उमेश तोडकर

Romance

3.4  

उमेश तोडकर

Romance

ती पुन्हा नव्याने

ती पुन्हा नव्याने

5 mins
284


प्रेम ही फार विचित्र कल्पना आहे . ती एकदा मनात तयार झाली की दुसरं काही सुचत नाही ..... मग तो प्रेमवीर असो वा प्रेयसी दोघेही त्यात अखंड बुडून जातात......दुनियेला विसरून......फक्त एकमेकात ...

अशिच एक जोडी अशु आणी अंशूमन यांची, प्रेम करावं तर भील्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहचलेलं असं हे प्रेम असावं. पण मातीशी नाळ असलेलं आणी संस्काराची जाणीव असलेलं प्रेम थोडं लाजरं बुजरं असतं. समाजाला घाबरतं, कुटुंबाला भीत भीत आपलं प्रेम पुढे नेत असतं. प्रेम ही स्वाभावीक भावना आहे. कधी कोणावर आपलं मन जडेल सांगता येत नाही. सौदर्याचं वेडं आसणारं मन एका क्षणात कोणामागे घीरटी घालेल काही सांगता येत नाही. तसंच व्यक्तीमत्वाला भुलणारं प्रेम कधी कोणाभोवती आपली जादू पसरवेल काही सांगता येत नाही.. स्त्री असो वा पुरूष दोघोही प्रेमाचे भुकेले असताता त्यासाठी नको ती रीस्क घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत.. असच काहीसं आगळं वेगळ प्रेम अशु आणी अंशूमन यांचं

     अंशुमन तसा मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा तशीच अशु सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील पण दोघेही भेटले ते शिक्षणाच्या व नोकरीच्या निमीत्ताने एकमेकांना

अंशुमन एका विनाअनुदानीत काँलेजात नोकरी करत होता तर अशु महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दोघेही वेगवेगळ्या महाविद्य़ालयात होते पण जाता येता ची भेट व भेटीतील लीफ्ट दोघांनाही एकमेकांजवळ घेवून येण्यास पुरेशी होती ही कहानी काही एका भेटीत सुरू झाली नाही तीला अनेक अबोल लिफ्ट ची साक्ष आहे..

ही लिफ्ट कसली... तर महाविध्यालयातुन घरी येता जाता दीलेली प्रवासातील बाईक वरील लिफ्ट .....हीच लीफ्ट बेधुंद मनाच्या प्रेमलहरीला लिफ्ट करत होती.. कहीशी अबोल तर काहीशी अलबेल असणारी प्रेमकहानी बाईकच्या प्रवासावरून कधी सुरू झाली हे दोघांनाही कळले नाही... कीमान आठवड्यातुन एकदा तरी अशु ला अंशुमन आपल्या गाडीवरून काँलेजमध्ये सोडत असे त्यामुळे दोघांची जवळीक एकदम वाढली होती. दोघांचे बोलणे चालणे वाढले होते.. एकमेकांविषयीचा आदर वाढला होता. पण त्या आदराबरोबर प्रेमाची चाहूल ही एकमेकांच्या मनात डोकावत होती. पण ती व्यक्त करणं काही केल्या दोघांना जमत नव्हतं

बोलायचं तर खुप असायचं पण तोंडातुन शव्द काही फुटत नव्हते तासभर एकमेकांसोबत प्रवास करून सुद्धा शब्दांपेक्षा अबोलाच जास्त अश्या अवस्थेतुन चाललेलं हे प्रेम फक्त मोबाईल मधील मेसेज मधुनच अप्रत्यक्ष व्यक्त होत होतं. पण व्यक्त करणार कोण ?

अंशुमन मनापासुन अशुला पसंत करत होता त्याला ती खुप आवडत होती पण विचारायचं धाडस मात्र होतं नव्हतं . अशुच्या बाबतीत पण कदाचीत असंच असावं असा समज त्याचा होता.. रात्रंदीस तुझाच ध्यास तुझीच आस मना लागली अशी अवस्था अंशुंमनची झाली होती.... पण ही अवस्था व्यक्त कशी करायची कोणत्या माध्यमातुन करायची हे काही केल्या कळेणा अशु मात्र त्या बाबतीत मौन होती. ती बोलताना मात्र सकारात्मक असल्याचं भासत होतं पण ही सकारात्मकता व्यक्त कशी होणार हे मात्र कळतं नव्हतं. दोघेही एकमाकांसोबत तांसंतास बोलत असतं फोनवर चॅटींग करत असतं व त्या माध्यमातुन आपलं अप्रत्यक्ष प्रेम व्यक्त करत असतं पण तो दीवस जवळ काही येईना ......

     एक दीवस मनाच्या धाडसानं त्यानं तीला विचारलं

“अशु मला तुझ्याशी लग्न करायचं आहे... मला तु खुप आवडतेस तुझा काय विचार आहे”

“अशु हसत म्हणाली” घरच्याच्या कानावर घालते तु ही तुझ्या घरच्यांच्या कानावर घाल

असं तीनं सांगीतलं

या एका शब्दांनं अंशुमन आनंदुन गेला... त्याला जग जिंकल्याचं समाधान मिळालं त्याची अनं तीची जोडी आता जमली होती.

प्रेमाच्या या नव्या अंकुराला आता प्रेम फुलांनी सुगाधीत करून टाकलं होतं

दोघेही आता मिलनाच्या प्रतीक्षेत होते ......

“दीवसामागुन दीवस गेले

रात्रीमागुन रात्री गेल्या

प्रेमाचा हा परीस स्पर्श

बोलण्यापुरता मर्यादीत

होवुन गेला”

“अशु एकदीवस म्हणाली”

मी घरी आईजवळ बोललीय

 तीची संमत्ती आहे

पण.........

पण काय?

“अंशुमन म्हणाला”

घरच्यांना पसंत नाही

त्यामुळे तु हे विसरून जा.......

‘फोन स्विच ऑफ झाला’

‘प्रवास खंडीत झाला...’

‘बोलणं मुक झालं’

‘मन खिन्न झालं’

पण तरी सुद्धा त्या मनात अशु कायमची वसली पहीलं प्रेम बनुन...कायमची

या सर्वातुन तीला एक दीवस अनेक खटाटोप करून भेटण्यास बोलवण्याचं ठरवलं

“हॅलो अशु , मला तुला एकदा भेटायचं आहे ”.... शेवटचं..... खुप बोलायचं आहे.

“फक्त एकदा” प्लीज अशु.... प्लीज.....

ती भेट म्हणजे आयुष्यातील पुढच्या टप्यात आयुष्यातील सुख दुखःत सदैव साथ देण्याचं वचन होतं, ते ही एक मीत्र म्हणुन हातात हात घेवून दीलेलं,

तो हातात घेतलेला हात म्हणजे तीला केलेला पहीला वहीला स्पर्श होता

त्यांचं प्रेम ईतकं पवित्र होतं की त्यात कधी शरीर सुख हा मुद्धा कधी आलाच नाही

ईतकं आघाध प्रेम होतं ते ...... अपुर्णतेकडे पोहचलेलं

तीच्याशी शेवटचं खुप बोलुन मनात कीत्येक दीवस साचलेला शब्दसाठा तीच्याजवळ रीता केला आणी तीचा निरोप घेतला

कुटुंबाच्या विरोधाखातर एका प्रेमाचा अंत झाला.......

पण या विरहातुन बाहेर पडण्यासाठी अंशुमन ला एक वर्ष लागला

त्याचं एकच कारण ते म्हणजे त्याच्या प्रेयसी बरोबरच्या सहवासाचा दी एंड झाला

एक दीवस असाच विचार करत तो बसला होता ...

अशु कशी असेल तीला माझी आठवण येत असेल का .....

ती कधी आपल्याला भेटेल का ?

भेटलीच तर बोलेल का ?

ती सहवासातुन ईतक्या लांब गेली होती की, तीचं मन आपल्या मनाशी पुन्हा कधी संवाद साधेल असं मनाला कींचीत ही वाटलं नाही

काळ वेळ बदलत असते तशी ती कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे तीच्या सोबत आपणालाही बदलावेच लागेल या आटीवर अंशुमन ही बदलला. एका प्रेमाच्या विरहातुन बाहेर पडत.... दुस-या प्रेमभरीत संसारात तो मग्न झाला... पण पहीलं प्रेम हे पहीलचं असतं ते कीतीही झालं तरी विसरता येत नसतं, ही बाब मात्र खरी आहे....

ती कोणत्या ना कोणत्या वळणावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोटावी तीच्याशी चार शब्द बोलावे ही ईच्छा मात्र त्याच्या मनात अजुनही राहीली होती... एकीकडे विरह भोगला ..... एकीकडे राग ही व्यक्त केला व मनात भेटण्याची ईच्छाही ठेवली यालाच प्रेम म्हणतात का ?

असं मनात वाटू लागलं होतं

अशातच अंशुमनचा विवाह ठरला

“संन्मीत्रा” ही सुशील सुंदर स्त्री त्याच्या आयुष्यातील अर्घांगीनी म्हणुन आली

त्यांचा विवाह हा अंशुमनच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला कारण तीच्या आयुष्यात येण्यानं त्याची अर्थीक सामाजीक राजकीय प्रगती झाली...

दोघांचा सुखी संसार बहरला होता त्या संसाराच्या वेलीवर दोन सुनेत्रा सुजल नावाची नाजुक सुंदर फुलं फुलली.

 त्याच्या संसाराला आता दहा वर्षे पुर्ण झाली .....

काळ दहा वर्षे पुढे गेला होता आयुष्यात नवनवे पर्व घेवून आयुष्य सुंदर रीत्या चालले होते ...

संन्मीत्रा व अंशुमन यांच आयुष्य खुपचं मजेत जात होतं

अशु आता खुपच लांब निघुन गेली होती तीची जागा आता संन्मीत्रा ने घेलती होती .. नुसती घेतली नव्हती तर काबीज केली होती.. त्यामुळे तीचा आता विसर पडला होता.........

अंशुमन विसरला होता. मात्र नियती विसरली नव्हती. ती पुन्हा दहा वर्षांनी फिरून आली होती.....

अंशुमन सुजल सोबत रविवारची सुट्टी मजेत घालवत होता तेवढ्याच फोन वाजला

अंशुमनने फोन उचलला

“हॅलो ओळखलं का ?”

῾कोण’

नाही ओळखलं

विसरला की काय ?

“मी अशु बोलतेय”

काळजात धस्स झालं

मन कासावीस झालं, बेचैन झालं.

क्षणात भुतकाळ जागा झाला...

῾हॅलो काय झालं ?’

῾काही नाही...’

“कशीकाय आठवण झाली अंशुंमन म्हणाला”

῾सहज काय चाललय बघावं म्हटलं’

“वेळ आहे का बोलायला अशु म्हणाली”

बोला ना

῾मग काय चालालय कसे आहात ?’

῾छान आहे’ तुम्ही?

῾मजेत’

नंतर करा काँल मग

नंबर सेव्ह करा ?

ओके बाय ?

अंशुमन विचारमग्न झाला

इतक्या वर्षानंतर हीने कसा काय फोन केला

पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

तीचा नंबर सेव्ह करून ठेवला

वाँट्सअँप वरील स्टेटस ला रीप्लाय देत देत पुन्हा एकदा नव्यावे दोघांची मैत्री झाली

एकमेकांशी संभाषण होवू लागले. दोघे एकंमेकांचे मीत्र झाले पण त्या मैत्रीत मागील पाऊलखुणा मात्र उमटु दील्या नाहीत एक निस्वार्थ मैत्राची नव्यानं सुरवात झाली ...

भुतकाळावर मात करीत ......एक नवे नाते घेवून ..

अंशुमन मनात पुटपुटला...

 पहीलं प्रेम पहीलं असतं

ते कधीही विसरता येत नसतं.

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance