Raj Mohite

Comedy Drama Fantasy

3.8  

Raj Mohite

Comedy Drama Fantasy

स्वप्न लग्नाचे

स्वप्न लग्नाचे

5 mins
484


किती तरी दरवाजे पालथे घातले कधीच कोणती मुलगी पसंत आली नाही. मला पसंत पडली तर तिला मी पसंत नव्हतो. लग्नासाठी इतक्या मुली पाहण्यापेक्षा माझ्या बाजूची तबस्सुम काय वाईट होती????

सुंदर सुशील आणि सूसुक्षित. फक्त धर्माच्या नावावर विरोध. मुस्लिम असली तरी अस्खलित मराठी येत होते. शिवाय कोकणातली पण घरचे माझे तिच्या माझ्या लग्नाच्या विरोधातच.

माझ्या शेजारी राहण्यास तरी आई ची तबस्सुम सर्वात मोठी वैरीण तिच्या मागे शिव्यांची माला जपायची. तिची आई नुसरत खाला. कधी एके काळी आई आणि नुसरत खाला चांगल्या मैत्रिणी होत्या आमच्या प्रेम प्रकरणात त्याही एकमेकींची तोंड बघत नव्हत्या.

आईला सारखी माझ्या लग्नाची काळजी कारण मी पळून लग्न करेन त्याची भिती. आईला किती वेळा समजावले काही उपयोग नाही बाबांना तर सांगून काहीं फायदा नाही त्यांचे तरी कुठे घरी चालते आई पुढे???? त्यांची बाजाराची पिशवी भले आणि ते भले. सल्ले मात्र अर्थमंत्र्यांसारखे द्यायचे.

त्यांचा सल्ला म्हणजे पळून लग्न कर. पळून लग्न केले म्हणजे आमच्या गृह मंत्र्यांनी सरळ आमच्या विधानभवन प्रवेशावर बंदी घातली समजा. हो नाहीतर काय ??? कशाला देईल पाय घरात ठेवून ???

एक वेळ विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा पेच सुटेल पण माझे आणि तबस्सुमचे लग्न हा पेच कधीच सुटणार नाही.

तसेही पळून जाणे तबस्सुम ला ही मान्य नव्हते ना मला. ती तिच्या घरच्यांची समजुत काढत होती तिच्या घरचे म्हणजे फक्त तिची आई कारण तिच्या कुटुंबात त्या दोघीच होत्या.

मी मात्र माझ्या आईची कधी समजुत काढण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण खात्री होती एक वेळ कुवारपणात मरू देईल पण तबस्सुम जवळ लग्न करू देणार नाही.

माझ्या लग्नाच्या साठी आईने नको नको तिकडे फिरवले कधी पुणे कधी नागपूर तर कधी नाशिक. मुंबई तर पालथी घालून झालीच होती.

ह्या शोध मोहिमेस आजुन एक आजुन एक दार सापडले. शेजारचे आमचे पवार काका त्यांच्या दूरच्या नात्यातील मुलगी मृण्मयी. त्यांनी तिचा फोटो दाखविला. सुंदर आणि मनमोहक साैंदर्य. आता फोटो मध्ये मला ही आवडली एक दिवस काढला आणि निघाले सर्व आजुन एका घरात चहा कांदापोहे साठी अमरावतीत. काही म्हणा माझ्या लग्नाच्या निमित्ताने निदान आमच्या फामिलीचा महाराष्ट्र दौरा तर होत होता. तसे पण बाबा फक्त बाजारात फिरून वैतागलेले निदान ते तरी खुश होते.

बऱ्याच ठिकाणी मुलीसाठी फिरल्याने मला प्रश्र्नो उत्तराची सवय झाली होती आणि नकाराची ही.

मृण्मयीचे वडील एक श्रीमंत व्यक्ती एक प्रशस्त घर. एकुलती एक मुलगी आणि ती ही डॉक्टर.

आपल्या रीतिरिवाज नुसार आधीच मला आईने सांगितलेले तिकडे काही वेंधळा पना करू नको नेहमीसारखा. आता तालीम माझी आधीच आईने करून घेतलेली. इतक्या मुली पाहिल्या मला कधीच कळाले नाही कार्यक्रम मुलगी पाहण्याचा होता की मुलगा पाहण्याचा???

आई समोर माझे वडिलांचे काही चालत नव्हते आणि आजही चालणार नाही. बाबांचे तर विचारू नका जबरदस्त सिगारेटचे शौकीन पण लग्न होवून आज इतके वर्ष झाली आजुन आईला पत्ता लागून दिला नाही. त्यांना ब्लॅकमेल करायचे म्हणजे एकदम सोपे. कसे ही असो मला समजून घेत होते आणि माझे ते एक मित्रच सिगारेट ते आणि मी सोबत ओढायचो. काय बिशाद आईला माहिती पडेल???

आणि पडले तर माचिस वर काडी ओढतो तसे आम्हाला ओढून बाहेर सरळ घराच्या बाहेर. त्यामुळे बाबा आणि माझे तेरी भी चूप मेरी भी चूप.

मुंबई ते अमरावती ट्रेन पकडली. मी बाबा आई आणि आमचे शेजारचे पवार काका. मुंबई ते अमरावती ट्रेनचा प्रवास खूप बोर झालो. कुणी नाही बोलायला ना टाईमपास आईशी काय बोलणार?? बाबा आईंसमोर काय बोलणार?? पवार काका दिवस भर मावा त्यांच्या तोंडात ते तरी काय बोलणार?? त्यांचा मावा म्हणजे त्यांच्यासाठी सुका मेवा.

एक कोपरा पकडून तबस्सुम ला फोन केला. मस्त गप्पा मारत बसलो. आता तिला माहीत होते मी अमरावती मधे मुलगी पाहायला जात आहे. पण काही फरक पडत नव्हता तिला. खात्री होती माझ्या बद्दल तशी नेहमी सारखी कामगिरी फत्ते करून येणार.

मोठा प्रवास करून पोहचलो मृण्मयीच्या घरी. एक बाजूला आई एक बाजूला बाबा मधे मला बुझगावण्या सारखे बसविलेले. मुलीचे वडील विचारपूस करत.

मुलगा काय करतो???

आई ने पटकन उत्तर दिले.

तो लेक्चरर आहे.

लेक्चरर मी आहे आणि आई लेक्चर द्यायला लागली.

माझी इतकी स्तुती करत होती की विचारू नका ??? खरेच इतकी कधीच माझी स्तुती आई कडून ऐकली नसेन.

विचारपूस बोळणीत चहा आला. मृण्मयी चहा घेवून आली फोटो पहिला त्यात आणि प्रत्येक्षात बराच बदल साडीच्या जागी जीन्स टी शर्ट तो ही शॉर्ट त्यातून अंगावरचे टॅट्टयू दिसत होते. कलर केलेले केस. हातावर कवटी चा टॅट्टयू.

फुल्ल ग्लॅमरस मुलगी. तिला बघून आई आधीच समजली ही वारी पण फेल गेली.

हळूच पवार काकांच्या कानात बोलली

काय हे??? तुम्ही डॉक्टर म्हटलात ?? टॅट्टयू काय?? कवटी काय ?? ही डॉक्टर की ??? पुजारीन ??? 

पवार काका काय बोलणार ??? त्यांचा आपला मावा तोंडात.

मृण्मयी ने मला चहा दिला. एक नजर पाहिले माझ्या कडे हसली. मी ही हसलो. पण त्या हसण्या मागचे कारण काही वेगळे होते.

बरीच चौकशी झाली माझी तिची आमच्या फॅमिली कडून.

थोड्या वेळाने

मृण्मयी

" तुमची काही हरकत नसली तर आम्ही काही एकांतात बोलू शकतो???

आईने केलेले मोठे डोळे पाहून बोललो.

नक्की आपण बोलूया.

आम्ही दोघे निघालो तिच्या घराच्या गच्चीवर.

आईचा जीव खाली वर होत होता.

जेमतेम १२-१५ मिनिटे चर्चा केल्यानंतर आलो.

आईने तशी निघण्याची घाई केली.

निघताना मृण्मयी ने मला केलेला बाय बघून आई आजुन हैराण झाली.

आम्ही निघालो परत मुंबईला. मुंबई ते अमरावती इतका प्रवास केला काही न बोललेले पवार काका बोलले मला

" कशी वाटली मुलगी???

मी छान तिचा नंबर पण घेतला आणि तिने माझा पण घेतला. म्हटले मी तिला लवकर कळवेन.

माझे हे बोलणे ऐकून आई

एक वेळ तुला कुवारा ठेवेन नाही तर तबस्सुम जवळ लग्न लावेन पण तिच्या जवळ शक्य नाही.

आई आता काय झाले ?? डॉक्टर आहे

मॉडर्न असतात ग मुली आजकाल तू प्रत्येकीला का नावे ठेवतेस???

डॉक्टर असो कलेक्टर असो मला ती सून म्हणून पसंत नाही आधी तू तिचा नंबर डिलीट कर. तुला माझी शपथ...

तिने शपथ देवून मला अखेर नंबर डिलीट करायला लावला.

हवे तर मी तबस्सुम शी लग्न लावून देईन पण ही अजिबात नको.

तबस्सुम मधल्या चाऱ्याण्याची तरी सर आहे का तिच्यात???

मग इतकी चांगली आहे मग तू तबस्सुम ला का नावे ठेवतेस???

काही बोलली नाही.

आता माझ्या नंतर आईने पवार काकांकडे मोर्चा वळविला.

त्यांची अमरावती ते मुंबई चांगली खबर घेतली. मुलगी माहित असताना कशाला आणले म्हणुन.

बिचारे काय बोलणार ??? मावा प्रेमी

मुंबई मधे पोहचल्या नंतर मी मृण्मयीच्या माझ्या लग्नाचा हट्ट धरला. एक तर तबस्सुम नाही तर मृण्मयी चांगला पेच उभा झाला.

अखेर आईने तबस्सुम जवळ लग्नाला हरी झंडी दिली. स्वतः हुन नुसरत खाला जवळ जावून बोलणी केली. ज्या नुसरत खाला जवळ गेले ४ वर्ष बोलली नाही. तिच्या जवळ गेल्यावर त्यांच्या गप्पा रंगल्या आणि माझे तबस्सुमचे स्वप्न.

लग्नाचे.

ह्या लग्नाचे खरे श्रेय जाते ते माझे वडील पवार काका आणि मृण्मयी आणि तिची फॅमिली ह्यांना.

सर्व कावा होता बाबांचा पवार काकांच्या मदतीने मृण्मयी तयार झाली आणि तिची फॅमिली. आईने नापसंत करावे म्हणून सोंग घेतले होते तिने.

ह्याची खबर जर आईला लागली तर माझे कोर्ट मॅरेज होण्या आधी बाबांचे आणि माझे कोर्ट मार्शल नक्की.

तुम्हाला आमंत्रण कसे देवू लग्नाचे कोर्टात आहे ना??


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy