शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Others

3  

शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Others

प्रेम हे

प्रेम हे

12 mins
370


सपना.... चल ना यार... लवकर आटोप ना तुझं... घड्याळात बघ किती वाजले... पहिलाच दिवस आहे आपला.... त्यात तू आजच बारा वाजवू नको... ये चल.. निघुया... म्हणत मी आणि माझी मैत्रिण सई ऑफीसला जायला निघालो... दोघीही एकाच गावातून पुणे शहरात

एकाच कंपनीत जाॅबला लागलो.


बाप रे, किती ही गर्दी... बससाठी.... मी पहिल्यांदाच हे असं दृश्य बघत होते... गर्दीत आम्ही दोघी कसेबसे चढलो पीएमटी बसमध्ये... स्टाॅपवर उतरलो. पाच मिनिटांवर ऑफीस होतं... पहिला दिवस म्हणून उत्सुकताही होती... आणि भितीही होती... इथला स्टाफ समजून तर घेईल ना? अशा प्रश्नांनी डोक्यात गर्दी केली... दोघीही पोहोचलो... गप्पांच्या नादात उशीर झाला होता. आम्ही सरांना 'साॅरी' म्हटलो...


आमच्या पुढे एक सर आले... आम्ही थांबलो... hi...मी अनिरूद्ध... आपले हेड सर इनामदार सर यांनी मला तुम्हांला कामाविषयी सांगायला लावलंय... तुम्ही वरच्या ऑफीसमध्ये चला सांगतो सगळ.... त्या दोघी वर गेल्या... ती कंपनी... तिथलं ऑफीस बघुन थक्क झाल्या... त्यांना खूप भारी वाटलं की आपण इथे जाॅब करणार...


अनिरूद्ध सरांनी त्या दोघींना सगळी माहीती दिली. कामाचं स्परूप समजावून सांगितल. सर्व स्टाफशी ओळख करून दिली. सर जेव्हा सांगत होते तेव्हा सपना मात्र एकटक त्यांच्याकडेच बघत होती... सईने तिला चिमटा काढला... तशी ती भानावर आली. फर्स्ट फ्लोरला ऑफीसमध्ये दोघींना जाऊन तिथे पुढे सानिका मॅडम सांगतील म्हणून ते निघून गेले.... सई तिच्या जागेवर बसली... सपना मात्र सरांकडेच बघत होती... ते होतेच तसे...


त्यांनी पहिल्याच नजरेत मला आपलंस करुन घेतलं होतं.. दिसायला हँडसम.... त्यांची पर्सनॅलिटी ही छान होती.... आमच्यापेक्षा वयाने मोठे होते ते पण

कुणीही मुलगी त्यांच्या प्रेमात पडेल असंच त्यांचं रूबाबदार व्यक्तिमत्व..  त्यांचा आवाज आणि बोलणं तर मनाला भिडणार असं होतं.... ते बोलत असले की बस त्यांनाच बघत बसावं.. मला ते खूप आवडत होते. ते म्हणतात ना.... क्रश... का... काही

हा तेच ते... तेव्हा फार काही प्रेमाबद्दल अनुभव नव्हता... सिरीयल, मुव्हीमध्ये बघायचो... तेवढंच माहीत होतं... पहिल्याच दिवशी मी त्यांना मनातच माझं मानू लागले होते. ही फिलींगच खूप छान वाटत होती...

    

मी सईला सहज म्हटलं... "अनिरूद्ध सर किती छान आहेत ना..." तर तिने माझ्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघितलं. ती लगेच मला म्हणाली... "ये सपना, यार गप्प ना.... आपला आज पहिलाच दिवस आहे आणि तू अनिरूद्ध सरांबद्दल बोलत आहेस.."   या मुली बघतेयस ना... आपल्यापेक्षा छान आहेत दिसायला... आणि त्या आपल्या आधीपासून त्यांच्यासोबत काम करत आहेत. तो सपनाजी दिन में सपने देखना छोड दो... और काम में ध्यान दो !


