Kadambari Awatade

Children Stories Inspirational

3  

Kadambari Awatade

Children Stories Inspirational

परोपकारी मुलगी

परोपकारी मुलगी

1 min
177


एके काळी एका शहरात व्यापार करणारे कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात पहिल्यांदाच मुलगी झाली होती. ती खूप छान व धष्टपुष्ट होती परंतु वयाच्या नवव्या महिन्यात तिला एका रोगाने ग्रस्त केले. ती मरणाच्या दारात होती पण ती वाचली परंतु तिचे डोळे व कान गेली. डोळ्याने दिसत नव्हते ऐकू ही येत नव्हते. ती मोठी झाली. तिला कळू लागले की तिला दिसत नाही ऐकू येत नाही. ती नेहमी उदास राहत. अशा कठीण परिस्थितीत तिच्या आईने तिला धीर देत व पुढे जाण्याचा सल्ला दिला. अशा परिस्थितीत तिने शिकायचा निर्णय घेतला. तिला एक चांगली शिक्षिका मिळाली. ती तिला उत्तम ज्ञान देत असे ती शिक्षिकेकडून ब्रेल लिपी म्हणजे अंध लोकांची लिपी शिकू लागली ती त्या लिपीत उत्तुंग झाली.  तिने आपले शिक्षण पूर्ण केले. व डॉक्टर ची पदवी बहाल केली. ती जगातील पहिली मूकबधिर व अंध शिकलेली मुलगी ठरली. तिने अशा मूकबधिर, अंध, अपंग लोकांची मदत केली व त्यांच्यावर उपचार देखील केले तिने आपले जीवन लोकांसाठी अर्पण केली.


Rate this content
Log in