Kavi Sagar chavan

Children

3  

Kavi Sagar chavan

Children

पप्पासोबत कुकिंग ..

पप्पासोबत कुकिंग ..

2 mins
241


माझे पप्पा खूप चांगले कुक होते . घरात बऱयाच वेळीं त्यानी बनवलेले पदार्थ खाण्या ची जन्नत मी लुटलेली आहे .पप्पा ना जेवण बनवतांना पाहून मलाही मग वाटायचं मला कधी जेवण बनवता येईल आणि हाताला चटका लागण्याची देखील भीती असायची त्यामुळे फक्त बघत राहायचो पप्पा चुलीवर चिकन बनवत असले की मग आम्ही भावंड आजूबाजूला उभे राहून गंमत पाहत काही हवं असेल तर लगबगीने जाऊन आणत त्यामुळं आम्हामध्ये चढाओढ असे ..खूप मजा यायची आजही कधी आठवलं की वाटत ते दिवस पुन्हा यावेत खूप वर्ष लोटली गेली . पप्पा आज अमच्यात नाही पण जेव्हाही आठवण येते मन उदास होऊन जातं . पुढे असेच काही योगायोग घडतं गेले .


पप्पा हॉटेवर कुक होते . त्यामुळे हॉटेलच्या लज्जतदार आणि चविष्ट व्यंजनाची चव चाखायला मिळाली . त्यावेळी असा कधी विचार केला नाही .मी हॉटेल क्षेत्रात पदार्पण करेल ..योग जुळून आले . आणि माझी सुरवात झाली . आज मी सुद्धा कुकींग करतो . जवळपास पंधरा वर्षे हॉटेल मध्ये काम केले . जेव्हा मला विचारायचे की तू तात्याचा मुलगा आहे ना ? तेव्हा उर भरून यायचा 😢 परिस्थिती ने अचानक या वळणावर आणले पण त्याचा ही एक वेगळा अभिमान होता . आता स्वतःच हॉटेल सुरू केल्यानंतर आज खूप आठवण येते पप्पा ची त्याना माझा अभिमान वाटला असता . कौतुक केलं असत पण ते नाहीत मनाला समजून सांगावं लागत की ते बघताहेत त्यांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे ..


तुम्ही कितीही मोठं काम करा जर कौतुकाची थाप देणारा बाप नसेल तर सार काही निरर्थक वाटतं . कधी कधी मी घरी स्वयंपाक करतो . त्यावेळी माझा मुलगा मला बघतो इतक्या आनंदाने त्याला बघावस वाटतं सारख मम्मी ला सांगतो माझे माझ्यासाठी बनवता आहे . मी लहान असताना अगदी असाच होतो. त्याच्या रूपाने मला लहान झाल्यासाख वाटत आणि पप्पा सोबत आहेत असं ही "  कधी तर इतका अस्वस्थ होतो की डोळ्यात अश्रू येतात आणि माझं पिल्लू विचारत की पप्पा डोळ्यात तिखट लागलं ना ..मी सवयीप्रमाणे हो म्हणतो ..

Love u Pappa miss u too


Rate this content
Log in

Similar marathi story from Children