सपना शांत झाली आणि कामात लक्ष देऊ लागली. पहीला दिवस खुप छान गेला... सपना आणि सई एकाच फ्लॅटमध्ये राहायच्या.... आणि काय आश्चर्य अनिरूद्धही समोरच्या बिल्डींगमध्येच राहत

होते... दोघांच्याही बाल्कनीज समोरासमोर होत्या.


पहिल्या दिवशी संध्याकाळी त्यांना तिथे पाहुन मला खुप छान वाटल. चला... इथे काही प्रोब्लेम आला तर आपल म्हणणार अस कुणीतरी आहे.

आमच जेवण झाल. मी बाल्कनीत सहजच इकडे तिकडे बघत होते... समोर लक्ष गेल... तेव्हा सर फोनवर बोलताना दिसत होते... मी मात्र त्यांना पाहण्यात दंग होते. तेव्हा सई मला आवाज देत आहे, हे माझ्या लक्षातच नाही आलं.. मी ही त्यावेळेस हेडफोन लावून... त्यांना बघत मस्त romantic song ऐकत होते. सईने जवळ येऊन जोरात चिमटा काढला... आई गं लागल ना ग... त्यामुळे मी भानावर आले. तिने समोर पाहील नाही मी मनात म्हटल बर झाल....


आमच ऑफीसचं रूटीन छान सुरू होत. अनिरूद्ध सरांशी रोज कामानिमित्त बोलण व्हायच. मला त्यांच्याशी खुप बोलावं वाटायचं पण इतर स्टाफही असायचा. तेही शांत स्वभावाचे होते. कामाशी काम हा त्यांचा स्वभाव, काही काम असेल तर ते आमच्या फर्स्ट फ्लोअरच्या ऑफीसमध्ये यायचे. मुलींशी काम असेल तर बोलत. त्यांच सर्वांशी प्रेमळ वागण... समजुन घेणे यामुळे ते जास्त आवडू लागले. त्यांच्याकडून खुप शिकायला मिळायच. एकदा ऑफीसमध्ये ते आम्हा सर्व स्टाफला काहीतरी माहीती सांगत होते. सर्वांच त्यांच्याकडे लक्ष होत. मी तर त्यांच्याकडे एकटक बघत होते. माझ काय चाललय हे सईला समजल होत... तिने मला हळूच टपली मारली.


"काय ग सपना..., अशी काय सरांकडे बघत आहेस.... ये बाई तू त्यांच्या प्रेमात तर पडली

नाहीस ना...”


मी नाही ग काहीतरी काय.... माझ्या मनात काय चाललय हे सईला सांगायची गरज नव्हती.


सपना, काही नाही तेच बरय... अग अनिरूद्ध मोठे आहेत, मॅरीड असतील.


त्यादिवशी मला थोड वाईट वाटल की ते आपले आहेत, अस मनात मानून बसलेली मी असा विचारही केला नव्हता. पण काहीही असल तरी ते मला आवडत होते. रोजचे दिवस छान चालले होते. ऑफीस काम सगळ जमायला लागल. सगळा स्टाफ खुप छान आणि समजुन घेणारा आहे. नवीन मैत्रिणीही मिळाल्या. दिवसातुन एकदा का होईना... अनिरूद्ध सरांना पाहील्या शिवाय मनाला चैन पडत नव्हते. सवय झाली होती. नाही दिसले की मन बैचेन व्हायचे... दिसले की मनाला एक वेगळाच आनंद व्हायचा. सईलाही मी ते सर आवडतात म्हणुन सांगीतलेल तर शहाणी मला चिडवायची एकही संधी सोडत नव्हती.


आम्ही त्यांना morning विश करायचो. सायली एकदा चहा घेताना अनिरूद्ध सरांशी खुप बोलत होती. ती जवळची झाली होती, म्हणून त्यांच्याविषयी तिलाच विचारायच ठरवल.


बोलता बोलता मी सहजच त्यांचा विषय काढला. सायली, तु अनिरूद्ध सरांना ओळखतेस ना..


सायली - हो का ग, मी त्याला भाऊ म्हणते ना थोडफार ओळखतो... खुप चांगला व्यक्ती आहे. पण तु का ग सपना, अस अचानक विचारल ?


सपना - काही नाही गं सहजच विचारल... तो तुला बहिण मानतो... मग क्या बात है तुला तर सगळच सांगत असणार...


सायली - थोडस हसत... हो सांगतो ना... तो मुळचा मुंबईचा, पण इथे जाॅबसाठी सहा सात वर्षांपासुन राहत आहे. इथेच जाॅब करत आहे.

तिकडे मुंबईला आई आणि मोठा भाऊ त्याची फॅमिली आहे.


आणि सरांची फॅमिली ??


सायली - नाही ग त्याने लग्न नाही केल अजुन. नाही करायच त्याला...


पण का ? मी विचारल.


सायली - अग त्याच काॅलेजमध्ये एका मुलीवर प्रेम होत. तो आणि ती लग्नही करणार होते. पण शिक्षण आणि जाॅबसाठी हा बाहेर होता. तिच्या घरच्यांनी तिच लग्न लावून दिल आणि तिनेही होकार दिला. तो घरी आला. तेव्हा त्याला समजल. तो तिच्यासाठीच थांबला होता. पण उशीर झाला होता. पण त्याच तिच्यावर खर प्रेम होत मग त्याने त्यानंतर कधीच कुणावर प्रेम केल नाही.


सरांबद्दल ऐकुन वाईट वाटल ग सायली, इतक्या चांगल्या व्यक्तीबद्दल अस नको व्हायला हव होत.

सायली - हो ना ग... पण त्याची आई लग्नासाठी त्याच्या मागे लागते, मुली बघत असते म्हणुन हा गावी तीन दिवस राहतो आणि परत इकडे येतो. एवढ कश्याला... आपल्या ऑफीसमध्येही तो खुप मुलींना आवडतो. सगळे फॅन आहे त्याचे.

मी पण त्याच्याशी खुप बोलते... माझा भाऊ म्हणते म्हणुन मला हक्काने सगळ शेअर करतो.


सपना - छान आहे बाबा तुमच... आम्हाला तर कुणी भावही देत नाही... दोघीही हसायला लागतात.


सायलीने सरांविषयी सांगितल्यावर थोड वाईटही वाटल.... आणि मनाला बरही वाटल... की सध्या त्यांच्या आयुष्यात कुणी नाही. त्यांच्याशी खुप बोलाव वाटायच... ते समोर आले की मात्र सगळच विसरून जायचे... काही सुचत नव्हत. कामाचही काही बोलायच तेही मी विसरायचे. ते हसायचे... आठवल की नंतर सांग म्हणायचे.


हळूहळू सायलीमुळे सपना रोज त्यांच्याशी बोलू लागली... व्यक्त होऊ लागली. त्यांच्यात छान मैत्रीच नात फुलायला लागल होत... मी तर त्यांच्या प्रेमातच पडले होते. ते जवळ आले की माझे heart beats चा स्पीड वाढायला लागायच. मी मनाने हळूहळू त्यांच्याकडे ओढली जात होते. ते ही आता मला मैत्रिण मानु लागले. ऑफीस सुटल्यावर मी, सायली आणि सईही असायची खुप enjoy करायचो.


एक दिवस सई माझ्याजवळ आली... ये सपना, ऐक ना... आज सर तुझ्याकडे बघत होते...

सपना - ये गप्प बस सई, काही पण नको बोलू. कस शक्य आहे ?


सई - का तु बघत नाहीस का त्यांच्याकडे... मग त्यांनी बघितल काय झाल तुला ??

सपना - ये गप्प ना बाई, जरा हळू बोलना... किती मोठ्याने प्रचार करतेस ग...

सई - जाते मी... तुला सांगितल फक्त...


सपना खुप घाबरली... विचार करायला लागली. सर आपल्याकडे का बघत असतील ? काही चुकल

तर नाही ना.... मी त्यांना बघत असते हे तर समजल नसेल ना ? अस काही नसेल... मी पण ना पागल

आहे... दिवसरात्र सरांचा खुपच विचार करते.


तेवढ्यात अनिरूद्ध सर आले... त्यांनी मला ' सपना ' म्हणून आवाज दिला... माझा तर माझ्या

कानांवर विश्वास बसत नव्हता. मी सर बोलवलत ना...


अनिरूध्द सर - हो... ही फाईल चेक करुन घ्या..

सपना - हो सर ती फाईल हातात घेऊन तिच्या जागेवर आली... हे काम होत तर म्हणुन बघत असतील.... सई पण ना वेडी आहे खरच... ती हसतच कामात गुंतुन गेली.

   

सपनाला सरांना बोलायच होत मनातल पण कधी बोलायची वेळ नाही आली... आफीसच्या बाहेर ते काॅफीशाॅप मध्ये जायचे... पण सोबत सर्व फ्रेंन्डस असायचे. सपना सईला सगळच मनातल शेअर करायची. सईनेही तिला तु एकदा त्यांच्याशी बोल... हे सांगितल... पण सपनाला त्यांची मैत्री कायम हवी होती. ते कसे रिॲक्ट होतील याची

भिती वाटायची... सगळ्या गोष्टी अशा शब्दांत व्यक्त करता येत नाही.... पण त्यामागची भावना

महत्वाची... तिने एकदा त्यांच्याशी बोलायच ठरवल...

        

आज त्यांची मैत्री होऊन सहा महीने झाले होते.दिवस छान चालले होते. तिने एकदा सरांना थांबवल नि म्हटल, सर , थांबा ना... दोन मिनिट

मला बोलायचय तुमच्याशी...


बोल ना सपना....


मला काहीतरी सांगायच होत...

पटकन् विचार न करता... म्हटली , मला ना तुम्ही खुप आवडता....

म्हणजे कश्यामुळे आवडतो मी...

काय बोलाव तेच सपनाला कळेना... ती पटकन् म्हटली... ' तुम्ही सर्वांना छान बोलता आणि समजुन

घेता..'

अनिरूध्द सर - बस एवढच... ते तर सगळेच म्हणतात. ते.... आणि हो एवढी मला बोलत असतेस... ऑफीसच्या बाहेर पण सर म्हटलच पाहीजे का ?


साॅरी....पण तुला नावाने बोलल तर आवडेल की नाही..


हो हो... का नाही आवडणार... तु अनिरूध्द म्हटलेल आवडेल मला.... तेवढ्यात दिनेश सर आले... दोघांना चान्स होता बोलायचा पण सपना

निघून गेली. आजपण सरांना बोलतच नाही आल.


ती त्यांना रोज सकाळी आणि संध्याकाळ पाहायची. ते ही पाहायचे पण हसायचे... पण काही बोलत नव्हते. एकमेकांना बोलायला आणि मनातल शेअर करायला आवडायच.... मैत्रीला वयाच बंधन नसतच...

आम्ही कळत नकळत एकमेकांच्या मनाने खुप जवळ आलो होतो. ते एक दिवस ऑफीसला नाही आले

तर खुप बैचेन व्हायच... काळजी वाटायची. दुसर्‍या दिवशी त्यांना समोर बघितल... तेव्हा मनाला

बर वाटल. तेही मी कधी ऑफीसला नाही गेले तर ते सईला विचारायचे. फोन करायचे. मी कधी शांत

बसले तर ते चिडवायचे... हसायला लावायचे.

