Aruna Garje

Tragedy

5  

Aruna Garje

Tragedy

वेदना...

वेदना...

1 min
748


 तो रात्री पार्टी करून घरी आला. ती म्हणाली - 

"अहो! ऐकलत का? माझ्या छातीत सारख्या वेदना होत आहेत."

"एखादी पेनकिलर घे आणि हो मला खूप भूक लागली आहे जेवायला दे." 

तो पोटभर जेवला व झोपायला गेला. तिने सारे आवरले आणि तीही झोपली. 

   पहाट होताच तो उठला

पण ती झोपलेलीच होती. "अगं! उठ. चहा करतेस ना." पण ती तर झोपेतच केव्हातरी हे जग सोडून गेली होती आणि तिची वेदनाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy