Nishigandha Kakade

Drama

3.5  

Nishigandha Kakade

Drama

ती भेटलेली एक तार....

ती भेटलेली एक तार....

5 mins
416


 सर्वप्रथम माझ्या सर्व लेखक वाचकांना माझा सप्रेम नमस्कार!

       तर आजचा विषय हा भावनिक स्वरूपाचा नाहीये त्यामुळे मला आता माझे आजचे लिखाण माझ्यासाठी थोडे आव्हानच असणार आहे .तसा माझा स्वभाव हा जर.... तर.... मधे कधीही न अडकणारा आहे. मला फक्त जे आत्ता आहे समोर, खर आहे, ते स्वीकारायला आवडते.असो आज तो ही प्रयत्न करून पाहुयात! फक्त आता मी स्वतःहा ती व्यक्ती म्हणून जगणार आहे आणि तिच्याच भाषेत सांगणार आहे आणि ही कथा पूर्ण पने काल्पनिक स्वरूपातील आहे ! 

      मी एका अनाथ आश्रमात वाढलेली खूप मितभाषी मुलगी होते . माझे शिक्षण देखील जेम तेम झाले होते त्यामुळे आश्रमातील ज्येष्ठ लोकांनी माझे लग्न एका मध्यम वर्गीय कुटुंबात लावून दिले होते. मी एक साधारण गृहिणी होते, जीला चूल आणि मूल यामध्येच रमायला जास्त आवडायचे परंतु थोड्याच वेळात माझे नशीब खूप बदलणार होते का कोणास ठावूक याची जाणीव मला सारखी होत होती .रोजचीच सकाळ होती ती मी किचन मधे बटाट्याची भाजी करत होते आणि माझी मुलगी देखील माझ्याजवळ लुडबुड करत होती.तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि माझे मिस्टर मला म्हटले," अग राधा बघ केव्हाची बेल वाजत आहे दार उघड की ? कोण आलय बघ पटकन." मी धावतच हात पुसत पुसत दाराकडे पळाले आणि दार उघडले,बघते तर काय ? पोस्टमन काका होते. ते मला म्हणाले "काय ग राधा तुझे आडनाव काय ग माहेरचे?" मी म्हंटले ,"का ओ काका काय झाले माझे पत्र आले आहे का ?" , ते म्हंटले तू आधी तुझ आडनाव सांग ग बाई ! ", तार आलिये तुझ्या नावाची फक्त आडनाव च समजेना काही ,थोड पुसल गेलय ग चिठ्ठी वरचे आडनाव कारण माझा डबा सांडला थोडा पिशवी मधे !"" पत्ता याच गावच आहे पण नीटसा टाकला नाहीये !"

     मी विचार करू लागले माझे तर कोणीच नातेवाईक नाहीत मी तर अनाथ आहे, मग कोण मला पत्र पाठवेन बर?...मी क्षणाचा ही विलंब ना लावता काकांना म्हंटले , "मी आधी राधा पाटील होते ,आता राधा पवार झाले आहे ." काकांनी चिठ्ठी दोन दा उलटी पलटी करून पाहिली आणि लगेच माझ्या हातात दिली,एक पेपर दिला सही साठी ,मी लगेच सही करून चिठ्ठी ताब्यात घेतली .

     माझे मिस्टर बाहेर आले आणि ओरडू लागले "अग बाई गॅस बंद कर आधी तो सगळ्या भाजीचा धूर झाला ,अजुन किती वेंधळ्यासारखे वागणार आहे काय माहिती? संसार 6 वर्षांचा झाला आपला बास की आता , ती भाजी राहूदे जॅम आणि चपाती भर माझ्या डब्याला मी बटाटे वडे खातो त्या सोबत."आणि मी हातातली चिठ्ठी त्यांना न दाखवता गादि खाली लपउन,डबा भरायला गेले. डोक्यात सतत विचार चालू होते पण मी सर्व आटोपते घेतले आणि त्यांना डबा देवून लवकर कामाला निघण्यासाठी प्रयत्न करू लागले.माझी परी मला म्हंटली ,"मम्मी मी शेजारी टीव्ही पाहायला जाते ." तिच्या पाठोपाठ मिस्टर पण गेले. 


   मी हुश्श ...करत फुल स्पीड फॅन लावला, बेड खालची चिठ्ठी घेवून खालीच बसले. चिठ्ठी जरा चुर्गळली होती आणि डाग पण पडले होते नेमके अडणावावर ,मी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामधे खूप लहान अक्षरात थोडासाच मजकूर लिहिला होता तो असा,

   प्रिय राधा बेटी,

     मैं तुम्हारा गुन्हेगार हु l मुझे माफ कर दो और घर चली आओ l हम हामारा हिस्सा तुम्हे देणे को तय्यार है l कुल मिलाके तुम्हारे हिस्से 1करोड रुपये और कुच्छ मा के गेहने आते है l जब तक तूम्हारे दस्तखत नाही हो जाते तब तक हम कूच नहीं कर पायेंगे l जलदी आने का प्रयास करना l

                     तुम्हारा भाई,

                       गिरधारी.

       मी आता आ वासून बसले होते, माझ्या पायाखालची जमीन मी हाताने नीट पाहत होते की नक्की मी कुठ आहे ?... मला काहीच समजेना नक्की आनंद झालं पैसे मिळणार याचा की दुःख झालं मी अनाथासारखी वाढले माझे नातेवाईक असून पण याचे! दुसऱ्याच क्षणी मी मुलीला आवाज दिला आणि बोलावून घेतले . पर्स अवरली आणि जुजबी समान घेवून घराला कुलूप लावून बस स्टँड कडे झप झप चालू लागले. परिचा आज चालण्याचा मूड नव्हता त्यामुळे मी तिला ओरडण्यापेक्षा कडेवर घेतले आणि 5 मिनिट मधे बस मधे चढले.पळत जावून परी ने शिट पकडली आणि आम्ही दोघी मायलेकी निवांत बसलो . मी ती तार पुन्हा पुन्हा वाचू लागले त्यावरील पत्त्यावर जायला आम्हाला किमान 4 तास तरी लागणार होते. मी परीला खायला देवून माझे डोळे मिटून घेतले आणि स्वप्नच म्हणा ना ते बघू लागले...... 1 करोड रुपये बापरे किती बरं शून्य असतील त्यावर ..?? हो हो 6 असावेत.. नाही नाही 7 असावेत.. ! जाऊदे किती का असेना पण आता ते माझे होणार हे किती महत्वाचे आहे !पण मी काय करू इतक्या पैशांचे ?? विचार करून करून मी बधीर झाले ,पण दुसऱ्याच क्षणी मी माझ्या नवऱ्याचा विचार केला की मी माझ्या नवऱ्याला एखादा धंदा टाकून दिला तर ?? कायम स्वरुपी येणे बाजू राहील .. तसेच माझ्या परी च चेहरा समोर आला आणि मला तिच्या शिक्षणाची काळजी वाटू लागली... पण आता का करू मी काळजी ...? आता तर मला पैशांची काही कमी नाही..मी विसरलेच! मी माझ्या परीला पाचगणी च्या कॉन्व्हेन्ट स्कूल ला पाठवणार असा निष्चयच केला होता .मग किती बर पैसे राहतील निदान 20 लाख उद्योगाला ,10 लाख परीच्या भविष्यासाठी, राहिले 70 लाख ,त्यातले मी 10लाख फिक्स डेपोजिट मधे टाकणार स्वतःच्या नावे.बाकी मी 30 लाख मधे छान घर विकत घेईल असे मी ठरवले ... मग उरले 40 लाख... मी विचार केला की आपण पण काहीतरी उद्योग चालू करावा मग मी एक भाजी मार्केट मधे एक शॉप घेतले जिथे मी काम करू शकेन किंवा ते भाड्याने देखील देईल.. ज्यासाठी माझे 20 लाख गेले असे समजले.. आता बाकी 20 लाख मी माझ्या आणि नवऱ्याच्या वाईट काळा साठी ठेवेन आणि हौस मौज देखील करेन फिरायला जावून! इतक्या पटकन मी मोघम खर्च काढला माझा आणि माझ्या कुटुंबाचा! 

    आता शेवटचे स्टेशन आले होते आणि मी तार हातात घेवून एका हातात परीला ओढत ओढतच पत्ता शोधु लागले.. खूप लोकांना विचारले गिरधारी पाटील कुठे राहतात म्हणून ?? पण सर्वजण नाही माहित अशी मान हालवून पुढे जायचे... मी अगदी थकले होते , " परी चल आपण थोड खवूयात !"अस बोलून मी एका हॉटेल मधे शिरले . तिथे भरपेट खावून आम्ही पुन्हा शोध मोहीम चालू करणार तेवढ्यात मला हॉटेल मालक बोलले," काय गो बाई नवीन दिसते तू इथे कोणी हवं का तुला ??" मी इतकं लक्ष न देता निघाले पण नंतर मला वाटलं की चला यांना विचारू पत्ता एकदा! 

   मी परीला बाकावर बसउन पत्ता विचारला होटेल मालकाला तर तो माझ्याकडे पाहतच राहिला! मी म्हंटले ," ओ शेठ अस का बघताय भूत दिसले काय ?? " तो म्हंटला," बेटा तुझे नाव काय असते ??? " मी म्हंटले ,"राधा पाटील ! "ते अचानक हसू लागले आणि म्हणले की मीच आहे हा पण   

   गिरधारी पाटील नाही गो... मी गिरधारी पटेल आहे ! आणि ही चिठ्ठी मी माझ्या बहिणीला दिली असतो गो तिचे नाव राधा पटेल!

  धन्यवाद.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama