Poonam Pingale

Romance

3  

Poonam Pingale

Romance

तूच माझी

तूच माझी

5 mins
212


उर्वशी सकाळी सकाळी च नाराज होऊन बसली होती . उत्तम तिचा नवरा खुप वेळ तीला पाहत उभा होता...काहीतरी बिनसलं आहे हीच हे तर समजत होत त्याला पण नक्की काय झालं होतं कोणास ठाऊक...

दोघांचं लव मॅरेज होत 20 वर्ष झाली होती लग्नाला ..लव मॅरेज असूनपन आजपर्यंत उत्तम तिला आय लव यु अस बोलला नव्हता ..आणि ती खंत उर्वशीला नेहमीच वाटायची....पण एक मोठा प्रश्न ना ?..जर आय लव यु नाही बोलले तर लव मॅरेज कस ?? होना??

तर त्याच झाल अस उर्वशी हे एका अप्सरेच नाव आणि ते हिला अगदी शोभेसच होत ..एका लहानश्या कुटूंबात तिचा जन्म झालेला ..दिसायला खूपच देखणी .अस वाटावं जणू इंद्राच्या दरबारातली अप्सराच.. सगळ्यात हुशार ..अभ्यास, स्वयंपाक, नृत्य, गायन, आणि बऱ्याच कला होत्या तिच्यामध्ये..पण वडील एका कंपनी मालकांच्या गाडीवर ड्रायव्हर होते ..आई कपडे शिवत असे ..त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू होता ..एक भाऊ होता तिला ..त्याच लग्न झालं आणि तो खुशाल त्याच्या बायकोला घेऊन वेगळा राहू लागला ..आता या वयात तिच्या वडिलांना कष्ट करावे लागत होते ..खूप वाईट वाटायचं उर्वशीला पण काय करणार ती तरी बिचारी..तिचं शिक्षण चालू होतं ..,शेवटचं वर्ष चालू होतं तीच ..इतकी वाईट परिस्थिती असून पण तात्यांनी म्हणजे उर्वशीचे वडील .. दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिल होत ..ते नेहमी म्हणत ,"माणूस शिक्षणाने मोठा होतो ...पैसा पण त्याचाच गुलाम आहे ..जो शिकतो तो जगतो ..मग तो जगाच्या पाठीवर कुठेपण सुखात राहू शकतो.. आणि जो नाही शिकत तो माझ्यासारखी दुसऱ्याची गाडी चालवतो.. 

उर्वशी चांगल्या मार्कानी bcom झाली आणि तात्यांनी अंकुश लवाटे साहेबाना शब्द घातला ..उर्वशी च्या नोकरीसाठी.. साहेबानी लगेचच तिला बोलावं म्हणून सांगितलं ..तिची सगळी सर्टिफिकेट घेऊन ती इतक्या वर्षात पहिल्यांदाच तात्यांच्या ऑफिसला आली होती आणि ते पण तिच्या आयुष्यातला अगदी पहिला वहिला इंटरव्ह्यू द्यायला ..खूप घाबरतच ती आली ऑफिस मध्ये ..तिला सकाळी 11वाजता यायला सांगितलं होतं इंटरव्ह्यूसाठी पण ती १०लाच हजर झाली होती ..तात्यां सकाळी स्वतः ड्युटीवर जात असताना सारख सारख समजून सांगत होते..साहेब वेळेचे खूप पक्के आहेत ग पोरी ..उशीर करू नकोस ..त्यामुळे ती अशी लवकर आली होती.

इतक्यात आपल्या एकुलत्या एक मुलासोबत अंकुश साहेब ऑफिस मध्ये आले पाठोपाठ तात्या त्यांची बॅग आणि डबा घेऊन आले...ते पाहून उर्वशी पटकन जागेवर उभी राहिली ..जस सगळा स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग विश करत होता तसच हिने पण केलं..आज मला गेस्ट मध्ये कोण ग्रीट करत आहे असा विचार करून साहेबानी मागे वळून पाहिलं ..आणि मागे बघतच राहिले ..त्यांच्या मनात विचार आला इतकी सुंदर मुलगी आहे तरी कोण ? आणि ही मला का ग्रीट करत आहे ? असाच विचार करत ते तिच्या जवळ आले , "कोण आपण ?काही काम आहे का आमच्याकडे तुमचं? "

उर्वशी घाबरतच : सर मी इंटरव्ह्यू साठी अली आहे ..तुम्ही बोलवलं होत मला ..

साहेब : होका ..नाव काय तुमचं?

उर्वशी : उ..उर्वशी जगनाडे

साहेब : जगनाडे ?ऐकल्यासारखं वाटतय ..ते विचार करू लागले .इतक्यात बॅग आणि डबा आत ठेऊन तात्या बाहेर आले ..इथे काहीतरी चुकीचं घडलं की काय या विचारात घाबरून पळतच ते त्यांच्या जवळ आले

तात्या : काही चुकलं का साहेब पोरीचं?

साहेब : तात्या तू ओळ्खतोस का या मुलीला?

तात्या : हो साहेब..ही माझी मुलगी आहे ..उर्वशी तुम्ही आज बोलवलं होत ना तिला इंटरव्ह्यू साठी.

साहेब: अरे हो ..मग त्यांनी एका ऑफिस बॉय ला बोलावलं आणि सांगितलं ,"जरा चहा कॉफी बघा काय हवंय तिला .." आणि ते हसतच स्वतःच्या केबिन मध्ये गेले .हे सगळं त्यांचा मुलगा तिथेच थांबून बघत होता .त्याला हे सगळं जरा विचित्रच वाटलं होतं ..तो ही त्यांच्या मागोमाग केबिन मध्ये गेला

उत्तम : पप्पा ..हे सगळं काय होत ? जे आत्ता बाहेर झालं? 

साहेब : कारे काय झालं ?असं विचारण्यासारखं?

उत्तम : पप्पा एका ड्रायव्हरच्या मुलीची इतकी काळजी कशाला ? आता सगळेजण तोच विचार करत असणार 

साहेब : हे बघ मी जगाचा विचार जास्त करत नाही.. हो फक्त जे स्वतःला पटत ते मी नक्कीच करतो.

उत्तम : ठीक आहे.. पण आता तिला कसला जॉब देणार आहात तुम्ही ? हौसेकीपिंगच का? काय काम करणार आहे ती इथे? आणि त्यासाठी तिचा इंटरव्ह्यू घ्यायची काय गरज आहे पप्पा?

साहेब : पोरा तू जरी विदेशात जाऊन शिकून आला असलास तरी आजून तुला माणस ओळखता येत नाहीत ...तिचा इंटरव्ह्यू घेताना तू इथेच थांबायचंस ..

उत्तम : छे मी नाही थांबणार ..मी चाललो माझ्या केबिन मध्ये 

साहेब : एकदम कडक आवाजात ,"नाही तुला अस जाता येणार नाही ..तु तिचा नकळतपणे अपमान केला आहेस ..तिची योग्यता न जाणताच तू इतकं काही बोललास ..तुला अस जाऊनच देणार नाही मी .बस इथे माझ्या बाजूला 

आता वडिलांच्या आवाजातली जरब पाहून तो थोडा घाबरलाच ..बाजूची दुसरी खुर्ची घेऊन तो साहेबांच्या बाजूला बसला.

साहेबांनी रिसेप्शन ला फोन करून त्या पोरीला आत पाठवून द्या अस सांगितलं ..आणि थोडी घाबरतच उर्वशी केबिन मध्ये आली ..शिष्टाचार म्हणून तिने दरवाजा नॉक केला ...आणि इंग्लिश मध्ये ," May I Come in sir? " अस विचारलं ..उत्तम असाच इकडे तिकडे पहात बसला होता ..पण तिच ते इंग्लिश मध्ये बोलणं , त्याला अस वाटलं कोणतरी कॉन्व्हेंट ची मुलगीच बोलली.. आणि तो एकटक तिला बघू लागला ..त्याला जाणवलं ..कमालच आहे एका ड्राइव्हरची मुलगी आणि इतकी सुंदर ..तिचे डोळे पिंगट घारे.. आणि बोलके ...ओठ लिपस्टीक न लावताच गुलाबी ..केस पिंगट आणि लांबसडक त्याची एक साधी वेणी घातली होती तिने ..अंगावर जो ड्रेस होता त्याला काही ठिकाणी बऱ्याच वेळा शिवलाय अस दिसत होतं..पायात एक साधी स्लीपर होती तिच्या ...आणि एका प्लॅस्टिक च्या पिशवीत तिने तिचे सर्टिफिकेट्स आणले होते. साहेबांच्या आवाजाने त्याची तंद्री मोडली

साहेब : ये मुली आत ये..

उर्वशी आत येऊन खुर्ची जवळ उभी राहिली

आता उत्तमला तिची मजा बघायची इच्छा झाली ...काय टीव्हीवर बघून फक्त may i come in बोलून impression नाही ना पडता येत ..आता बघतोच हिच्याकडे..

उत्तम : please sit down.

उर्वशी : thank you ! sir अस बोलून खुर्चीत बसली .तिच्यात काहीतरी नक्की होत ज्यामुळे उत्तम मनात नसताना पण तिच्याकडे बघत होता ..

साहेब : तर मुली तुझं शिक्षण काय झालंय ? तू काय काम करू शकशिल?

उर्वशी: सर तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी ..

इतक्यात पटकन उत्तम : मग उद्यापासून टेबल पुसणे , साफसफाई ही काम करा चालू तुम्ही ..

उर्वशी : हो नक्की ..चालेल सर ..मला कामाची खूपच गरज आहे ..,

साहेबांनी अतिशय रागात उत्तमकडे पाहिलं आणि तिला बोलले ..आमच्या उत्तमला ना मस्करी करायची खूप सवय आहे ..तू राग मानू नकोस ..बोल काय शिक्षण झालंय तुझं? 

उर्वशी : सर माझं बीकॉम पूर्ण झालाय फ्रॉम the इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स..

साहेब : अरे वाह ! तिथे तर खुप हुशार मुलांना पण लवकर ऍडमिशन नाही मिळत तुला कस ग मिळालं पोरी ?

उर्वशी : सर मला माझ्या मेरिट वर मिळालं ऍडमिशन.. 10वीला मला 95% होते ..माझ्या शाळेत मी पहिली आली होते .

साहेब तिरक्या नजरेने उत्तमकडे पाहत हसले ..उत्तम तर एकदम कोणीतरी अचानक कानाखाली मारल्यासारखा बसला होता ...त्याला हा खूपच मोठा धक्का होता ..बापरे इतकी हुशार आहे ही ? बोलायला काय जातंय हिला ..

उत्तम : तुमचे सर्टिफिकेट्स आहेत का पाहायला ? बघू बर ..

उर्मिलाने पिशवीतले सर्टिफिकेट काढून त्याला दिले ...प्रत्येक वर्षी ही मुलगी फर्स्ट क्लास मध्ये पास झालेली ..शिवाय इतर कलागुणांचे पण सर्टिफिकेट होतेच त्यात ..आता तर उत्तम घेरी येऊन पडेल की काय असं वाटतं होत ...

#तूच माझी 

©पूनम पिंगळे

#भाग 2

साहेब : काय मग उत्तम काय काम देऊया आपण हिला ?

उत्तम : पप्पा ते तुम्हीच ठरवा आता मी काय बोलणार ?तो लाजून उर्वशीकडे पहात होता आणि हसत होता ...साहेबांनी त्याच्या मनातलं बरोबर ओळखलं ..

साहेब : मुली उद्या 1तारीख आहे ..उद्यापासूनच ये मग तू कामावर

उर्वशी : हो नक्कीच साहेब ..पण मी काय काम करायचं ?माझा पगार किती असेल ?आणि माझ्या कामाची वेळ काय असेल ? ते पण सांगा ..म्हणजे मला घरी तस सांगता येईल ..हा माझा पहिलाच जॉब आहे सर खूपच उत्सुकता आहे मला..आई ला सांगेन खूप आनंद होईल तिला ..

साहेब : तू आमची दोघांची आणि या कंपनीची काळजी घ्यायचीस 

उर्वशी: म्हणजे ? मी नाही समजले ..

साहेब : अग तू आमची दोघांची पर्सनल  सेक्रेटरी म्हणून काम पाहायचं ..

उर्वशी : साहेब हा माझा पहिलाच जॉब आहे हो ..मला कस जमेल इतकं जबाबदारीच काम? मघाशी छोटे साहेब बोलले ते पण काम चालेल मला 

साहेब : उर्वशी पोरी आग करशील तू सगळी काम ..मला खात्री आहे ..माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर ..

उर्वशी: साहेब मी खूप आभारी आहे तुमची ..मी नक्कीच प्रयत्न करेन ..तुमच्या विश्वास नाही मोडणार मी ..पण माझा पगार किती असेल साहेब?

साहेब :सुरवातीला महिना ३००००/- देऊ पुढे मग बघू 

उर्वशी : एकदम अचंबित होऊन ,"काय ?इतका जास्त ? अहो नाही नाही साहेब मला ५ -७ हजार पण चालेल हो ..इतका कशाला ?

साहेब : अग जास्त नाही बरोबर आहे हा पगार 

उर्वशी : तिने अंकुशरावांच्या पायावर डोकं टेकवल ..आणि तिला रडूच आलं ..साहेब मी तुमची खूप आभारी आहे हो ..माझ्या घरी सगळे खूप खुश होतील आता..

साहेब : अग मुली सुखी हो..तू आहेसच इतकी हुशार ...हिरा चिखलात पण चमकतो आणि तिजोरीत पण ..त्याचे गुण सगळीकडे सारखेच असतात ग ..तू एक हिराच आहेस जो आमच्या हाती लागला आहे ..आणि हिऱ्याची खरी किंमत आजपर्यंत कोणीच नीट करू शकला नाहीये.

उर्वशी : अहो साहेब तुम्ही माझं खूपच जास्त कौतुक करत आहात हो ..मी काही इतकी पण हुशार नाही ..पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार ..येते मी उद्या सकाळी ..पण किती वाजता येऊ ..

साहेब : सकाळी १० ते ६ वेळ असेल तुझी 

उर्वशी : चालेल साहेब ..येते मग मी ..उद्या भेटूया 

उत्तम मध्ये काहीच बोलत नव्हता ..तो अगदी झापटल्यासारखा फक्त उर्वशीकडेच बघत बसला होता ..त्याला याचा पण विसर पडला होता की आपले वडील आपल्याला पाहतील ..काय बोलतील ? हे सगळं सोडून तो फक्त तिलाच बघत होता ..आणि ही गोष्ट साहेबाच्या लक्षात आलं होतं आणि ते गालातल्या गालात हसत होते .

उर्वशी आता केबिन मधून गेली होती..पण उत्तम ती गेली त्या दरवाज्याकडेच बघत बसला होता ..

साहेब : अरे उत्तम ..ए पोरा ..अरे गेली ती घरी तिच्या..येईल उद्या मग भेट तू तिला ..

उत्तम एकदम लजलाच .., " अहो तस काही नाही पप्पा, म मी असाच ..म्हणजे.. बसलो ..नाही ..म्हणजे."  

त्याला अस बोलताना पाहून अंकुशराव जोर जोरात हसू लागले ..अहो उत्तमराव सांभाळा स्वतःला एका ड्राइव्हरची मुलगी आहे ती ..आणि शिवाय उद्यापासून आपली कर्मचारी..

उत्तम एकदम ओशाळून , " ओ पप्पा ..काय हे ..जाउद्याना ...खर आहे मला नाही ओळखता येत माणस .".

उर्वशी हवेतच उडू लागली होती ..तिला हे सगळ स्वप्नवत वाटत होतं ..ती घरी गेली .हातपाय धुवून आधी देवाला हाथ जोडले ..दिवा लावला ..आईच्या पाया पडली ..वडील घरी नव्हते तिला अस झालं होतं कधी एकदा तात्या घरी येतील आणि मी त्यांना ही खुशखबर देईल..

आईच्या पाया पडल्या पडल्या आईने तिला गळ्याशी धरलं ..तिचे डोळे भरून आले होते ..तिने त्या भरल्या अवजातच विचारलं , "पोरी मिळाली ना ग नोकरी तुला "

उर्वशी : तुला कस समजलं ,कोणी सांगितल?

आई : अग तुझ्या आनंदानी सांगितलं मला ..आई आहे बाळ मी तुझी ..तू न सांगताच बरच काही समजत बघ मला .

उर्वशीने आईला कडकडून मिठी मारली ..कितीतरी वेळ दोघी मायलेकी अशाच एकमेकींच्या मिठीत होत्या ..दोघींच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू घळाघळा वहात होते ..

इतक्यात आई ," किती ग पगार सांगितलं साहेबांनी?"

उर्वशी : अग आई मला आजून पण विश्वास बसत नाहीये ..मला त्यांनी ३००००/- रुपये महीना पगार संगीतला आहे आणि मी ना त्या दोघांची सेक्रेटरी आहे ग उद्यापासून..

आई : नशीब काढलस ग पोरी ..तिने उर्वशीच्या तोंडावरून दोन्ही हात फिरवले आणि स्वतःच्या डोक्यावर ठेऊन बोट मोडली ...कडकड वाजली बोट तिची ..निघालीग बाई नजर माझ्या पोरीची ..चल आता जेऊन घेऊ ..पण आता एक पंचायत होती ..,उद्या कोणता ड्रेस घालायचा ऑफिसला जाताना? त्यातल्या त्यात जो बरा होता तो ड्रेस घालून ती आज गेली होती ऑफिसला .तिला शांत झालेंली पाहून 

आई : काय झालं ग ? अचानक तुझा चेहरा का उतरला ?

उर्वशी : अग आई माझ्याकडे हा एकच ड्रेस त्यातल्या त्यात चांगला होता आता उद्या मी काय घालू ग ऑफिसमध्ये?

इतक्यात मागून आवाज आला : उद्यापासून तू हे कपडे घालायचेस.. दोघींनी दचकून मागे पाहिलं तर अंकुशराव हातात पिशव्या घेऊन उभे ..आणि त्यांच्यामागे तात्या पण ..त्यांच्याही हातात पिशव्या होत्या ..

तात्या : अहो साहेब मला काय माहीत तुम्ही हे सगळं माझ्या पोरीला घेतलय ..अहो मी हे घेऊच दिल नसत हो ..नको नको हे इतके कपडे नको ..तुम्ही परत करा साहेब ..इतक्या महागाचे कपडे घालायची सवय नाही आम्हाला ..

साहेब : अरे गप रे तात्या ..आता सवय करायला हवी हिला ..आमची सेक्रेटरी आहे ती उद्यापासून.. मग असे कपडे लागणारच ना तिला ..बर उर्वशी मी निघतो आता ..पण एकदा हे कपडे घालून बघ बर  नाही बसले तर बदलावे लागतील ना ..

उर्वशीने त्या बॅग घेतल्या आणि आत गेली ..तिला ते ड्रेस अगदी बरोबर बसले होते.तिने बाहेर येऊन सांगितलं साहेब अगदी बरोबर बसले ड्रेस मला ..

साहेब : चला बर झालं ..आता हे चप्पल आणि शूज पण बघ बर घालून ..

अरे बापरे ते पण चक्क बरोबर बसले . ते कसं काय बर 

साहेबांनी दुकानात खरेदी करताना तात्यांना विचसरल होत अगदी तुझ्याच पोरीच्या वयाची माझ्या मित्राची मुलगी आहे तिच्यासाठी खरेदी करायची आहे तुला तुझ्या मुलीची माप माहीत असेल तर सांगरे ..तिच्याच अंगकाठी ची आहे बघ ती ..आणि आजपर्यंत उर्वशीचे सगळे कपडे आणि चप्पल तात्याच आणायचे त्यामुळे त्यांनी बरोबर माप सांगितली होती ..त्या कपड्यांमध्ये उर्वशी एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती ..

साहेब : बर आता मी जातोरे तात्या गाडी घेऊन.. तू थांब आता घरीच 

तात्या : अहो पण साहेब ..तुम्हाला रात्री नीट दिसत नाही ..नको मी येतो 

साहेब : अरे जास्त लांब नाही जायचं मला ..जाईन मी बरोबर ..तू नको करुस काळजी माझी ..

आणि साहेब बाहेर गेले ..सगळेजण त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला पहात होते ..आज त्यांच्या रूपाने देवच आले होते घरी त्यांच्या..

क्रमशः


#तूच माझी 

©पूनम पिंगळे

#भाग 3

दुसऱ्या दिवशी उर्वशी १० मिनिट आधीच कामावर आली ..नवीन ड्रेस आणि चप्पल मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती ..ती reception मधेच बसली होती ..जोपर्यंत साहेब येत नाहीत तोपर्यंत तिला तिथेच बसावं लागणार होतं ..थोड्याच वेळात तिथे HR मॅनेजर आले ..त्यांनी उर्वशीला पहिलं.

HR मॅनेजर मनदीप हे खूपच भारी पात्र होत त्यांच्या ऑफिस मध्ये ...डोक्यावर पगडी,  नेट लावून व्यवस्थित केलेली दाढी...गोरा गोरापान रंग ..हातात कडा ..आर्मी रिटायर्ड मेजर..उंची 6 प्लस होती त्यांची ..एकदम रुबाबदार व्यक्ती.. पण खूपच जॉली ..काय जोक करेल कधीच अंदाज यायचा नाही याचा ...मनदीप उर्वशी जवळ जाऊन तिला पाहू लागले... उर्वशी पटकन जागेवरच उभी राहिली ..तिला समजत नव्हतं हा माणूस मला इतक्या संशयाने का न्याहाळत आहे ..इतक्यात त्याच्या आवाजाने ती घाबरली ..

मनदीप: ओये गुड मॉर्निंग जी !! तुस्सी उर्वशी हो ना जी ? वो तुमचा फोटो वेखा था अस्सी ..थारे बायोडाटा विच... आज तुम्हारा फर्स्ट डे हे ..रेस्ट करो ..बैठो बैठो.. मिळते हे जी थोडी देर के बाद...आणि तो निघून गेला.

उर्वशी : मनातच हसत होती ..हे काय पात्र आहे ..ना नीट मराठी ..ना इंग्लिश , ना हिन्दी ..आणि ना पंजाबी..जाऊदेत आपल्याला काय आपण आणि आपलं काम ..मला माझं कामच तर करायचंय ..मला तात्यांना आता आराम करायला लावायचं आहे ..आई ने पण खूप कष्ट केलेत आयुष्यभर आता या दोघांच्या आरामाची वेळ आहे .

आज साहेब आणि उत्तम भराभर येऊन सरळ केबिनमध्ये गेले ..त्यांनी कोणाच्या गुड मॉर्निंगला पण उत्तर दिलं नाही ..काय झालं होतं कोणास ठाऊक .दोघे खूपच अस्वस्थ झाले होते ..इतक्यात फॅक्टरी वरचा एक कर्मचारी धावत आला ..मनदीपला म्हणाला साहेब माणिक ची हालत खूपच खराब आहे ..ते विमा वैगरे बघा ना ..अहो पैसे भरायला लवतायेत नाहीत आमच्याजवळ.मनदीप ने त्याला शांत केलं पाणी दिल ..

मनदीप : पाजी तुस्सी पाणी पी ..थंडा होकार मुझे बताव हुआ की हे?

तो कामगार : काल रेणू आमच्या माणिकला घेऊन आली होती कामावर , घरी कुणीच नव्हतं तिला बघायला ..रेणू कामात असताना माणिक अचानक एका मशीनच्या लोखंडावर धडकली तिच्या डोक्याला लई लागलं ..आम्ही नेलं डॉक्टर कड पण रातची येळ आणि पैश्याशिवाय कोणी तिला बघना ..मग मी माझ्या दोस्तांकडून घेऊन भरलं पैस पण आता ते परत पैस मागतात..मग माझा दोस्त बोलला तुमची विमा असलं ..म्हणून धावत आलोय . आत्ताच साहेबांशी पण बोललो मी..ते बोलले ऑफिसला ये ..आलेत का ओ साहेब ..

हे सगळं उर्वशी ऐकत होती ..आत्ता तिला समजलं हे दोघे असे का अस्वस्थ आहेत ..ती धावतच केबिनमध्ये गेली. आज तिने नॉक नाही केलं तर सरळ साहेबांच्या समोर उभी राहिली .. आणि तावा तावाणे बोलू लागली : हे काय साहेब .आपली इतकी मोठी कंपनी आणि मुलांसाठी काहीच व्यवस्था नाही ?अंगणवाडी , सांभाळायला बाई माणस.. त्यांची खायची व्यवस्था ..लेबर लॉ प्रमाणे आपल्याला त्यांचा विमा , त्यांच्या मुलांची व्यवस्था करायलाच हवी आहे ..जर त्या बाळाला काही झालं तर त्याला कँपनी जबाबदार राहील ..केस होऊ शकते आपल्यावर..

आधीच टेन्शन मध्ये असणारा उत्तम खूप चिडला : ओ मिस तुम्ही काय समजता स्वतःला ?आम्ही काय लहान मूल आहोत का ?हे सगळं आम्हाला पण माहीत आहे की केस होऊ शकते ..अंगणवाडी चालू करण्याची आमची तयारी चालू होतीच ..पण त्यापूर्वीच ही घटना घडली आहे ..आणि कामगारांचा विमा आहे आमच्याकडे ..तात्या आत्ता हॉस्पिटलमध्येच गेले आहेत पैसे घेऊन ..आम्ही आमच्या स्टाफ ची काळजी घेत असतो .पण त्या मुलीच्या डोक्याला मार लागला आहे ..कॉम्प्लिकेशन्स आहेत आम्ही त्यामुळे आधीच टेन्शन मध्ये आहोत ..आणि तुम्ही काय मधेच झाशीची राणी बनून आलात इथे ..आजून तुम्ही आमच्या एम्प्लॉयी नाही आहात ..please जा तुम्ही बाहेर बसा..सगळं आटोपलं की बोलावतो तुम्हाला..

उर्वशी : सॉरी ..पण मला नाही राहवलं त्यामुळे अशी आले मी आत ..आणि ती पाठमोरी वळाली इतक्यात साहेबांनी तिला आवाज दिला 

साहेब : मला सांग यात तू काय करू शकतेस काय?

उर्वशी : म ..मी ..म्हणजे ..काय करू तुम्ही सांगा साहेब ..

साहेब : तू त्या बाळाची काळजी घ्यायला जाशील का हॉस्पिटलमध्ये? तिची आई अडाणी आहे ..डॉक्टरांनी काही सांगितलं तर समजणार नाही तिला ..तू असणार तिथे तर तिला आधार वाटेल 

उर्वशी : मनातच ..किती वेगळा आहे हा माणूस ..कोण इतकं विचार करत का आजकाल ? तोंडावर पैसे फेकून मोकळे होतात ..खरच मला खूप चांगला बॉस भेटला आहे ..काम करायला खरच खूप मजा येईल मला इथे ..उगाच नाही तात्या इतकी वर्षे झाली तरी इथेच काम करतायेत..

साहेब : आग तुला जबरदस्ती नाही ..तू काहीच उत्तर नाही दिलंस मला समजलं ..तुला नाही जमणार ..काही हरकत नाही ..

उर्वशी : साहेब ..तस नाही मी जरा वेगळ्याच विचारात होते ..जाईन मी हॉस्पिटलमध्ये..

साहेब : धन्यवाद मुली ..आता माझी एक काळजी कमी झाली ..हे बघ तिथे जाऊन त्या बाळाच्या डॉक्टर ला भेट .सगळ नीट समजून घे आणि मला पण सांग ..नक्की कशी आहे ती पोरगी..

उर्वशी : हो साहेब ..मी लगेचच निघते ..

इतक्यात उत्तम : थांबा मी पण येतो तुमच्या सोबत ..काही पैसे वैगरे लागले तर ..आणि ते दोघे लगबगीने लिफ्ट कडे गेले ..

या टेन्शन मध्ये पण साहेब गालातल्या गालात हसले ..हो रे लबाडा ..इथे पण तुला ती सोबत हवी काय ? काळजी नको करुस ..मी अशी व्यवस्था करणार आहे की ती आयुष्यभर तुझ्याच सोबत राहील ..

क्रमशः


#तूच माझी 

©पूनम पिंगळे

#भाग 4

आता प्रश्न असा की साहेबांना या दोघांना एकत्र का आणायचं होतं बरं? ज्या दिवशी साहेबानी प्रथमच उर्वशीला पाहिलं त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण झाली.. अंकुश साहेब आधीपासूनच असे श्रीमंत मुळीच नव्हते ..तर एक क्लार्क होते उत्तमच्या आईच्या गौतमीच्या ऑफिस मध्ये.. शिवाय दोघे एकाच कॉलेज मधून पास झालेले..गौतमीला अंकुश कॉलेजमध्ये असल्यापासूनच खूप आवडायचे पण ती एक मुलगी बोलणार कशी ? पण अकुशला आपल्या ऑफिस मध्ये पाहून ती खूप खुश झाली ..आता आपण याला रोज पाहू शकतो .काही कामानिमित्त बोलू शकतो या आनंदात ती होती ..पण तो तिचा गैरसमज होता ..अंकुश ला त्याच्या परिस्थिती ची जाणीव होती .त्याच एकच लक्ष्य होत , आयुष्यात काहीतरी करून दाखवायच ..खूप मोठं बनायचं...अस काही नाही की मुलींसाठी असणारा सॉफ्ट कॉर्नर त्याच्यात नव्हता ..तो तर होताच हो ...पण त्याच्या आयुष्यात प्रथम स्थानावर फक्त आणि फक्त करीयर होत..खूपच वाईट दिवस पाहिले होते त्याने ..

गौतमी रोज ऑफिस मध्ये यायची..सगळ्या स्टाफ सोबत बोलायची ...हळूच चोरट्या नजरेने अंकुशला बघायची. पण त्याच तिच्याकडे लक्षच नसायचं..असा जवळ जवळ महिना निघून गेला ..गौतमीला तर जळी, स्थळी  सगळीकडे फक्त अंकुशच दिसत होता ..आणि आमचे विश्वामित्र काही तिच्याकडे बघत नव्हते..

गौतमीला वाटू लागलं माझ्यात काही कमी आहे काय ?हा का माझ्याकडे बघत नाही? याला माझ्या नजरेतील प्रेम समजत नाही का? काय करू ? मी कसा त्याला माझं प्रेम व्यक्त करू ? आणि तसा मोका तिला मिळाला ....अस शाहरुख बाबांनी सांगितलं आहेच ना..,"किसीं चीज को अगर आप दिलसे चाहो ..तो पुरी कायनात असे आपको मिलाने में लग जाती हैं!" बास हेच झालं असावं .

संध्याकाळी सगळा स्टाफ घरी गेला होता.. गौतमीचे वडील आबासाहेब पण एका मीटिंगसाठी लवकरच गेले होते .गौतमी एका प्रोजेक्टवर काम करत होती ..आणि अंकुशपण असाच एका कामात अडकून पडला होता ..दोघांच्यापन लक्षातच आलं नाही की सगळे गेलेत आणि आपण दोघेच आहोत ऑफिसमध्ये.. एक ऑफिसबॉय थांबला होता त्याने गौतमीजवळ जाऊन विचारलं," मॅडम तुम्हाला आज उशीर होणार आहे का? नाही म्हणजे सगळेजण गेलेत..

गौतमी : अरे बबन तुला पण जायचंय का? जा तू

बबन : पण ते ऑफिस बंद करायला लागेल ना

गौतमी : अरे मे करेन चाव्या मला देऊन जा फक्त.  बंद करून चाव्या देऊन जाईन मी वॉचमनला..

बबन : पण ताई ते लाखेच सील पण ?

गौतमी : अरे मला काय जमणार नाही काय तुमचं ते लाखेच सील करायला ? काय तू पण ना ? बर ते सगळं इथे आणून ठेव मी करते बाबा सगळं ..आणि आता मी माझं काम करू का?

बबन : अहो मॅडम ते अंकुश सर पण आहेत आजून ऑफिसमध्ये

गौतमी : तिला समजतच नव्हतं काय रिऍक्ट करावं ..ती जवळपास ओरडतच , "काय? ते काय करतायेत इतक्या उशीर ऑफिसमध्ये?

बबन : आता ते मी कस सांगणार के करतायेत? कामच करत असतील

गौतमी : हा ठीक आहे ..ठीक आहे ..जा तू ..

बबन : नक्की जाऊ ना ? नाही म्हणजे ते..

गौतमी : बबन का माझा वेळ घेतोयएस जा ना बाबा तू 

बबन : बर मॅडम

आणि तो गेला ..आता मात्र गौतमीच लक्ष काही कामात लागेना.. आत्ता जर मी अंकुशला प्रपोज केलं आणि तो नाही बोलला ..तरी आम्हाला बघणार इथे कोणीच नसणार ..काय हरकत आहे ? अ ..हम्म ..करतेच मी प्रपोज त्याला ..पण मी एक मुलगी आहे ..मी करू प्रपोज त्याला ?? नाही नाही ..ती कितीतरी वेळ स्वतःशीच भांडत बसली होती ..तिची उलघाल काही संपत नव्हती 

इतक्यात दरवाजावर टकटक आवाजाने तिची लागलेली तंद्री भंग झाली ..दरवाजात अंकुश उभा होता ..त्याला बघून AC मध्ये पण तिला  दरदरून घाम फुटला ...

क्रमशः


#तूच माझी

©पूनम पिंगळे

भाग ५

गौतमीला अस वाटलंच नव्हतं की तो असा अचानक तिच्या समोर येऊन उभा राहील..गौतमीला अस घाबरलेली आणि घामात भिजलेली पाहून अंकुशला वाटलं तिला बर वाटत नाहीये

अंकुश : काय झालं मॅडम ?तुमची तब्येत ठीक नाही का ? हे बोलत बोलत तो तिच्या टेबल जवळ जाऊ लागला

गौतमी: एकदम घाबरून, एक हाताने तिथेच थांब असा इशारा करत , नाही काही नाही  ..म..मी ..ठीक आहे ..तुमचं झालं असेल तर जा तुम्ही..

अंकुश : नाही मला आजून वेळ लागेल मी तेच तुम्हाला सांगायला आलो होतो ..तुम्ही जावा मी लॉक आणि ते सिल करून जाईन.. खुप उशीर झाला आहे आता ९वाजून गेलेत..

गौतमी : नाही ..मला वेळ लागले ..तुम्ही न सांगता गेलात तरी चालेल..मी माझं काम झाल्यावर जाईन..

अंकुशला काही कळतच नव्हतं ..तो मनात विचार करून हसत होत ..आयला काय पोरगी आहे ही..AC मध्ये बसून हिला घामाच्या धारा लागल्यात..आमच्या सारख्यांच्या घरी आली कधी तर काय करेल कोण जाणे? आणि ही आज इतकी घाबरून काय बोलते.. मला पाहून घाबरली?? अरे तिला मी काय असा तसा वाटलो की काय? म्हणून तर मला परत येऊ नका इथे अस बोलली.. छे हिला मी असा वाटतो ?..आहे दिसायला सुंदर ही ..खरतर मला खूप आवडते ..पण ती कुठे ..मी कुठे ..अस उंदीर कधी आकाशात उडायच स्वप्न पाहू शकतो का? मी आपला जमिनीवर जाऊन रोजच्या गरजा भागविण्यासाठी धावपळ करणारा ..आणि ही आकाशात मस्त होऊन उडणारी परी ..एक राजकन्या.. साहेबांचा तर खूपच जीव आहे हिच्यावर..आणि तिला मी कसला आवडतोय..चला अंकुश साहेब ..जो नही तेरे नसिब में ,उसके पिछे मत भाग.. वो एक तारा हें असमानका ..उसके ख्वाब मत देख .. आणि स्वतःवरच खुश होत ..वाह वाह शायर अंकुश ..काय जमलीये शायरी ..चला आता लागा आपल्या कामाला ..पण मला वाटतय इतक्या रात्री ही बया इथे थांबली आहे .. तिच्या सेफ्टी च काही आहे की नाही हिला ? ते काही नाही ती गेल्यावरच मी जाईन घरी ..असपन मला काय करायचं असत घरी जाऊन ?आणि तो आपल्या कामाला लागला

इकडे गौतमी स्वतःलाच शिव्या घालत होती : काय बावळटपणा केलाय मी? काय वाटलं असेल त्याला? उगाच रुबाब दाखवल्यासारखं वाटलं असणार  ..इतके दिवस या मोक्याची मी वाट पहात होते..तो माझ्याशी बोलावा म्हणून धडपड करत होते ..आणि आज तो समोर आला तर मी त्याचा खरतर अपमान केला ..ओहहह गॉड !!! प्लिज प्लिज हेल्प मी ...मी आता काय करू ? मला काहीच समजत नाहीये...ती थोडावेळ असाच विचार करत कॉम्प्युटरकडे बघत बसली होती ...आणि तिच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली ..ती धावतच ऑफिसच्या किचनकडे गेली ..कॉफी फिल्टर मशीन बँद केलेली होती ती तिने चालू केली ... दोन मग घेतले आणि त्यामध्ये मस्त वाफळणारी स्ट्रॉंग कॉफी बनवली ..एका डिश मध्ये तिचे फेवरेट गुड डे ..आणि डार्क फॅन्टसी बिस्कीट घेतले ..आणि मॅडम जरा लाजत ..घाबरतच अंकुशच्या मागे अवतरल्या...

अंकूश त्याच्या कामात मग्न होता ...आणि या बाईने एकदम मागून आवाज दिला..अंकुश!!..त्याच्या हातातला माऊसच सटकला आणि खुर्चीवरून तो पडता पडता वाचला ..गौतमी जोरजोरात हसायला लागली.., " अरे घाबरलास की काय ?"

अंकुश : कावराबावरा होत ..तस नाही हो मॅडम ..म्हणजे अस काही अपेक्षित नव्हतं ना तुम्ही येऊन आवाज द्याल वैगरे ..आणि ते पण अस हातात कॉफी वैगरे घेऊन..मी जरा कामात गुंतलो होतो ..आणि तुम्ही अचानक मागून आवाज दिला ..मला वाटलं..मला वाटलं की ..आणि तो गप्प बसला 

गौतम: तुला वाटलं कोणी हडळ आली की काय ..होना आणि ती जोर जोरात हसू लागली ..

अंकुशपण हसायला लागला 

गौतमी : बर आता कॉफी घेऊया ? नाहीतर ती गार होऊन जाईल.. आणि मग तिला प्यायची मजा पण निघून जाईल.. कस आहे ना ..काही गोष्टी वेळेवरच करायला हव्या ..नाहीतर त्यातला आनंद निघून जातो ..

अंकुश : असा एकदम गोंधळून तिच्याकडे बघत होता ...मनातल्या मनात ,"अरे देवा ! कॉफ़ी साठी पण योग्य वेळ असते . मला तर नव्हतं माहीत ..आणि ही कॉफीचा इतका विचार करते ? आजच समजलं मला तर ", आता गौतमीला : अहो मॅडम तुम्ही कशाला उगाच त्रास घेतलात मी घेतली असती कॉफी ..नंतर..

गौतमी : आता आणली आहे घे मुकाट्याने . मी घरी कधी कोणाला पाणी पण देत नाही ..आणि तुला तर कॉफी आणि बिस्कीट देतीये ..उगाच भाव नको खाऊस ..कॉफी आणि बिस्कीट खा!!.. ती एकदम गुलाबी गुलाबी झाली होती ..लाजत होती . हसत होती ..अंकुशची तर विकेटच उडाली होती..

अंकुश : (मनातच)या बाईचा विचार तरी काय आहे . लगता है आज इसकी नियत ठीक नाही ..अंकुश ..भागो भागो ..बचाव ..गौतमीला - म्हणजे?? मग मला का आणली तुम्ही कॉफी आणि बिस्कीट?

गौतमी : तू खरच इतका मूर्ख आहेस? की नाटकं करतोएस? तुला माझ्या बोलण्यातला अर्थ ..माझी नजर ..काहीच समजत नाहीये का?

अंकुश : मनातच . अहो मला तर आता खतऱ्याची घंटी ऐकू येतीये ..काय भरोसा तुमच्या सारख्या श्रीमंत मुलींचा ...आमच्या सारख्या गरीब मुलांचा फायदा घेणार वाटत तुम्ही ..गौतमीकडे पाहत : घाबरतच.. मॅडम मी कॉफी नाही घेत ..म ..मी..जातो आता..

गौतमी : ए बावळट ..घाबरतोस काय? ऐक आपण दोघे एकाच वर्गात होतो हे तरी आठवत का तुला ?

अंकुश : हो ..

गौतमी : तू मला तेव्हापासून खूप आवडतोस!

अंकुश : एकदम धक्का बसून जोरात , काय? (मेलो आता ही काय सोडत नाही मला ) 

गौतमी : हो ..मी नेहमी तुला बघायचे ..तुझ्याशी बोलण्यासाठी धडपडायचे.. याला काय म्हणतात ?

अंकुश : मनातच "लस्ट म्हणतात ग बाई याला आजून काय?"

गौतमी : याला प्रेम म्हणतात. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.. मला तू खूप खूप आवडतोस

अंकुश: ( मनात) आग बाई मी खेळणं नाहीये ..आवडलं खेळणं की खेळा.. मन भरलं की सोडा ..तुम्हा श्रीमंत पोरींचा काय भरवसा..

गौतमी : अरे बोल ना काहितरी ...मी मुलगी असून बोलतीये आणि तू ..??

अंकुश : तुम्ही सांगा काय बोलू? मी बोलतो..

गौतमी : व्हॉट???तू काय बोलतोय ? तुला समजतंय का मी काय बोलतीये? ..आणि ते मॅडम ,तुम्ही , पहीलं बंद . आपण दोघे असताना गौतमी बोलायचस.. अरे हो ..तुला आत्ता समजलं की मला तू आवडतोस ..पण मी तुला आवडत नाही वाटत ?म्हणून तू असा करत आहेस ..सॉरी.. पण एक सांगते माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस ...आणि ती जागा आता इतर कोणालाही मिळवू शकणार नाही.. तिचे डोळे पाण्याने भरले होते ..ती पळत आणि रडतच तिच्या केबिनमध्ये निघून गेली..

अंकुश : त्याने स्वतःला चिमटा काढला ..आयला हे काही स्वप्न तर नाही ना ? मी हिला काय समजत होतो ? आरे यार ही तर मनापासून प्रेम करते माझ्यावर.. मी असा फाटका माणूस काय सुख देणार हिला ? पण ती दुखावलीये माझ्यामुळे.. तो पण तिच्या मागोमाग केबिनमध्ये गेला ..त्याने तिला आवाज दिला ..आणि तिने रडतच येऊन अंकुशला मिठी मारली ..प्लिज अंकुश मी तुझ्याशिवाय नाहिरे जगू शकत..ती खूप रडत होती ...अंकुशला काहीच सुचत नव्हतं ..पण आता त्याने पण तिला मिठीत घेतलं ..तिचे डोळे पुसले ..

अंकुश : ए वेडे . अशी रडतेस काय ? अग मला पण तू खूप आवडतेस ..पण मी असा फाटका माणूस ग . माझा ना कोणी आगा ना पिछा.. खूप गरिबीतून शिक्षण केलंय ग मी ..दोन महिन्यापूर्वी वडील सोडून गेले मला ..देवाचं बोलवण आलं त्यांना . गेल्याच आठवड्यात आईपण गेली ..मी एक दिवस नव्हतो बघ ऑफिसला ते या साठीच.. बाबा गेल्या गेल्या ही नोकरी मिळाली..बर झालं ..मला माझ अंथरून माहीत आहे ग आणि मी तेवढेच पाय पसरतो.. मी कस बोलणार तुला ? तू मला आवडतेस? शिवाय तुझ्या घरचे कधीच तयार होणार नाहीत.. तू अशी लाडात , सुखात वाढलेली ..मी काय सुख देणार तुला ? हे सगळं पिक्चर मध्ये सोपं असत ग ..पण खरं आयुष्य मी स्वतः जगलोय . आणि ते तस कधी होत नसत..

गौतमी ने आता अजूनच जास्त घटट मिठी मारली अंकुशला ...:अरे मला तू असाच आवडतोस ..तू सगळ्यांसारखा  नाहीस ..आणि माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहेस ...आणि तिने अचानकच आधी त्याच्या गालावर ..आणि मग ओठांवर तिचे ओठ टेकवले ...दोघे बराचवेळ तसेच होते ..

अंकुश : एकदम भानावर येत . गौतमी हे योग्य नाही ..चल निघुया आपण आता ..गौतमीला पण आता लाज वाटू लागली ..

गौतमी : हो चल निघुया आपण ..

दोघे सर्व बंद करून निघाले ..गौतमी सतत त्यालाच बघत होती ..

खाली आल्यावर गौतमी : चल मी सोडते तुला बस माझ्या गाडीत 

अंकुश : नको तू जा ..मी जातो बसने 

गौतमी : अंकुश !! तुला शपथ आहे माझी ये बस लवकर 

अंकुश गाडीत बसला ..पुन्हा एकदा गौतमाने त्याला मिठी मारून एक हलकासा किस केला ..अंकुश तू मला कधीही अंतर देऊ नकोस.. नाहीतर मरून जाईन मी..

अंकुशची अवस्था खूपच वाईट होती ..त्याला ती हवी पण होती ..पण मन ..ऐकत नव्हतं

क्रमशः


#तूच माझी 

© पूनम पिंगळे

भाग ६

अंकुशला त्याच्या घराजवळ सोडून गौतमी घरी गेली ..गौतमीला गाडी चालवताना पण फक्त आणि फक्त अंकुसचाच विचार येत होता.. त्याचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता ..त्याच्या विचारात ती इतकी मग्न होती की मागून कितीतरी वेळ हॉर्न देणाऱ्या ट्रक कडे पण तीच लक्ष नव्हतं ..आणि त्या ट्रकची धडक हिच्या गाडीला बसलीच ..रात्रीचे 12.30 झालेले होते या वेळेला हे ट्रक ड्राइवर असेच पिऊन कशीपण गाडी चालवत असतात ..पण नशिबाने साथ दिली होती ..धडक काही खूप जोरात बसली नव्हती ..पण गौतमी च डोकं स्टेअरिंग वर आपटलं होत आणि गाडीचा हॉर्न सतत चालू होता ..ती जरी बेशुद्ध होती तरी हॉर्न त्याच काम करत होता ...,ट्रक ड्रायव्हर ने खाली उतरून पहायचीपण तसदी घेतली नव्हती ...तो जास्तच भरधाव वेगाने निघून गेला होता ...रस्त्याच्या कडेला एक छोटंसं घर होत ...त्या गाडीच्या हॉर्न ने त्याला जाग आली ..तो गाडीजवळ आला ..दरवाजा उघडला ..गौतमीला उचलून घरी घेऊन गेला ...

आता याला प्रेम नाहीतर काय म्हणावं? मोबाइलवर 10 मिस कॉल होते गौतमीच्या ...जेव्हा संपत म्हणजे त्या बाजूच्या घरातल्या माणसाने ..गौतमीला घरी नेले त्याला काहीच कळत नव्हतं आता हिच्या घरच्यांना कस कळवाव?..कोण आहे ही ? इतक्यात त्याच लक्ष तिच्या पँटच्या खिशातून येणाऱ्या प्रकाशाकडे गेलं ..हम्म तो फोन होता गौतमीचा ...सायलेंट मोड वर असल्याने आवाज येत नव्हता .. संपतं ने तो फोन खिशातून काढेपर्यंत फोन बंद झाला होता..त्याने त्याच नंबर ला कॉल केला ...फोन होता अंकुशचा...

गौतमी अंकुशला सोडून गेली तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता..त्याला पुन्हा पुन्हा तिची आठवण येत होती..शिवाय इतक्या रात्री ती सुखरूप गेली असेल ना ? तिला आई नाही शिवाय वडील पण दुसऱ्या गावाला मीटिंग साठी गेलेत..या काळजीने त्याने 10 कॉल केले होते..संपतने कॉल केला आणि अंकुशने एक रिंग मधेच उचलला 

अंकुश : समोरचा आवाज पण न ऐकताच : अग तू  पोहोचलीस कस घरी ? मला किती काळजी लागली होती तुझी आता 1 वाजत आलाय आणि तू आत्ता कॉल करतीएस..मे किती कॉल केलेत तुला तू पाहिले नाहीस का?

इकडे संपत आपला साहेब ऐका ना ..ओ साहेब अहो ऐका तर ..अहो मॅडम चा ..अहो ..साहेब .. ऐका तर पण अंकुश काही ऐकेना त्याच आपल चालूच ..मग काय संपत ने फोनच कट केला ..आणि पुन्हा लावला आणि केल्या केल्या ..साहेब माझं ऐका 

अंकुश : दचकून अरे तू कोण ? गौतमीचा फोन तुझ्याकडे कसा ? गौतमी कुठे आहे? तिला दे फोन...तू काय अपहरण केलंस काय तीच? तिला काही केलंस ना साल्या सोडणार नाही तुला ..

संपत : ओ भाऊ ..अहो ऐका तर ..आता अंकुश ऐकू लागला 

संपत : अहो त्यांचा अपघात झालाय जास्त लागलं नाही ..बेशुद्ध आहेत त्या ..मी तिथेच बाजूला राहतो त्यांना गाडीतून काढून घरी आणलं आणि मोबाईलवर तुमचा कॉल आला म्हणून तुम्हाला कॉल केला ...माझा ऍड्रेस घ्या  आणि इथे येऊन तुमचं हे पार्सल घेऊन जा ...च्यायला भालाईचा जमानाच नाही राहिलाय. 

अंकुश : माफ करा हो मला ..तुम्ही राग नका मानू ..सांगा ऍड्रेस तुमचा येऊनच बोलू तिथे ..त्याने ऍड्रेस घेतला ..पाकिटात पाहिलं तर फक्त 500 ची एक नोट होती ..परिस्थिती नसताना पण आता रिक्षा शिवाय पर्याय नव्हता ...त्याने रिक्षा केली ..रिक्षावाल्याला थांबायला सांगून संपतकडे गेला ..गेल्या गेल्या त्याने संपतला मिठीच मारली ..त्याच्या पाया पडला ..भाऊ तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही ..जेव्हा मोका मिळेल नक्कीच त्याची फेड करेन मी  ..त्याचा नंबर घेतला आणि तिथून तो निघाला ...त्याने गौतमीला उचलून रिक्षात ठेवलं आणि हॉस्पिटलमध्ये गेला ..

डॉक्टर : काही जास्त नाही लागलंय ..पण घाबरून बेशुद्ध झाल्यात त्या ..त्यांनी इंजेक्शन आणि औषधे लिहून दिली ...हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ मेंबर मध्ये होते ..त्यामुळे नशिबाने फीस नाही द्यावी लागली ...शिवाय त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या गाडीमध्ये दोघांना सोडायला आला ..नशीब अस मनाशीच बोलत अंकुश हसला ..आणि देवाला बोलला : तुलाच काळजी रे बाबा ..काय केलं असत मी ...कस नेलं असत हिला घरी ..तूच बुद्धी दिलीस या हॉस्पिटलमध्ये आणायची .. 

डॉक्टरांनी लगेचच गौतमीच्या वडिलांना पण फोन करून सांगितलं होतं ..एका गॅरेजला कॉल करून तिची गाडी पण रिपेअर साठी पाठवली होती ..बिचारा अंकुश स्वतःला खूपच लाचार समजत होता ..ना पैसे , ना ओळख काय केलं असत मी आज?

ही बातमी मिळताच आबासाहेब लगेचच तिथून निघाले ..पण आता रात्री हिच्याजवळ कोणीच नाही ..हिची काळजी कोण घेणार? नोकर चाकर होते पण ..नाही मी थांबतोच साहेब आले की जातो ..असा विचार करून अंकुश तिच्याच रम मध्ये एका सोफ्यावर बसून राहिला ..मधेच त्याला डुलकी लागून गेली ...आणि गौतमीला शुद्ध आली ..तिचं डोकं आणि अंग खुओ दुखत होत. आणि तिला तो अपघात आठवला तिने दचकून बाजूला बघितलं ती तिच्या बेडवर आणि समोर सोफ्यावर अंकुश होता ..

गौतमीने उठायचा प्रयत्न केला पण तिला पटकन उठता येत नव्हतं ..हाताला आणि पाठीला मुक्का मार लागला होता ..डोकं तर भयंकर ठणकत होत ..आता तिला भूकपण लागली होती ..रात्री ती कॉफीपन तशीच राहिली होती ना..मग कसा बसा पलंगाचा आधार घेत ती उठली..अंकुशच्या बाजूला जाऊन बसली ..त्याच्या छातीवर स्वतःच डोकं ठेवलं ..आणि त्याला एकटक पाहू लागली ..

अंकुश दचकून जागा झाला ..दोन मिनिटं त्याला काही समजलच नाही ..आणि त्याला रात्रीचा प्रसंग आठवला ...

क्रमशः


#तूच माझी

©पूनम पिंगळे

भाग ७

अंकुशच गौतमीकडे लक्ष गेलं..जी त्याच्याकडे एकटक बघत होती ..इतकं लागलेलं असूनपण तिच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलच प्रेम दिसत होतं...दुःखाचा लवलेशही नव्हता

अंकुश स्वतःला सावरत  ...एकदम दचकून :  अग ! तू अशी का उठलीस ? सरळ बस ग ..भरपूर लागलंय तुला ..किती मुक्का मार आहे ..वेडी आहेस का तू ? ..उठ बर आधी ..आणि त्याने आधार देत तिला पुन्हा बेडवर नेऊन  झोपवलं ...

गौतमी : डोक्याला हात मारत : देवा कसला हा माझा प्रियकर ? मला लागलंय ..दुखतंय ...समजतंय याला ..पण रात्रीपासून काही खाल्लं नाहीये आणि त्यावर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलेत ..आता माझ्या पोटात कशी भूक उचंबळून आली असेल ...आणि हो त्याने तरी कुठे काही खाल्लय..मी निदान जखमा आणि इंजेक्शन ..औषध तरी खाल्लेत..आणि ती तिरक्या नजरेने अंकुशची प्रतिक्रिया पाहू लागली ...

अंकुश : एकदम टेन्शन मध्ये : अग खरच ग हे माझ्या लक्षातच नाही आलं..त्याने स्वतःचे दोन्ही कान पकडले ..आणि स्वतःच्या गुढग्यांवर खाली मान घालून बसला ..बोला मॅडम काय खाणार तुम्ही ?

गौतमी : हसतच : बोला काय देणार तुम्ही? या भुकेल्या जीवाला तुम्ही जे द्याल ते आनंदाने खाऊ ..

अंकुशला आता प्रश्न पडला यावेळी आता हिला काय खायला द्यावं ..बर खिशात जास्त पैसे पण नाहीत आता..??

त्याच्या चेहऱ्यावरची चिंता गौतमीच्या लक्षात आली : अरे काय विचार करतोयएस? जा त्या उमाला उठव ..ती बनवेल काहीतरी खायला .

अंकुश : एकदम विचारात ..आता हिची उमा कोण? असते कुठे ही माँ ? 

गौतमी : ए.. तुझा चेहरा तू काहीही न बोलता मला सगळं सांगतोय ..हे बघ या खोलीतून बाहेर गेलास की डाव्याबाजूला सरळ जा ..तिथेच उमा आणि बिरजू राहतात ...आवाज दे तिला ..

अंकुश : अग पण आत्ता रात्रीचे 3 वाजलेत ..इतक्या रात्री मी उठवू त्यांना ?

गौतमी : अरे ..कसा रे तू? मी आजारी आहे ना तर ते जागेच असणार बघ ...,खूप जीव आहे त्यांचा माझ्यावर ..उमा आणि मी एकाच वयाच्या ..एकत्रच मोठ्या झालो ...तिची आई होती आमच्याकडे कामाला ..त्यांनीच मला आईची माया दिली बघ, २वर्षापूर्वी गेल्या त्या देवाघरी ..तो देव आहे ना ..तो पृथ्वीवर चांगल्या लोकांना जास्त राहूच देत नाही बघ..माझ्या आईला पण असच घेऊन गेला तो ..आणि आजून एक मज्जा सांगू का तुला ? ...देवाचं आणि माझं जास्त जमत नाही बघ ..त्याच काय आहे ना ..मला काही आवडल की तो लगेचच हिरावून घेतो माझ्यापासून.. तू नाही ना जाणार मला सोडून ..मग दोन मिनिटं ती शांत झाली ...

अंकुश तिच्या जवळ गेला ..तिचा हात हातात घेऊन : तूच जाशील मला कंटाळून मला सोडून ..खूप वेडा आणि वेगळा आहे मी ..आपलं कस होणार तो देवच जाणे ..मी तर हा हात सोडणार नाही ..हो पण तुझंच काही सांगता येत नाही बघ 

गौतमी : हसत: बर बाबा नंतर नको सोडुस हात माझा पण आत्ता सोड ...आणि ना ..जा तू फक्त उमा असा आवाज दे ..धावत येईल बघ बाहेर ती ..

अंकुश : हो ..हा गेलो आणि आलोच बघ..तो बाहेर गेला ..दरवाजा उघडाच होता ..खरच ते नवरा बायको जागे होते..तो त्यांना आवाज देणार इतक्यात त्याच्या कानावर हे शब्द पडले

उमा : बाई ग हा कोण माणूस म्हणायचा हो ..ताईसोबत आला तो ..भला माणूस दिसतोय ..पण ताई बेशुद्ध आहेत आणि हा त्यांच्या खोलीत काही कमीजास्त नाही ना हो करायचा 

बिरजू : नाही ग अस काही होणार नाही ..मी मागाशीपासून 3-4 वेळा जाऊन आलो ..ताई बेडवर आणि हे बिचारं सोफ्यावर बसल्या बसल्या झोपलय बघ ..आणि काही करायचं असत वेड वाकड तर त्यांनी ताईंना इथं आणलंच नसत ना..

उमा : हो ते पण खरं ..पण ताईंनी रात्री काय खाल्ल्याय की नाही काय माहीत ? शुद्धीवर आल्याना की मग पाहिला गरम गरम बदामाचा शिराच खायला घालते त्यांना ...खूप आवडतो त्यांना ..

अंकुशने दरवाजा नॉक केला आणि आत गेला : वाह ! गौतमी बरोबर बोलली तुमच्याबद्दल ..चला वेळ झालीये तो शिरा करायची ..

उमा : एकदम धडपडत स्वतःला सावरत उठली : आग बाई तुम्ही ? अशे अचानक ? ताई आल्या काय शुद्धीवर ? 

अंकुश : हो आणि तुमच्या ताईला भूक पण लागलीये कडकडून ..

उमा : अग बाई खर की काय ?? मला वाटलंच होत ..आलेच मी शिरा आणि गरम गरम बटाटा भजी घेऊन ..आमच्या ताईला खूप आवडतात ..आणि त्याच्या सोबत गरम गरम कॉफी..ती उठून लगबगीने किचनमध्ये निघून गेली ..आणि अंकुश गौतमीच्या रूम मध्ये आला  .

अंकुश : कमालच आहे ग गौतमी ..आग ते दोघे खरच जागे होते आजून . आणि तुला भूक लागली असेल हे पण त्यांना समजलं ..ग्रेट ग ..

गौतमी : मग आमची उमा आहेच अशी ..

अंकुश : हम्म ..तुझी काळजी वाटत होती खूप म्हणून थांबलो होतो ..तुझी काळजी माझ्यापेक्षा जास्त चांगली घेणारी तुझी  माणस आहेत इथे ..आता मला काळजी नाही ..चल मी निघतो ..

गौतमी : नाही तू नाही जायच ..तू पण काही खाल्लेलं नाहीयेस ..थांब खा आधी आणि मग जा ..आणि इतक्या रात्री तुला घरी जायला बस नाही मिळणार ..आणि विसरू नकोस तुला इथून चालत जायला जमणार नाहीये  ...बस ना असा माझ्याजवळ ..का जातोस मला सोडून ..

अंकुश : माझ्या मुळेच झाला ना तुझा अपघात ? ..नक्कीच माझा विचार करत असणार तू ..अग गौतमी ..आपल्यामध्ये खूप तफावत आहे..कस जमणार हे सगळं ? मला वाटतय मी तुझ्यासाठी योग्य नाही.. बघ ना आजच आपण जवळ आलो आणि तुझा अपघात झाला ..हा कदाचित ईश्वरी संकेत असावा ..

गौतमी : हो आज प्रथमच त्याने मला छान संकेत दिलाय..

अंकुश : आता काय छान झालंय बाई..!!

गौतमी : अरे त्या अपघाता मुळेच तर तू आणि मी माझ्या घरी ..असे एकत्र आहोत ..आपल्याला एकमेकांची कितीवेळ सोबत मिळाली आहे ..असा तू आला तरी असतास का माझ्या इतक्या जवळ..तिने उठून स्वतःचे हात अंकुशच्या गळ्यात घातले ...बघ हा असा ..आणि इतक्या जवळ हवा आहेस तू मला माझ्या.. तिने त्याला घटट मिठी मारली ..आता अंकुशने पण तिला मिठीत घेतले ..किती वेळ झाला कोणास ठाऊक ..आणि दरवाजावर टक टक आवाज आला त्याने दोघे भानावर आले ...

दरवाजावर उमा उभी होती ...आणि दातात स्वतःचा पदर घेत उगाचच लाजत होती ..

गौतमी : आग ये ना उमा ..,काय बनवलस तू? तिचं ट्रे कडे लक्ष गेलं तर त्यात एकच प्लेट होती ..,अग हे काय एकच प्लेट आणलीस ?? जा आजून एक घेऊन ये ..,हे साहेब पण जेवलेले नाहीयेत ..

उमा : हो .. आणते लगेच ..अस म्हणत तो ट्रे तिथे एका टेबलावर ठेऊन लाजतच पळत गेली ..आणि 5 मिनिटात दुसरी प्लेट घेऊन आली ..आता अंकुश गौतमीला आणि गौतमी अंकुशला भरवत होते ..

उमा : आता ग बाई ..हे काय ओ ताई ..उगाच मला दुसरी प्लेट आणायला लावली ..आणि गौतमी चक्क लाजली 

गौतमी : गप ग ..दे ती डिश इथे आणि जा बर तू ..कॉफी घेऊन ये आम्हाला दोघांना ..

उमा : हो आणते ..तुमचं चालुदेत दमान ..

गौतमी : उमा sss जातेस का आता ? ...

उमा पुन्हा पळून गेली ..आता दोघांनी पुन्हा एकमेकांना भरवायला सुरवात केली ..आणि परत दरवाजावर टकटक झाली ...

गौतमी : हो ये ग उमा किती वेळा दरवाजा वाजवणारे तू? 

आणि दरवाजातून आबासाहेब घसा खाकरत आत आले ...आता दोघांची भीतीने घाबरगुंडी उडाली होती..

क्रमशः



#तूच माझी

©पूनम पिंगळे

भाग 8

आबासाहेब खूप रागात आत आले ..समोरच दृश्य पाहून त्यांच्या रागाला पारावार राहिला नाही ..ते हे पण विसरले की गौतमीचा रात्री अपघात झाला आहे वैगरे...

आबासाहेब : रागात :  काय लाज लज्जा सगळं वेशीवर टांगलय की काय ? अरे काय करताय तुम्ही दोघे हे?

गौतमी : आबा अहो ऐका तर तुम्ही जस समजताय तस काही नाहीये ..

आबासाहेब : मग कस आहे सांग मला समजून ..लहान बाळ आहे ना मी ..समजत नाही काहीच मला..

मध्येच घाबरत अंकुश : साहेब अहो ऐका तर 

आबासाहेब आजून जास्त जोरात : ए कोण रे तू ? कुठेतरी पाहिलंय नक्की तुला मी..तू भामट्या आमच्या ऑफिस मध्ये आहेस ना रे कामाला? हो आणि ते ही आत्ता इतक्यातच आलाय तू ..इतक्या लवकर माझ्या पोरीला तुझ्या जाळ्यात पण अडकवलस तू??

अंकुश : साहेब आता हे थोडं जास्तच होतंय ..मी अस काहीही केलेलं नाही ..आपण डोळ्यावर कधी कधी जो चश्मा चढवतो त्यानेच सगळ्यांना बघायला सुरुवात करतो ...मी असा नाही आहे..गौतमी निघतो मी ..झालं ते खूप झालं ..जरी गरीब असलो तरी असले आरोप मी सहन नाही करू शकत ..

गौतमी : अरे प्लिज ऐक ना अंकुश ..आबा तुम्ही तरी ऐका ही माझं ..

आबा : तोंड वर करून बोलतेस लाज नाही का वाटत तुला ? 

गौतमी : आबा ...मी काहीही चुकीचं केलेलं नाही ..मी का घाबरू ? खूप वाईट वाटलं आज की तुमचा माझ्यावर विश्वास नाही .

आबा : अग इतकं सगळं समोर बघतोय मी आजून काय विश्वास ठेवू मी ?

गौतमी : आबा ..तुम्हाला जर माझ्यावर थोडाजरी विश्वास असेल ना तर माझं शांतपणे ऐकणार का तुम्ही ?

आबा : बर बोल बाई ..ते पण ऐकून बघतो 

गौतमी : मी आणि अंकुश एकाच कॉलेज मध्ये होतो ..मला तो खूप आवडतो ..त्याला पाहताच मी त्याच्या प्रेमात पडले..पण त्याची घरची परिस्थिती खूप खराब आहे आणि त्यामुळे त्याने कधीही आशा फालतू गोष्टींमध्ये लक्ष दिलं नाही ..मी खूप प्रयत्न करायचे की त्याने माझ्याकडे पाहावं ..पण नाही आमचं सगळं कॉलेज संपलं आणि हे काही जमलं नाही ..

जेव्हा मी अंकुशला ऑफिसमध्ये पाहिलं ..मला खूप आनंद झाला जे आज पर्यंत मी करू नाही शकले ते मी आता करू शकेल असा मला वाटल.. तो आला त्या दिवसापासून मी त्याच्या आजूबाजूलाच असते ..त्याला खूप हींट दिल्या मी ..पण आबा तो त्यातला नाहीच आहे ..

आज ऑफिसमध्ये मी माझ्या आणि तो त्याच्या कामात होता ..मला आणि त्याला दोघांना पण माहीत नव्हतं की आम्ही दोघे ऑफिस मध्ये आहोत ..बबन नी सांगितलं ऑफिस बंद करताना म्हणून समजल..आज मीच त्याला प्रपोज केलं ..

आबा : आग तू हे तुझ्या बापाला संगतीयेस ..काहीच नाही का वाटत तुला बोलताना?

गौतमी : तिला एकदम रडू आलं ..तिचे डोळे भरून आले होते आणि ते आता घळाघळा वाहू लागले होते..काय करू आई नाहीना ..असती तर तिलाच सांगितल असत ..तिनी तरी समजून घेत असत मला ..

आबा आता थोडे शांत झाले ..विषय बदलत ...तुला कुठे लागलंय ? आणि ..काही नाही तू आराम कर आपण नंतर बोलू 

गौतमी : नाही आबा ..आत्ताच बोला ..मला अंकुश आवडतो आणि मी त्याच्याशिवाय जगूच नाही शकत ..यावर तुमचं काय म्हणणं आहे?

आबा : अग गौतमी ..बाळ हे प्रेम नाही ग ..या वयात या भावना निर्माण होतात ..चुका घडतात ..आणि मग पूर्ण आयुष्य ती चूक निस्तरण्यातच जात बघ..,नीट विचार कर ..असा अविचार नको ...त्या मुलाचं खानदान काय ? कुठे राहतो ? ,काहीच माहीत नाहीये आपल्याला ..


Rate this content
Log in

More marathi story from Poonam Pingale

Similar marathi story from Romance