या हातात ठेवतो.आणि हसुनच सांगतो 

"हे घे यांच्यामुळे उशिर झाला मला.दोन तासापासुन फीरत होतो.मिळतच नव्हती.. म्हणून यायला वेळ लागला.. सॉरी.."

हातातील कागदी पुरचुंडीवरचा दोरा काढत 

ती बोटांनी अंदाज घेते.आणि आनंदाने ओरडते "चाफा अरे व्वा." दोन चाफ्याची फुलं हातात घेत नाकाजवळ घेऊन जात ती त्याचा सुगंध आपल्या श्वासात भरुन घेते.."

तो म्हणतो हो "चाफा तोही तुझ्या आवडीचा पिवळा चाफा."

तो आणि ती दोघेही अंध तिला चाफा आवडतो म्हणून कधीही दोघांचे भेटायचे ठरले तर तो तिच्या साठी आठवणीने पिवळा चाफा घेऊन जायचा.. पिवळा असो की,पांढरा दोघांनाही दिसणार नव्हते.पण तरीही तिच्या साठी तो बाजारभर हिंडुन पिवळा चाफाच ंआणायचा... दिवसेंदिवस पिवळ्या चाफ्यासोबत त्यांचे प्रेमही खुलत होते आणि त्यांचे नाते अधिक सुगंधी होत होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance