Chaitrali Vasgaonkar

Others

2  

Chaitrali Vasgaonkar

Others

स्वभाव

स्वभाव

1 min
22


सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो, चेहरे वयाचे गुलाम असतात.

आजकाल माणूस प्रेम स्वभाव बघून नाही तर चेहरा बघून करतो. हो ना ?


ते म्हणतात ना आपले डोळे चांगले असतील तर आपण जगाच्या प्रेमात पडतो,

जर आपला स्वभाव चांगला असेल तर जग आपल्या प्रेमात पडत.

आपण आपला स्वभाव असा ठेवायचा कि क्षणभर भेटलेल्या व्यक्ती ने

आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवल पाहिजे.

 

सुंदरता लक्ष वेधुन घेते,पण स्वभाव हृदय वेधुन घेत.स्वभावाच्या प्रेमात पडल कि

चेहरे आपोआप सुंदर वाटू लागतात. त्या साठी सुंदर दिसायची गरज लागत नाही.

स्वभावा वरून माणसाची पारख होते.


सुंदरतेची कमतरता चांगला स्वभाव नक्की च पूर्ण करतो ,

पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही.

म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा. सुंदरता नाही. 


आजची पिढी नेमक हेच विसरली आहे ! त्यांना स्वभावा पेक्षा चेहरे जास्त जवळचे वाटू लागलेत. 


Rate this content
Log in