एक वर्ष होऊन गेल पण कधी भेटुन बोलायचा योग आला नव्हता... कारण सरांना वेळ नसायचा आणि

ऑफीसच्या कामासाठी ते नेहमी बाहेर जात. खुप बिझी लाईफ होत त्यांच... त्यांच्या डोळ्यांत मला

प्रेम दिसत होत... पण ते कधी बोलुन दाखवत नव्हते.

सईला मी सांगितल... तर तिनेही मला त्यांना बाहेर भेट आणि तुझ्या मनातल त्यांना सांग... हेच

सांगितल. मी सरांना आज ऑफीसमध्ये म्हटल की,

सर, उद्या मला तुम्हाला भेटायच आहे आणि बोलायच आहे... ते म्हटले ठीक आहे... त्यांनाही

भेटायच असेल त्यांनी हसतच होकार दिला.

मी त्यांना आजच मी जिथे भेटायच ते ठिकाण आणि टाइम मेसेज केला... त्यांनी ओके... म्हटल.

     

आजची रात्र तर कधी जाते आणि कधी उद्याचा दिवस उगवतो अस झाल होतो... माझ्यासाठी स्पेशल

दिवस असणार होता.... याआधी आम्ही असे कधी भेटलो नव्हतो... रात्री डोळ्यासमोर सारखे अनिरूध्द

सर दिसायचे... मी माझ्या मनातल त्यांना सांगितल नि त्यांनीही मला गुडघ्यावर बसुन प्रपोझ केला...

गुलाबाच फुल माझ्यासमोर हातात धरून ते मला i love you म्हणणार तेवढ्यात मोबाईलची बेल वाजली माझ्या... अकरा वाजता इतक्या रात्री कोण फोन करतय मला... फोन अनिरुध्द सरांचाच होता..... मी मनातच काय बोलायच असेल यांना...


समोरून हॅलो... "सपना, मला एक सांगायच होत. मला उद्या सकाळी अर्जंट ऑफीसच्या कामासाठी मुंबईला जायचय " तीची थोडी निराशा झाली...


ऐकतीयेस ना .... हो बोला ना.... पण मी तुला उद्या तुला नक्की भेटणार... माझ काम झाल की लगेच निघतो... डायरेक्ट हाॅटेलवर पोहचेल.... ओके... take care....Gn... मी ही सेमू टु यु म्हटले... फोन ठेवला...

त्यांच महत्वाच काम होत तरी त्यांनी नकार दिला नाही याचा अर्थ काम लवकर संपणार असेल. ते भेटणार म्हटल्यावर मी खुप खुश झाले....

     

मी उद्याची खुप स्वप्ने पाहिली होती.... त्या क्षणाची... दिवसाची एक वर्षभर वाट बघत होते... त्यांना भेटुन मनातल सांगायच.... आजची रात्र कधी संपते अस झाल होत... दुसरा दिवस उजाडला... एक नवी आशा घेऊन... मी ऑफीसमध्ये गेले... आज सरांना सकाळी पाहील नाही ना मनाला छान वाटत नव्हत.... आज तर मी खुप खुश होते. सकाळपासुन प्रत्येक तासाला घड्याळ पाहत होते... संध्याकाळची तर आतुरतेने वाट बघत होते.... सई आणि सायली तर खुप चिडवत होत्या... ऑफीस सुटल.... मी तयारीला लागले, सई माझी तयारी करून देत होती. आज पहील्यांदा

मी एवढी आरशासमोर तयार होत होते.... कुठला ड्रेस सुट होईल आणि मला चांगला दिसेल ते बघत

होते... एरव्ही कधीच तयार होणारी मी... आज खुप वेळ लागत होता.... मि जरा घाई करत होते.

सहा वाजत आले... ते येतच असतील... कामात असतील म्हणुन मी ही त्यांना काॅल केला नाही...

संध्याकाळी आठ वाजता भेटायच ठरल होत... ' हाॅटेल पॅवेलियन ' मध्ये पहील्यांदा आमची भेट होणार याची खुप उत्सुकता होती.... सई बिचारी एक तासापासुन तयारी करुन देत होती... हे नको ते नको, प्लीज सई सांग ना हा ड्रेस सरांना आवडेल ना... अस काहीतरी मी बोलत होते..

सई - अरे बाप रे ! मला कस माहीत असणार... त्यांच्या मनातल तर तुला कळत ना सगळ.... मला कळल असत तर मी भाव नसता खाल्ला

सांगितलं असत....

गप्प ना सई यार... किती चिडवणार आहेस... दोघीही हसू लागतात....तिला आज खुप खुश

बघुन सईलाही आनंद झाला...सगळी तयारी झाली.

सपनाने सईला मिठी मारली...,


सई - सपना... ये प्लीज यार सोडना मला.... मी तुझे सर नाही आहे.... सपना तिला अलगद सोडते...

सई तुला ना आल्यावर बघते... चल उशीर होईल निघते मी... बाय करून ती निघाली.....

    

सपना त्या ठिकाणी पोहचली... खुप मोठ हाॅटेल होत.... तिने सरांना काॅल केला... बेल वाजत होती पण उचलला नाही... तेव्हा हसतच ती स्वतःला म्हटली... सपना किती घाई करतेस येतील सर कामात असतील...शब्दाचे पक्के आहेत ते...

ते समोर आल्यावर काय बोलायच आणि कस याची मनातच शब्दांची जुळवाजुळव करत रंगीत तालीम

चालली होती... इथुन पुढे त्यांच्या ' प्रेमाचा प्रवास' कसा छान होईल याची स्पप्ने रंगवू लागली...

तिने परत काॅल केले पण काही रिस्पोन्स नाही...

"अरे सरांना आज काम होत निदान आपण तरी नंतर भेटु अस म्हणायला हव होत.., पण तेही काही म्हटले नाही...."

  

तेवढ्यात फोन वाजला... बोला ना अनिरुध्द सर

समोरून.... नवीनच व्यक्तीचा आवाज होता...

हॅलो... तुम्ही मि. अनिरुद्ध यांना ओळखता का? हो बोला ना.... काय झालय त्यांना... त्यांना काय झालय माहीत नाही... इथेच हाॅस्पीटल मध्ये लवकर पोहचलात तर बर होईल....

त्या क्षणाला काहीच सुचल नाही... मी त्या सई, सायली आणि इतर स्टाफला फोन करुन माहीती दिली... हे ऐकताच मला सहन झाल नाही...

मला चक्कर येऊ लागली नि मी धाडकन् कोसळले. मला पुढच काही आठवत नव्हत.... जेव्हा मला

जाग आली तेव्हा मी हाॅस्पीटलमध्ये एका बेडवर पडून होते.... शेजारी सई आणि सायली बसल्या

होत्या... आणि इतरही ओळखीचे फ्रेंन्ड्स होते... जे बाहेर थांबले होते... मी शुध्दीवर आल्या आल्या

विचारल.... काय ग अनिरूध्द सर बरे आहेत ना.. त्यांना काहीतरी झाल होत... हाॅस्पीटलमध्ये आणल

होत... बरे आहेत ना ते.... आणि मी इथे कशी काय?

बर ते जाऊ दे नंतर बघु... चला... आधी सरांना भेटुन येऊ.... अन् तुम्ही दोघी अशा शांत का ? चला ना ... आपण सगळे जाऊ तेवढच बर वाटेल

त्यांना.... कुणीच काही बोलत नव्हत... या दोघी तर एकदम शांत बसुन होत्या... त्यांच्या डोळ्यांतुन

अश्रु ओघळत होते... मला आता भिती वाटु लागली की सरांना नक्कीच काहीतरी झाल असेल, म्हणूनच सायली रडत आहे....


