Varsha Kendre

Children Stories Inspirational

3  

Varsha Kendre

Children Stories Inspirational

प्रवास

प्रवास

2 mins
199


नांदेड कडून सोलापूरकडे येत असते वेळी माझ्या कुटुंबातील आम्हा चारही सदस्यांना ऊसाचा रस पिण्याची ईच्छा झाली. पवन ने म्हणजेच माझ्या पतीने गाडी ऊसाचा रस काढणार्‍या हातगाड्याजवळ थांबवली. हात गाडा वाल्याकडे पाण्याच्या बाटल्याही विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. विशेष म्हणजे त्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी त्याने त्याची आठ वर्षीय मुलगी ठेवली होती.

         आमची गाडी हात गाड्या जवळ थांबताच टपोऱ्या डोळ्यांची आठ वर्षाची चिमुरडी गाडीच्या काचा जवळ येऊन पवनला विचारले," तुम्हाला काय हवे आहे पाणी की ऊसाचा रस". तेवढ्यात पवनसह आम्ही तीघे ,मी व माझे दोन मुले आश्चर्याने त्या चिमुरडीच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. एवढ्या लहान वयात आपल्या पित्याला कामात मदत करते वेळी एक वेगळाच आनंद तिच्या चेहर्‍यावर मला दिसून आला. ती तिचे काम अगदी मनापासून करत असलेली मला दिसली. पवन म्हणाला," आम्हाला चार ग्लास उसाचा रस हवा आहे". तिने आठ ते दहा मिनिटात उसाचा चार ग्लास रस आमच्यासाठी ट्रेमध्ये आणला. पवन मनाला," कोणत्या वर्गात शिकत आहेस". मुलगी म्हणाली, "दुसरीत".

 रस पिऊन झाल्यावर तिच्या वडिलांनी चाळीस रुपये आणण्यास तिला आमच्याकडे पाठवले. मी म्हणाले," किती रुपयाला एक क्लास आहे बाळा". मुलगी म्हणाली," दहा रुपयाला". तुमचे एकूण चाळीस रुपये झाले असे मुलगी पुढे म्हणाली. पवन ने चाळीस रुपये त्या मुलीस दिले. तिने चटकन चाळीस रुपये घेऊन आपल्या पित्याकडे दिले. मुलीने केलेल्या कार्याची माहिती व ओळख मी व पवन यांनी माझ्या दोन मुलांना सांगितली. माझी मुलगी आरोही दुसऱ्याच वर्गात असल्याने तीला आमची चर्चा आणि त्या मुलीचे कार्य पाहून आपणही मम्मी-पप्पांना छोट्या-छोट्या कामात मदत करायला हवी याची जाणीव झाली. माझी मुलगी आरोही मला व तिचे पप्पा पवन यांना उद्देशून म्हणाली," मम्मी, पप्पा आज पासून मी सुद्धा तुम्हाला तुमच्या कामात मदत करेन".

 आरोहीने गरीब मुलीकडून काम करण्याची प्रेरणा घेतल्याचे आम्हा दोघांच्या आणि आदित्य माझ्या मुलाच्याही लक्षात आले. आरोहीच्या उद्गारांनी आम्हा तिघांना खूप आनंद झाला.


Rate this content
Log in