Priyanka Shinde

Others

3.5  

Priyanka Shinde

Others

वेळेचे महत्त्व

वेळेचे महत्त्व

2 mins
86


      तसं जर बघायला गेलं तर निसर्गाचं गणितच खूप वेगळं आहे.चंद्राचं मावळणं आणि सूर्याचं उगवणं म्हणजे दिवसाची सुरुवात आणि सूर्याचं मावळणं आणि चंद्राचं उगवणं म्हणजेच रात्रीची सुरूवात... जो पर्यंत सूर्य आणि चंद्र आहेेत तोपर्यंत दिवस आणि रात्रीचा खेळ असाच सुरू राहील... असो, पण दिवस आणि रात्रीच्या खेेळाला पुर्णत्व आणलं ते माणसाने निर्माण केलेल्या घड्याळाने...


    हो... एक काळ असा होता कि सुर्य - चंद्राच्या उगवण्या आणि मावळण्यावरचं माणसाचं आयुष्य चालयचं... तो काळचं असा होता जिथे शिक्षण पद्धती नसल्याने माणसं अशिक्षित आणि अडाणी असायची आणि त्यांना ज्या - ज्या गोष्टी उमजायच्या त्यानुुुसार हळूहळू माणसाच्या आयुष्यात बदल होत गेेेेेले.आणि त्या - त्या बदलानुुसार माणसाचे आयुष्य चालत असे आणि मानवाची प्रगती ही होत असे...

    

आज माणूस हा खुप प्रगतीशील झाला आहे. आजचा माणूस हा विज्ञानाची कास धरून पुुढे जात आहे आणि म्हणूनच आजचं युग हे विज्ञान युग म्हणून संबोधलं जातं... आजच्या या युगात माणसाची खुप धावपळ होत आहे. आणि म्हणूनच कि काय पण आजच्या या युगात वेेेेळेला खुप महत्त्व आहे.


     आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असतं... कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेळ ही महत्त्वाचीच असते.माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक क्रिया, प्रत्येक काम हे वेळेवरचं अवलंबून असते.सकाळी उठल्यापासून प्रत्येक व्यक्ती ही आप-आपल्या वेेेेळा न चुकता पाळत असते.आणि ही वेळ दर्शवणारे साधन म्हणजेच घड्याळ... घड्याळामुळेेच कि काय आपल्या मानवजाती मध्ये एक काटेेेकोरपणा निर्माण झालेला आहे. घड्याळाच्या काट्याच्या फिरण्यावर माणसाची गती अवलंबून असते.


     घड्याळाचे काटे नेहमी उजवीकडून डावीकडे फिरतात. जस - जसं घड्याळाचा एक - एक काटा पुुुढे सरकत जातो तस - तसं हळूहळू वेेळ ही कमी होत जाते. दिवस आणि रात्रीचं हे चक्र कधीही न संपणारं आहे. पण या घड्याळामुळेच दिवस आणि रात्रीच्या या  चक्राला आणि माणसाच्या जगण्याला एक सोयीस्करपणा आला आहेे. आणि हा सोयीस्करपणा असाच कायम टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला घड्याळ आणि वेळ दोन्हीचे महत्त्व कळणं गरजेचं आहे.  


Rate this content
Log in