ये प्लीज रडू नका न अश्या....

अग सर ठीक होतील... आपण सगळे आहोत ना त्यांच्यासोबत... नाही सपना.... दोघींनी मला

जवळ घेतल नि सांगितल... की तुझ स्वप्न आता

फक्त स्वप्न राहील ग .... अनिरूध्द सर आपल्यात नाहीत .... ते आपल्याला सोडून गेले....


पण कस शक्य आहे...


 त्यांना हृदयविकाराचा झटका आला नि त्यातच ते गेले... हे सगळ अस काल रात्री अचानकच झाल... ते आता या जगात नाहीत.... हेच सत्य आहे सपना... सायली रडत

रडत सांगत होती... दोघीही मला आधार देत... समजावत होत्या... खुप रडले... काय कराव...

काहीच सुचत नव्हत.... फक्त त्यांना एकदा मनातल बोलायची संधीही देवाने नाही दिली... ती स्वतःलाच दोषी मानत होती... त्यांच्यामुळे ती या शहरात बिनधास्त राहायची...

त्यांनी खुप गोष्टी शिकवल्या... ज्या कायम लक्षात राहतील अश्या... त्यांनी हसायला शिकवल

आणि आनंदी राहायला.... एवढ काही शिकवल नि असे अचानक निघून गेले... याचच वाईट वाटत

मनाला...ऑफीसमध्ये तिला आता नकोस वाटायच.


त्यानंतर तिने स्वतःला कामात गुंतुन घेतल... तिच जगण कुठेतरी हरवल्यासारख वाटत होत...

आणि शांत राहू लागली... हसत नव्हती... बोलत नव्हती.... स्वतःमध्येच हरवून जायची....

एक दिवस ती खुप शांत आणि विचारांत बसली होती... तर तिला समोर सर असल्यासारखे दिसले.

ते तिला हाताने ॲक्शन करुन हसायला सांगत होते...त्यांना पाहुन ती खुश झाली आणि त्यांना

पाहुन हसायला लागली... तिला विश्वास बसत नव्हता... हे सत्य आहे की स्पप्न की मनाचा भास...

तिने वेळ न दवडता मनातल सांगितल....


ते हसले नि म्हटले...

"सच्चा प्यार दो पल के लिए क्यों न हो...

मगर जिन्दगी भर का एहसास दे जाता है...

तु मला काहीतरी सांगणार होतीस... ते हेच ना.. ती लाजत हसली नि हो म्हटली... ते तिला छान

राहा आणि आनंदी राहा सांगत होते...आणि अचानक निघून गेले... ती त्याला थांबवत होती...तिला अचानक जाग आली...मग लक्षात आल की ते स्वप्न होत... स्वप्नात का होईना भेट झाली... त्यादिवशी तिला खुप आनंद झाला... नव्याने

जगायला लागली... स्वतःशीच हसत म्हटली...

"जिना सिखा दिया यार आपने "

   

ते गेले पण आजही तिच्या मनात कायम आहेत. सपना आज तिच्या आयुष्यात खुप पुढे गेली...

त्यांच्यामुळे तिला ' खर प्रेम ' काय असत ते कळल. अनिरूध्द जर जरी मोठे होते वयाने तरी ती त्यांच्या वर मनापासुन प्रेम करत होती...' तिच पहील प्रेम ' हे वयच अस असत की आपल्याला एखादी व्यक्ती आवडू लागते... नकळत अपण तिच्या प्रेमात पडतो... डोळ्यासमोर रोज रोज दिसत असणारी व्यक्ती क्रश कधी होते कळत नाही... खर आहे ना... " पहिल्या प्रेमासाठी मन जी व्यक्ती निवडते... ती आपली होवो व न होवो... पण मनावर राज्य नेहमी त्याच व्यक्तीच राहत...."


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance