बाप
बाप
1 min
180
बाप माझा असे कसा
नित्य कष्टाची भाकरी
राब राब राबुनिया
चिल्या पिल्याते उद्धरी!!१!!
बाप माझा शेतकरी
संगे कष्टाची शिदोरी
शिळ्या भाकरीच्या सवे
जगा पोशिंतो श्रीहरी!!२!!
बाप माझा भाग्य माझे
घडवितो निर्विकारी
चुकल्यास तो ताडीतो
निर्हेतूक प्रेम करी!!३!!
बापा नकारे तयाशी
मारू जिवंत पणात
सेवा मेल्या वरी नको
पंच पक्वान्न ताटात!!४!!
तया अनाथाश्रमात
नका जाऊ देऊ कदा
तुम्हां कळेल त्यावेळी
जेव्हा व्हाल तुम्ही वृद्धा!!५!!
बाप दाखवी दुनिया
जेव्हा न दिसें तों देव
बाप तीर्थाचे माहेर
संतदासा तों सदैव!!६!!