Usha Khandagale

Fantasy

3.5  

Usha Khandagale

Fantasy

वेध स्री मनाचा

वेध स्री मनाचा

6 mins
297


कथा - स्रीवादी

कथेचे शिर्षक - घुसमट


राधा शून्यात नजर लावून बसली होती.संपूर्ण भूतकाळ चित्रफिती सारखा तिच्या डोळ्यासमोर उभा रहात होता.गेलेले दिवस ती विसरता विसरत नव्हती.सुधाकर आणि राधा दोघे ही गुण्या गोविंदाने नांदत होते. स्वतः ची शेतीवाडी होती.टुमदार घर होतं.सुधाकर तसा शिकला सवरलेला पण आपली शेती सोडून नोकरी करणं त्याला काही आवडलं नाही.आपल्या आई वडिलांबरोबरच तो शेतात एक छानसं घर बांधून राहू लागला.राधा अतिशय गुणी होती.अल्पावधीतच सासू सासऱ्यांची आवडती सून झाली होती.सर्वांना जीव लावणारी राधा  खूपच लाघवी आणि हुशार होती.ती देखील सुधाकरला कामात हातभार लावायची. चौघांच देखणं कुटुंब अगदी नजर लागावी असच होतं.आता त्यांच्यात एक पाचवा पाहुणा येणार होता.सर्व जण खूप आनंदात होते.सुधाकर तर जोमाने कामाला लागला होता. राधाचे कोडकौतुक सुरू झाले.आजी आजोबांना तर आकाश ठेंगणे झाले होते.

आणि अचानक एक काळा दिवस उजाडला. शेतात पाणी भरण्यासाठी गेलेला सुधाकर उशिरा पर्यंत घरी आला नव्हता.विजेच्या पंपाचा धक्का बसला आणि सुधाकर जागेवरच कोसळला.खूप उशिरा ही बातमी कळाली.राधा तर अबोल झाली.तिच्यावर आभाळ कोसळलं होतं.पायाखालची जमीन सरकली.सुधाकर चे आई वडील तर या धक्क्यातून सावरलेच नाहीत.राधा हसणं ,बोलणं सगळंच विसरुन गेली.दोन कोलमडून पडलेले खंबीर आधार वड आणि एक कुठलाच गंध नसलेला जीव . कसं सावरायचं अन् अश्रूंना कसं आवरायचं तीनं.नजर लागली होती तिच्या भरल्या घराला.कुटुंब उध्वस्त झालं होतं.दिवस भराभर जात होते.पाहुणे आले अन् गेले ही.आता लढायचं होतं तिला एकटीलाच.तसा भाऊ होता पाठीशी .त्याचाच फक्त आधार उरला होता.डोळ्यातील शेवटचे ओघळ पुसले आणि पोटावर हात फिरवला.जणू त्या चिमण्या जीवाला सांगितलं तीनं घाबरु नकोस मी आहे ना.सासू सासऱ्यानी एकच जागा धरली होती. सगळं सगळं त्यांनी सोडून दिलं होतं.राधा साठी ते चार घास ढकलत होते पोटात.तोच तर तिचा आधार होता.

दिवसामागून दिवस गेले.

राधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला.मुलगा झाला होता राधाला. जणू सुधाकर चा नवा जन्मच.आजी आजोबा ही आता थोडेसे सावरू लागले.राधा अन सुधाकर चा मुलगा म्हणून त्याचे नाव सुधांशू ठेवले.सुधांशू साठी आता राधा ही सावरली.स्वतः शेती पाहू लागली.भावाच्या आधाराने तिने पुन्हा उभारी घेतली.किती ही घुसमट झाली तरी ती स्री होती.ममता आणि कर्तव्य तिला सांभाळायचे होते.सुधांशू मोठा होत होता.थोडे आनंदाचे दिवस सुरू होतात न होतात तेच तिचा एक आधार कोसळला.मनाने खचलेले सासरे पक्षाघाताने आजारी पडले अन् थोड्या दिवसात गेले ही.आता अजून एक आघात तीनं सोसला .पुन्हा उभी राहिली.सुधांशुला आता शाळेत घातले होते.गावातल्या शाळेतच जात होता तो.एक एक वर्ग वाढत होता त्याचा .हुशार निघाला तो.शाळेत पहिला यायचा.राधाला आता त्याला खूप शिकवायचं होतं.सुधाकर चं स्वप्न पूर्ण करायचं होतं.सुधांशू देखीलआता राधाला थोडाफार हातभार लावू लागला .शालेय शिक्षण पूर्ण करून आता तो कॉलेज मधे जाऊ लागला.तिथे ही अव्वल च.

बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले.आणि तो आता डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू लागला.पण परिस्थितीची जाणीव त्याला होती.ते स्वप्न त्याने कुणालाही बोलून दाखवले नाही. कारण आपल्या आईची अवस्था तो जवळून पहात होता. फक्त पुढे काय करायचं या मामाच्या प्रश्नावर त्यांनी इच्छा व्यक्त केली होती.परंतु परिस्थिती मुळे ते शक्य नाही.दुसरे काही बघतो म्हणाला.हे राधा ला समजले.भावाशी बोलून तिने जमीन विकू पण त्याला शिकवायच च .शेवटी निर्णय झाला.काही जमीन विक्रीला काढली.सुधांशू चे एमबीबीएस ला एडमिशन झाले.आता राधाला खूप कष्ट करायचे होते.त्याचा इतर खर्च वाढणार होता.जमीन विकली म्हणून सुधाकरला काय वाटेल याचं ही तिला वाईट वाटत होतं .पण तिच्या समोर दुसरा पर्याय नव्हता.सुधांशू आता पुढील शिक्षण घेण्यासाठी बाहेरच रहाणार होता.राधाला पुन्हा एक पोकळी अनुभवायची होती.सासू ला सांभाळत राधा सगळी कामं करत होती.दोघी ना आता घर जणू खायला उठत होतं.

राधाच्या संकटांनी अजून हि माघार घेतली नव्हती.सासूबाई पाय घसरून डोक्यावर पडल्या.खूप मार लागल्यामुळे आतल्या आत रक्तस्राव झाला.चार दोन दिवस दवाखान्यात ठेवले पण उपयोग झाला नाही.त्या ही राधा ला सोडून गेल्या.आता तीनं एकटीनं कसं जगायचं.प्रारब्ध हात धुवून मागे लागलेलं.सुधांशू आजी ला मूठ माती देऊन गेला.आपली आई काय करेल या विचाराने तो अस्वस्थ व्हायचा.पण त्याला शिकून मोठं व्हायचं होतं .आईचे कष्ट संपवायचे होते.तो फक्त अभ्यासावर लक्ष देऊ लागला. इकडे राधा ला कसं जगावं कळेना. पै पाहुणे येऊ जाऊ लागले.पण परिस्थितीशी तोंड देणं भाग होतं.भराभर दिवस जाऊ लागले.सुधाकरचे शिक्षण आता संपले होते.तो डॉक्टर झाला होता.सुधाकर चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राधाने कंबर कसली होती.आणि तिच्या प्रयत्नांना यश आले होते.पण प्रश्नांचा डोंगर अजून ही खुणवत होता.पोरगा डॉक्टर होऊन भागणार नव्हत .दवाखाना कसा सुरू करायचा हा मोठाच प्रश्न उभा राहिला.त्यातून ही मार्ग काढलाच या माऊलीने.सुधाकरने केलेले सगळे दागिने तिने मोडीत काढले.ज्याच्यासाठी घालायचे तोच नसेल तर त्याचा उपयोग काय .एका चांगल्या कार्यासाठी तिने सुधाकर ची माफी मागून दागिने मोडले.हा ही डोंगर तिने पार केला.आणि डॉ.सुधांशू हा बोर्ड लागला.आणि कृतकृत्य झालं या माऊलीला.आपलाच हेवा वाटू लागला तिला.खूप गहिवरून आलं आणि साठवलेले सगळे अश्रू घळाघळा वाहू लागले.सुधाकर ची आज खूप उणीव भासू लागली.आज ती डॉ.ची आई होती.कष्टाळू आणि जिद्दी अशीच दवाखाना चांगला चालू झाला.आता तिला हळूहळू पुढचे वेध लागले.एकीला दोघी असाव्यात.सुधांशू चे दोनाचे चार हात करावेत हा विचार करू लागली.नातेवाईकांमध्ये विषय निघाला.सुधांशू अन् राधा विषयी सर्व माहिती असल्यामुळे अनेक मुली येऊ लागल्या.एक डॉ.मुलगी चालून आली.दूरच्या नात्यातलीच होती.मुलगा मुलगी पहाणे आणि पसंती ही झाली.सोनाली तिचे नाव.सुंदर होती रूपानं .अगदी सुधांशूला साजेशी.शहरात राहणारी .सुशिक्षित आई वडिलांची मुलगी होती ती.

