सुमित संदीप बारी

Inspirational

5.0  

सुमित संदीप बारी

Inspirational

प्रेरणादायी कथा

प्रेरणादायी कथा

2 mins
1.7K


     एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता, त्याला पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही, त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. तिथे त्याला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस? त्या तरूणाने अगोदर त्या व्यक्तीशी रागात वार्तालाप केला पण नंतर त्याने आपल्या सर्व समस्या त्या व्यक्तीला सांगितल्या. मग तो व्यक्ती म्हणाला की तुला नक्कीच काही काम मिळेल, अशा प्रकारे निराश होऊ नकोस. त्या तरुणाने सांगितले की मी पुर्णपणे खचलो आहे, माझ्याकडून आता काहीही होणार नाही. ती व्यक्ती त्याला म्हणाली की मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल.


        एक लहान मुलगा होता एकेदिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली. तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे. एक वर्ष निघून गेलं. निवडुंग मोठं झालं, पण बांबूचं रोप तसंच होतं. मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला. त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले, पण बांबूचं रोप तसंच तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहीला. 

 

   काही महिन्यांनंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसांत निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं. वास्तविक, बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होते, म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला. त्या व्यक्तीने त्या तरुणास सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजेत. आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू. तोपर्यंत एखाद्याने धीर धरला पाहिजे. त्याला त्या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational