Piyush Khandekar

Others

5.0  

Piyush Khandekar

Others

सामना..!

सामना..!

10 mins
972



पहाटेची वेळ होती. चिमण्यांची चिवचिव नुकतेच सुरू झाली होती. मंद गुलाबी वारा शीळ घालत होता. जुई च्या उमललेल्या कळ्यांचा सुगंध पसरला होता. ही काकूंच्या उठण्याची नेहेमीची वेळ होती. त्या उठल्या. अंथरूणात थोडा आळस दिला. मोठी जांभई दिली अणि पटकन उठल्या अणि कंदील घेवून माजघरात आल्या. बंब पेटवायचा होता. लाकड़ काढली आणि बंबात टाकत कोळशाच्या गोणी जवळ गेल्या. आणि ओसरीवर पाउले वाज ल्याचा भास झाला. एवढ्या भल्या पहाटे कोण येणार? म्हणुन परत कोळसे काढण्यासाठी वाक ल्या तोच त्यांना धप्प असा आवाज आला. विहिरीत कुणी तरी उडी मारल्यावर आवाज येतो अगदी तसा कुणी तरी उडी मारली होती. पाण्याचा आवाज शांतता चिरत गेला. आणि काकूंच्या छातीत धस्स झालं. आपल्या ओसरी च्या मागच्या विहिरीत कुणी उडी मारली असेल का हा भास? हल्ली समीर सारखं म्हणत असतो. काकू तुला सारखे भास होतात. चांगल्या डॉक्टर कडून तपासून घे म्हणून. तसाच हा भास झाला नाही ना? अस म्हणून त्या त्या ओसरीवर जाण्यासाठी वळल्या तोपर्यंत धावण्याचा आवाज आला. समीर धावताना दिसला. काकूंनी कंदिला ला त्याच्या चेहऱ्या जवळ धरला.

त्या प्रकाशात समीर घामाने भिजलेला दिसला. काय रे काय झाल. मी आवाज ऐकून बाहेर आले. कुणी विहिरीत पडतो तसा समीर ने काकूंना मीठी मारली आणि हंबरडा फोडला. काकू "स्वाती" करत त्याने रडायला सुरुवात केली. अरे काय झालं ते सांगशील की नाही म्हणुन काकूंनी त्याचे डोळे पुसले. तो विहिरी कडे बोट दाखवून रडत होता स्वाती स्वाती म्हणत. त्यावेळी पटकन काकूंनी वाचावा वाचावा म्हणून मोठ्याने आरोळी ठोकली. काकूंच्या लक्षात आले की काल दोघांच्या खोली मधून भांडण्याचा आवाज येत होता. दोघही माघार घ्यायला तयार नव्हती. काकूंनी ही सोडविण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच काही चालल नाही. आणि आज अचानक स्वाती अस काही करेल अस वाटल नाही. तो पर्यंत लोक जमा झाले होते. काकूंनी देखील रडायला सुरुवात केली होती दोघे जण विहिरीत उतरले होते. तेव्हढ्यात मागे कोणी खांद्यावर हात टाकला म्हणून काकू वळल्या तर पांढर्या नाइट गाऊन मध्ये डोळे चोळत स्वाती उभी होती. त्या एकदम दचकल्या. तोपर्यंत समीर देखील विहिरीजवळ उभा असलेला आला आणि तू तू अस म्हणत मग ती कोण होती?

पहाटेची पहिला प्रहर बाहेर अंधारलेले होते. कुस बदलण्याचे निमित्त एवढे झाले. कुणीतरी असण्याचा भास समीरला झाला. शेजारी वळून बघतो तर त्याच्या शेजारी स्वाती सुद्धा नव्हती. त्याला वाटले एवढ्या सकाळी स्वातीचं तर नाही ना बाहेर गेली. क्षण दोन क्षण सारत नाही तोच पुन्हा कोणीतरी असण्याचा भास आणि अस्पष्ट दिसलेली एक सावली. आपण जाऊन बघायला काही विपरीत किंवा रहस्यमय कुणाला प्रत्येकाला काही दिसले किंवा कळले कि वाढते ती उत्सुकता आणि वाटते ती कुतूहलता त्याच अवस्थेत समीर येऊन पोहोचला होता. कोण आहे? हे कळल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हते.

 

इतक्या पहाटे नेमके चालले काय आहे. बाहेर कोण आहे? कशासाठी घुटमळतंय? काय हवं आहे अशीकितीतरी प्रश्न समीरच्या मनात घोळत होते. बरे कोणी का असेना किंवा स्वाती का असेना पण करत काय आहे बाहेर? मनाचे खेळ आणि खेळण्याचे मन यात प्रेम या एका डावाचाच काय तो फरक आहे. म्हणजे बघा ना या मनाचे खेळ स्वस्थ बसू देत नाहीत आणि प्रेमाचा डाव कधीच जिंकू देत नाही. आणि पहाटे सुरु झालेले हे नाट्य आपल्याला काहीच सुचू देत नाही आपण भलं आणि आपलंच भलं. अशी समीकरणे आज गाव खेड्यासह प्रत्येक क्षेत्रातील अभिव्यक्तीचे झाले आहे. त्यामुळे समीरला पहाटे काय किंवा कोण दिसले याचे वास्तवात समीरशिवाय जास्त कुतूहल आणि त्याच्या एवढी उत्सुकता कुणालाच लागून उत्कंठा वाढली नसेल. आणि हो एवढ्या पहाटे त्याला जाग आली म्हणून तो त्याचा-त्याचा प्रश्न आहे असे तुम्ही खुशाल बोलू शकता हं..!

..भुताटकीने भल्या पहाटे झपाटाव अगदी तसे सर्वांचे चेहरे स्वातीला पाहून झाले होते. स्वभावाने काहीशी हेकेखोर असली तरी स्वाती कमकुवत मनाची नव्हती. विहिरीत उतरलेले दोघे पक्या आणि संज्या साडी आणि हंडा घेऊन वर आलेत. पक्या "समीर भाऊ, तुमच्यामुळं सक्काळ सक्काळ समद्यांची चेष्टाचं झाली बगा!" हातातला हंडा नाचवत तावातावाने बोलला.

संज्या पक्याला आणखी वाव देत "न्हाईतर काय? हिरीतल्या गुडघाभर पाण्यात बेडक बी न्हाई यायची. वैनी कायला कुदनार?" "सांजच्याला वैनींनी साडी वाळत घातली अस्संल रातच्या वाऱ्याने उडाली हिरीवर अन् समीर दादाला भास झाला." बोलत हसू लागला. समीर लाजीरवाणा होऊन स्वतीकडे नंतर काकूंकडे बघत मानखाली घालून गप्प चुळबुळत उभा राहतो. काकू समीरची अवस्था पाहून गालात हसतात. "झाला तो भास बरा नाही. अस्स करूया विहिरीला आता पाणी काय लागायचं नाही. आता ऊन बी तापायला लागल. विहीर बुजवून बोर खणून हापासनी लाऊन घेऊ या. म्हणजे सगळ्यांचे प्रश्न सुटतील. पोरं-पोरीपण विहिरीजवळ हुंदडायला लागलेत आजकाल. जीवाला घोर लागण्यापेक्षा ही विहिरच नको."

पक्या काकूंच्या विचारांना दुजोरा देत पाठीमागे वळतो व जमावाला उद्देशून बोलतो "काकू म्हणत्यात ते लय बेस व्हईल, आन ज्याला मरायचंच त्यो गावच्या नदीवर जाईल." काकू हातातला कंदील खाली ठेऊन पक्याच्या नकळत जवळ येतात. त्याच्या पाठीत बुक्का मारतात आणि त्याला मारता मारता हातातल्या बांगड्या मागे घेतात व पक्याला मारत राहून बोलतात "मुडदा बशिवला तुझा वेशीला आता. सक्काळ सक्काळ नाऱ्यागत अभद्र बोलतुस ठोंब्या आज तुझी खैर नाही." पक्या गयावया करत स्वतःची पाठ चोळत तिथून पळू लागतो. पक्याच्या मागे दोन चार पावलं तावातावाने पळत काकू ओरडतात "जाशील कुठे? गिळायला येशीलच न्हवं? बघते मग तुला चांगलाच." काकूंच्या तावडीतून सुटून पक्या पळून जातो.

काकू संज्याकडे मोर्चा वळवतात. संज्याला उद्देशून बोलतात "दा(दहा) वाजेतोपर विहीर बुजून बोरच काम सुरु व्हायला पायजे. सांच्याला हापसनी दावली न्हाई तर बग."

संज्या होकारार्थी मान हलवून सोपवलेली जबाबदारी स्वीकारतो. संज्याकडचा काकूंचा मोर्चा मग जमा झालेल्या जमावाकडे रोख घेतो, "विहिरीत उतरून दोन डोमकावळे न्हाऊन निघालेत. विहिरीचं पाणी हापासून वापरायला घ्या. प्यायला लागणाऱ्या पाण्यासाठी हनम्याला टँकर धडायचा सांगावा धाडा माझा." जमाव पांगतो. समीर आणि स्वातीही जाऊ लागतात. काकू करड्या आवाजात बोलतात. "संसार म्हटला की भांड्याला भांड लागतंच. भांडी फुटत नाहीत, बस! त्यांचा आवाज जास्त होऊन चार लोकांना ऐकू जातं. तुमच्यासारखी शिकली-सवरली शहरातली माणस खेड्यात येऊन असं वागतील तर काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? थोडं समजुतीने घ्या एकमेकांना. "समीर आणि स्वाती अपराधीपणे मान खाली घालून तिथून जातात.

 

समीर खिडकीतून दिसणाऱ्या विहिरीकडे एकटक बघत उभा राहिला. विहीर बुजवायची? या विचाराने त्याच्या पोटात गोळा आला. पाण्याची भीती जावी म्हणून लहान असतांना धक्का मारून काकाने काठावरून ढकलून दिले होते. तेव्हा विहरीत पडला होता..अगदी तस्सा..

'धप्प...'

' ए आsssssss ई'

विहिरीने तिच्या काळ्याशार पोटात हे आवाज गिळून घेतले होते.. अगदी अधाशासारखे.. त्याची किंकाळी.. भीतीने अंगावर उठलेले शहारे अन्न काठावरच्यांचे हसण्याचे आवाज.. सारे विरघळून गेले आज त्या पाण्यात.. पुढे पाण्याची भीती गेली तेव्हा त्याने कितीदा धप्पदिशी उडी मारली पाण्यात. त्याच्या लहानपणाचा अविभाज्य भाग असलेली ती विहीर आता कायमची बुजणार होती. तिचे अस्तित्व दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली दडपून दिले जाणार होते. शहरात कसलीच आणि कशाचीच काय कमी नाही पण गावात असलेली ही विहीर संपणार होती. पण तिच्या बरोबर आपल्याला होणारे भास पण संपतील का? हल्ली वेळी अवेळी कुणीतरी स्त्री किंवा तरुणी विहिरीत उडी मारत असल्याचे स्वप्न तरी पडतात किंवा जागेपणी भास तरी होतात. विहीर बुजवल्याने यावर नक्की आला बसेल का याची शाश्वती समीरला वाटत नव्हती. त्याला आठवलं, हे होणारे भास पहिल्यांदाच होत होते असे काही नव्हते. यापूर्वी त्याच्या काकालासुद्धा असे भास व्हायचे. तेव्हा त्याच्या काकाची आणि काकूंची भांडणे पार विकोपाला गेलेली होती. या गोष्टींचा वयाच्या अंतरामुळे आणि असमंजस बुद्धीमुळे कसलाही अर्थ लागला नाही. बालपण म्हणा किंवा बालिशपणा मोठ्यांच्या गोष्टी लहांना समजावून सांगितल्याचं जातात आणि मोकळेपणाने बोलल्याचं जातात का? सध्या सेक्सवर वयात येणाऱ्या मुलं मुलींसोबत आई काय बापसुद्धा मोकळेपणानी बोलू शकत नाही? अहो पोटाच्या मुलामुलींचे जाऊ द्या. नवरा-बायकोनी तरी एकमेकांच्या शारीरिक भुकेबद्दल, सेक्सबद्दल आणि संभोगानंतर जाणवलेल्या गात्रांमधल्या वेदनांवर व मनात पुलकित झालेल्या तृप्तीबद्दल प्रेमानी नाही किमान औपचारिकतेदाखल तरी संवांद साधला आहे का? गाव आणि खेड अंतर असले तरी नवरा-बायकोत कसले अंतर आणि कसली बंधने?

एकमेकांचे शरीर भोगायला किंवा स्वतःच्या शरीराची वासनांध भूक शमवायला एकमेकांसमोर नागडं होता येतं. तर एकमेकांची मोकळेपणानी बोलायला हळवा आणि तितक्याच नाजूक नात्यावर थोडासा संवाद साधायला संवाद का नाही काढता येत? हे फार अवघड आहे का? नाही. अवघड नाही बस यावर पुढाकार कोणी घ्यायचा आणि नेमकं काय बोलायचं यावर एकमेकांशी प्रत्येकाच्या मनात याचेच द्वंद्व सुरु आहे ते थांबवून प्रमाणित नात्याची आणि भोगलेल्या सुखाची ग्वाही देणे कठीण आहे. पण प्रेम व्यक्त करणे जसे सोपे केले नाही तसे नात्यांच्या नाजूक विषयांवर बोलणे आणि त्यांचे गांभीर्य जपानेही प्रत्येकाने सोप्पे करायला हवे आहे.

 

समीरला आपल्या लहानपणीच्या वेळेसचे आजीचे वाक्य जसेच्या तसे आठवले. भास कसले, 'ती' येत असेल खरेच. असे कोणते नाते मरायचे असेल की दिसते ती आसपास'.

कोण 'ती'? का दिसते? आजी अधूनमधून घराण्यातील कोण बाईने विहिरीत उडी मारल्याचे बडबडत राहायची आणि हळहळ व्यक्त करत राहायची कधीतरी, कोणत्या तरी दिवशी दहीभात ठेवायची विहिरीपासच्या दगडावर तिच्यासाठीच का?

नाते मरत असेल तर ती दिसते??? त्या वेळेस काका काकूचे नाते शेवटचा श्वास घेत होते. आता आपण नि स्वाती मूल होत नाही, याचे फ्रस्ट्रेशन एकमेकांवर काढत कुढत जगतोय. अर्थात आधुनिक आणि सुशिक्षित असलो म्हणून काय पिढ्या न पिढ्या बिंबवल्या जाणाऱ्या संस्कृतीवर धूळ साचणार का? ती बाहेरच येणार आणि मूळ होत नाही म्हणून गावभर स्त्रीला वोंझोटी आणि पुरुषाला नामर्द / हिजडा म्हणून हिनवले जाणार? पण कमतरता काय आहे याचा शोध घेण्यापेक्षा नवऱ्याला बायको सोबत भांडण्यात आणि बायकोला नवऱ्याच्या उणीव काढत भांडणात आणखी खरीप तापवण्यात जास्त स्वारस्य आहे. पण सुशिक्षित कुटुंब असो किंवा अशिक्षित प्रत्येकाची वैचारिक पातळी बुरसटलेलीच असते आणि ती वेगवेगळ्या प्रसंगातून समाजापुढे माती खात राहते. 

समीर आणि स्वातीच्या नात्याचेही तसेच झाले आहे. इतके टोकाला जाऊन बसले आहेत दोघे की एकमेकांचे तोंडही पाहायला त्यांना नको वाटतेय. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते संपतेय. समीरने एकदा स्वातीकडे पाहिले. स्वाती इतकी नकोशी आहेच आपल्याला तर तिने विहिरीत उडी घेतल्याच्या कल्पनेने आपण कासावीस का झालो? आपल्या मनाची अस्वस्थता का झाली? तो निव्वळ भास होता. प्रत्यक्षात असे काही झाले तर आपण काय करणार? स्वातीला जणू त्याच्या मनात काय चाललंय ते समजलं. ओल्या डोळ्यांनी त्याला मागून मिठी मारत ती समीरला 'सॉरी' म्हणाली. स्वातीच्या पुढे आलेल्या हातांवर समीरने आपल्या हातांनी हळुवार थोपटलं.

क्षण दोन क्षण गेले असतील समीरने स्वातीला आपल्या पुढे घेतले आणि तिच्या केसांतून हात फिरवत बोलला. स्वाती चिडणार नसशील तर एक बोलू म्हणजे सुचवू का? स्वाती आपली मिठी घट्ट करते आणि हुंकार भरते. समीर पुढे बोलतो आपण दोघेही शहरात जाऊन मेडिकल करून घयायचे का? मुलासाठी तुही आतुर आहेस आणि मीही पण आपल्यात काय कमतरता आहे हे जाणून घेऊन त्यावर मार्ग काढायला हवा ना?

स्वाती समीरकडे एकटक बघत राहते आणि कपार्या आवाजात बोलते जर माझ्यात काही त्रुटी निघाल्या तर काय करशील? समीरही तोच प्रश्न तितक्याच शांतपणे स्वातीला विचारतो जर माझ्या पुरुषार्थाचा कमतरता आढळली तर तू काय करशील?

एकमेकांपासून दूर होऊन दोघेही यंत्राप्रमाणे आपली दिनचर्या आवरतात. दुपारून शहराकडे एकमेकांशी न बोलता मोर्चा वळवतात. डॉक्टरांच्या टेस्टचे सोपस्कार पार पडतात आणि संध्याकाळी वेळ येऊन ठेपते ती निकालाची. शारीरिक कमतरता म्हणून कोणतंही काहीएक त्रुटी आढळत नाही. मग मुलं न होण्याचं कारण काय? या प्रश्नच उत्तर सायन्सकडे नाही असे उत्तर आपल्या सोबत घेऊन संथपालांनी दोघेही गावाकडे परत येतात. स्वाती आणि समीर एकमेकांसोबत चालत असले तरी त्यांची बुद्धी एकमेकांच्या विरुद्ध प्रवास करत होती. चालता चालता काकींच्या दारात कधी येऊन पोहोचले हे दोघांनाही कळले नाही. आपल्या हातात मेडिकल टेस्टचे रिपोर्ट्स फाईल पाहून काकी समजायचे ते समजल्या. डॉक्टरकडे गेल्या होतात? काय म्हणाले? काकींच्या या थेट प्रश्नावर समीर आणि स्वातीने काय उत्तर द्यावं दोघांनाही कळले नाही. कसे बसे समीर बोलला सगळे नैसर्गिक आहे पण अडचण काय तीच काळात नाही. बस एवढंच ना? या घरात फ्रेश व्हा मी पान वाढायला घेते.

स्वाती आतल्या खोलीत आवरायला जाते. समीर विहिरीच्या दिशेने बाहेर येतो. अंधार झालेला असतो विहिरीतून पाणी काढतो आणि हातपाय धून आतमध्ये येतो. काकी आणि स्वाती मिळून जेवणाची पाने वाढतात आणि सगळे एकत्र जेवायला बसतात. यंत्राप्रमाणे स्वाती आणि समीरचे जेवण सुरु होते. काकी बघतात नाही बोलतात. मुलाचा हव्यास तुम्हा दोघांनाही आहे. पण खरी अडचण काय आहे सांगू? तुमची एकमेकांवर करत असलेल्या अविश्वासाची. समीर तुला वाटत नाही स्वाती चांगली आई होऊ शकेल आणि स्वाती तुला वाटत नाही कि समीर चांगला बाबा होऊ शकेल. तुम्हा मुलांना शारीरिक आजार कुठलाच झालेला नाही. तुम्हाला आजार आहे तो मानसिकतेचा. आणि मुलं न होण्यात अडचण आहे ती याच गोष्टीची. एकमेकांवर जरासा विश्वास ठेवा ना. झाडावर फुल येतांना फूलसुद्दा थोडासा विचार करतच ना आपण झाडाची शोभा वाढवू कि झाडाचे ओझे होऊ?

आज झाड फुलाचं ओझं हसत खेळात पेलून घेईल पण उद्या फुलांना तुम्ही माझ्यावर ओझं दिलं म्हणून झिडकारून टाकणार? म्हणून कोमेजतात ना फुले? निसर्ग म्हणून आपण स्वतःला सांगतो कि फुलांचे आयुष्य एवढेच. पण झाडाला फुलांचे दुःख नाही नाही फुलांना झाडाचे ओझे झाल्याची खंत नाही. आपल्या मनातली खंत एकमेकांसमोर एकदा प्रामाणिकपणे तुम्ही दोघांनी मांडून पहा, तरी कदाचित तुमची प्रश्न नाही तुम्हाला होणारी त्रास संपून जातील. एवढं साधं गणित कळायला तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. डॉक्टरांकडे निदान आणि औषध असेलच असे नाही. काही उपाय तुमचे तुम्हालाही करून पाहावे लागतील. तुमची अडचण तुम्ही दोघेजण मिळून सोडवू शकता त्यात मी फक्त रास्ता दाखवू शकते. चालायचं न चालायचं तुमचे तुम्ही ठरवावे.

 

कधीकधी आपल्या मनाच्या अव्यक्त राहण्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी एकमेकांशी पारदर्शकपणे सुसंवाद साधायला हवा. मर्यादा जरीही असली तरीही मर्यादेचे परदे एकदिवस गाळून पडायला हवेत. चुकलं तिथे दाताणावे अणे आणि बरोबर तिथे गोंजाराने आले. म्हणणे समजून घेणे महत्वाचे असते. कुणाला काय म्हणायचे आहे आणि त्या म्हणण्यावर त्यांचे विचार आणि मत काय आहे? आयुष्य प्रत्येकाचे सुंदर आहे. बस त्याला आणखी सुंदर करण्यासाठी आणि परिपूर्णतेने जगण्यासाठी आवश्यकता असते सहचरणीची आणि सहचाराची हे प्रवासी भेटल्यावर जर आयुष्याचा प्रवास सुखाचा आणि समाधानाचा होत नसेल तर त्रुटी राहतात त्या संसारात आणि अपूर्णता राहते ती मानसिकतेत मग समाधान कुणाला आणि कशात गवसणार? समीर आणि स्मिताला आपल्या आयुष्याचा सूर काकींच्या एकमेकांशी मोकळा संवाद साधा या समुपदेशनात गवसला. पण याचा परिणाम समीर आणि स्वातीने एकमेकांशी साधलेल्या मोकळ्या गप्पा आणि संवादावर अवलंबून उपयुक्त ठरला. आपल्यातल्या त्रुटी सांगणारी आपली जवळची माणसे असतात जी आपल्या त्रुटी भरून काढायला खरी मदत करतात व योग्य मार्गदर्शन दाखवतात. बाकी वैद्यकीय सल्ला आणि फायदा कायमस्वरूपी नसतोच. संवाद साधण्याची आणि प्रेम करण्याची औषध अजूनतरी बाजारात आलेली नाही. आकर्षण, ओढ आणि प्रेम ही औषध निसर्ग निर्मित फुकट आहेत त्यांचा उपयोग कसा आणि कधी करायचा आणि त्याचे सेवन किती करायचे याचे प्रमाण प्रत्येकाला स्वतंत्रपणे ठरवायचे असते. तेव्हा कुठे तुमचे, माझे, याचे आणि त्याचेही आयुष्य सुखाने गंधाळून जाणार असते.


Rate this content
Log in