  बोलाचाली झाली. काही ही देणं घेण्याशिवाय विवाह ठरला.आता तर राधा ला खूपच आनंद झाला होता.तिची सून ही डॉ.च होती.

लग्ना अगोदरच सुधांशू सोनाली बरोबर काही गोष्टी स्पष्टच बोलणार होता.गाव आणि आई ला सोडून कुठे ही जाणार नाही हे तिला त्यानं सांगितलं .तिला ही ते मान्य होतं.अखेर लग्न सोहळा पार पडला .आपले न पाहिलेले वडील, आजी आजोबा लग्नात नव्हते याचे दुःख सुधांशू ला खूप बोचत होते.लग्न होऊन सोनाली सासरी आली.शहरातली मुलगी अगदी शेतातल्या घरात आली होती.आता सोनाली ला इथे जुळवून घ्यायचं होतं.कारण शहरात जाण्याचे मार्ग आधीच बंद केलेले होते.सासर माहेर अशी ये जा झाली.राधा अन् सोनाली दोघी झाल्या होत्या कधी कधी सोनाली सुधांशू सोबत दवाखान्यात जात होती.राधा ही घर कामात व्यस्त होत होती.आता तिला कसला ही व्याप नव्हता .की जास्त कष्ट करायचे नव्हते.

पण राधाचं प्रारब्ध काही वेगळंच होतं.सोनालीला शेतातल्या घरात अन् गावातल्या दवाखान्यात करमेनासे झाले .सुधांशूकडे शहरात जायचा हट्ट करू लागली.सुधांशू हे कधीच करणार नव्हता.आईला सोडणार नव्हता.सोनाली माहेरी म्हणून गेली ती पुन्हा यायचं नाव घेत नव्हती.राधा ला कुठलीच कल्पना नव्हती.सहज म्हणून गेलेली सोनाली का येत नव्हती म्हणून सुधांशू ला विचारलं तेव्हा त्याने आईला सांगितलं .आईला पण घेऊन जाऊ म्हणते.राधा तर पुरतीच कोसळली.तिला सुधाकर च्या आठवणी सोडायच्या नव्हत्या.तिचे स्वप्न असे विरून गेले तर .तिला भीती वाटू लागली.नवा संसार सुरू होता होताच मोडला तर .म्हणून ती खूप अस्वस्थ झाली.आता तिलाच काही तरी करावं लागणार होतं.असं वादळ आपल्या मुलाच्या संसारात कसं येऊ देईल ती माऊली.

तीनं सुधांशू ला सोनालीला घेऊन यायला सांगितलं.आणि उद्याच जाऊन जवळच्या शहरात एक लहान सं घर बघ.मी ही येते तुमच्या बरोबर .माझी पण हौस होईल रे शहरात रहायची.आई तयार झाली म्हणून सुधाकर ने अखेर शहरात घर घेतले .तिथूनच तो गावी दवाखान्यात येऊ लागला.सगळे आता शहरात रहात होते.पण राधा ची घुसमट होत होती.तिला शहर नको होतं .फक्त पोराचा संसार सुखाचा बघायचा होता. पुढे पुढे सोनाली ला आता राधा ही नको वाटू लागली. तिचं वागणं बदललं.ते राधाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.आता तर ती पुरती कोलमडून पडली.काय करावं .सोडावं मुलाला पण आणि जावं निघून आपल्या जुन्या आठवणी च्या जगात.असा विचार करू लागली.अचानक एक दिवस सुधांशू ला सांगितलं मी जरा घराकडे जावून येते.शेतात जाऊन येते जरा. असं सांगून ती गेली ते पुन्हा शहराकडे न जाण्यासाठीच.

किती ती घुसमट आणि किती सावरायचं बाईनं.किती पिढ्यांना जोडून ठेवायचं बाईनं. तिचं अस्तित्व फक्त कर्तव्य करणे एवढच का असतं.असे एक ना अनेक विचार डोक्यात घेऊन ती झोपी गेली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy