Anita Bendale

Children Stories

3  

Anita Bendale

Children Stories

परमेश्वर तो परमेश्वर च

परमेश्वर तो परमेश्वर च

1 min
154


एक राजा होता.तो फार पराक्रमी होता.त्याने बरीच राज्ये जिकली होती.त्यामुळे त्याचा गर्व वाढला होता. त्याला वाटायचं आपल्या सारखा महापराक्रमी राजा या पृथ्वी वर नाही.आपण या पृथ्वी चे परमेश्वर आहोत.त्याने राज्यातील नागरिकांना हुकूम सोडला."प्रत्यक्ष परमेश्वर करत नाही अशा गोष्टी मी करून दाखविल्या आहेत.यापुढे मलाच ईश्वर माना."राजाने प्रत्येक नागरिकांच्या घरात स्वतः च्या तसबिरी लावण्यास सांगितल्या व त्यांची पूजा करण्याचा हुकूम सोडला.नागरिक बिचारे काय करणार? त्यांनी राजाचा फोटो पूजण्यास सुरवात केली.एकदा त्या राज्यात एक साधू आला. त्याने पाहिले प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात देव नव्हतेच. फक्त राजाचे फोटो . त्या साधूने चौकशी केली असता त्याला सर्व प्रकार समजला.त्यानें राजाचे गर्व हरण करण्याचे योजले.त्याने एका व्यापाऱ्याचा वेश घेतला व महाराजांकडे गेला. राजाला पाहताच तो म्हणाला ,"परमेश्वर समान महाराज., मी एक व्यापारी आहे .माझें जहाज समुद्रात आहे आणि प्रचंड मोठें वादळ सुटले आहे.आपण तर सर्वं शक्तीमान आहात. तेवढे वादळ थांबवावे महाराज!" राजानें विचार केला.आपण कसे काय थांबविणार वादळ?ते तर परमेश्वराने निर्माण केलंय. परमेश्वर च थांबवू शकतो. राजाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला आपली चूक कळली. त्याने आपल्या तसबिरी ची पूजा करण्याचे फर्माण मागे घेतले


Rate this content
Log in