Vilas Kaklij

Tragedy Thriller

3  

Vilas Kaklij

Tragedy Thriller

स्त्री

स्त्री

1 min
298


एका झोपडीतील ती निरागस पोटासाठी भीक मागत फिरत असे. भर दुपारी घरात एकटा होता. घरात स्वच्छता करण्यासाठी बोलावले. जेमतेम दहा बारा वर्षांची पोटासाठी काम करू लागली. तेव्हा यातील माणूस जागा झाला. त्याने त्याची हवस पूर्ण केली. उमलणारी कळी चुरगळली. प्रेम नर मादी काय असते तेव्हा तिला कळले की माणूस काय असतो. मजबुरी व ओरडल्यास चोरीचा आळ घेवून पोलीसात देईन तेथे काय होईल ते त्याने सांगितले व रोज कामाला ये असे दरडावून सांगितले. मला पोटाची भूक अन् त्याला शरीराची भूक असा दिनक्रम चालूच होता. समाजात बदनामी ही गरिबाचीच होते. सारे काही भूक 'दारिद्र' इज्जत... गरीबाला चिकटलेले बिरूद का? निसर्गाने केवळ गरीबीत जन्माला घातले म्हणून?


मला हे सोसावे लागते मीच जर त्या नराधमाची मुलगी असते व कुणी मला छेडले असते तर छेडणाऱ्यावर याने विनयभंग , वा इतर अनेक कायदे व पोलीस यांनी पाळले असते मात्र मी एक अभागी दारिद्री मुलगी पोलीस वा समाज यांनी विश्वास ठेवला असता? नाही कारण जन्माला आलेला एक क्षुद्र स्तर का? कोणी निर्माण केला, आमचा हक्क कुणी घेतला सांगा. मला मिळालेली पदवी शिक्का घेवून आयुष्य काढावे का?


मी एक स्त्री आहे, एक मादी आहे म्हणून की , गरीब आहे तुम्हीच सांगा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy