Deore Vaishali

Classics

4.0  

Deore Vaishali

Classics

ठेच.....

ठेच.....

2 mins
401


किती हो साधा शब्द...!!. पण तिचा घाव किती तो गहरा असतो नाही.. का??? माणसाचं सार जीवनचं बदलून सोडणारी ही ठेच.. फक्त तिच स्वरूप वेगवेगळ असत बस...!!

भावनांच्या गर्तेत... कर्तव्याच्या धुंदीत... प्रेमाच्या पाशात... आपलेपणाच्या अभावात....जबाबदारीच्या चक्रव्यूहात... लोकांच्या गरजांच्या पुर्ततेत...नको त्या दानात... अतिविश्वासात...कधी ?? कशी?? कुढे??? बसल्याशिवाय राहात नाही ...ती ठेच..!!

एक चांगलं व्यक्तिमत्त्व हलवून सोडणारी...मनाला हेलावून सोडणारी...नको त्या विचारात ओढणारी...चांगल्या माणसाला विधवंस्क बनवणारी... विश्वासघातकी... व वाईटांचा स्विकार करायला लावणारी ही ठेच..

तसं वाईट कुणी नसतंच हो...!!..वाईट असते वेळ.!!..वाईट असतो काळ...!!..त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतो तो व्यक्ती... पण मागे लागलेले सारेच.ध्येय.गाठायच असत..पाठलाग होत असतो...सगळ्यांना खुश करायच असत..ऋणही फेडायचे असतात.. ह्यासगळ्या घाईत..पुढे पळतांना...पाठिमांगे असणार्यांचा तो पाठलाग जीवघेणा असतो....व घाईत तो धडपडतोच...ठेच लागते म्हणजे.. लागतेच...!!.

पळवाट शोधत नसतो तो....!!फक्त जरा वेळ हवा असतो त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी... पण समाजाला घाईतच टाकायच असत.सगळीकडुन घुसमट होते... व ह्या घुसमटीत तो इतका गोधळतो...लागलेली ठेच त्याला..चुकांची जाणिव करून देते...व पश्चातापाशिवाय काही उरलेले नसत बरोबर.. ना??.

कोणाला आवडत हो...ठेच खाण..पण हे मनुष्य जीवन...


ठेचेतुनच प्रवास जीवनाचा...

ठेचेतुनच शिकणे...

ठेच काळजात बसल्याशिवाय... 

कळतं नाही जगण्यातील चटके....


हेच सत्य...!!..

कोणीही ह्यापासून सुटतं नाही... व ठेच लागल्याशिवाय जीवनाची गणिते कोणाला कधीच उमजत नाहीत....!!

कधी नात्यांमध्ये ठेच लागते...तेव्हा दुरावा येतोच.. व तो पसंतही करावाचं...कोणतीही गोष्ट व्यक्ती थोडिच घडवून आणते बर...!! .पैसे..भावना..वेळ..समर्पण.. अशा कितीतरी गोष्टी असतात... त्यात कोणास दुखवण्याचा हेतू थोडाच असतो...ठरवून घटना कधी घडतात का हो...!!..नाही ना??.मग एखाद्या मागे..इतकही का लागावं कि समोरचा ठेचं लागून पडला तर उठताही येणार नाही...!!.

जरा वेळ द्या...हो...!!त्याला झालेल्या चुकांची जाणिव झालेली असते..व त्यातुन तो मार्गही काढू पाहतो...!!..तुमची मदत,सहकार्य, ऋण,प्रेम,सगळं्याची जाणीव असतेच त्याला...फक्त जरा वेळची साथ चुकलेली असते ..बसं...ती वेळ घडुन येण्याची... आधार देण्याची... जरा हिमतीने त्याच्यामागे कुणीतरी उभं राहाण्याची गरज असते बघा...जर ती मिळाली तर व्यक्ती उभारी घेईल... व हिमतीने उभं राहिलं...बदलणार तर मुळीच नाही... पण परिवर्तन हे चांगल्या गोष्टीत होईल... मन दुखावणार नाही...द्वेष वाटणार नाही.. आपले कर्म चुकले याची खंत असणार नाही... व सहाजिकच.... जिव्हारी ठेच बसणारचं नाही...!!

व्यक्तीला ठेच जर लागलीच नाही तर चांगुलपणा कधी संपणारच नाही...!!.

म्हणून जपा नाती...सांभाळा आपलेपण..!!.वेळेस जपा संकटातील व्यक्तीला.... जपेल तोही आयुष्यभर तुमच्या उपकारांची ओझी....!!..नका पाठि पडु थकलेल्याच्या संकटात.... कारण तुमच्या ऋणांचे ओझे खांद्यावर घेऊन पळत असतो तो ध्येय गाठण्यासाठी... व त्यात मग लागली जर ठेच जिव्हारी तर ...थकतो,हारतो,मरते मन...व अलिप्तता स्विकारतो व्यक्ती सगळ्या बंधनातून जन्मभर..!!...


■लेख आवडेलच असे नाही...काही मते कोणास पटतील कोणास नाही.आवडले त्याने घ्यावे... नसेल आवडले तर सोडून द्यावे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics