Priyanka Shinde

Others Children

3.5  

Priyanka Shinde

Others Children

वाढदिवस

वाढदिवस

1 min
219


           वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अनमोल असा क्षण आहे... वाढदिवस हा असा क्षण आहे जो आपल्या स्वतःसाठी तर अनमोल असतोच पण आपल्या शिवाय आपल्या परिवारासाठी व खास करून आपल्या आई - वडिलांसाठी हा क्षण खूप जास्त अनमोल असतो. वाढदिवस म्हणजे आपला जन्म दिवस. आपला जन्म हा फक्त आपल्यासाठीच खास नसतो तर आपला संंपूर्ण परिवार आपले आईवडील सारेच जण आपल्या येण्याने खुप खुश असतात. आपलं घर हे आनंदाने गजबजलेलं असतं.

           

वाढदिवस म्हणजे आनंद, वाढदिवस म्हणजे आपलं कोड - कौतुक, वाढदिवस म्हणजे आपले लाड पुरवून घेण्याचा दिवस... वाढदिवस तसा लहानांपासून मोठ्यांपर्यंंत सगळेच जण आवडीने साजरा करतात पण वाढदिवस साजरा करण्याची खरी मजा तर तेव्हा असते जेव्हा आपले संपूर्ण कुटुंब आणि आपले आईवडील मोठ्या आनंदाने आपलं कोड - कौतुक करतात, आपले खुुप - खुप लाड करतात, आपले सगळे हट्ट अगदी आनंदाने पुरवले जातात. वाढदिवस म्हणजे आशिर्वाद, वाढदिवस म्हणजे शुुुुभेच्छा, वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण...


Rate this content
Log in