Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SWATI WAKTE

Others

2.4  

SWATI WAKTE

Others

तुळशी विवाह

तुळशी विवाह

2 mins
104


हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी अंगणात तुळशी असावी. तुळशी अंगणात असणे हे मंगल्याचे पवित्र्याचे प्रतीक आहे., वरील कवितेतून मी तुळशीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला.आहे.

तुळशीचा विवाह कार्तिक महिन्यात विष्णुच्या शालिग्राम रूपात केला जातो. असे म्हटले जाते तुळशी विवाह करणाऱ्याच्या घरात सदैव सुख, समृद्धी शांती राहील. त्याची कथा अशी आहे जालनधर हा एक अत्यन्त पराक्रमी,क्रूर दैत्य होता. त्याच्या उपद्रवामुळे सर्व देव, देवता त्रस्त झाले होते. जालनधरची पत्नी वृंदा अत्यन्त पतीव्रता होती तिच्या पतीव्रत्यामुळे जालनधारचा पराभव करणे किंवा वध करणे अशक्य होते म्हणून देवतांनी भगवान विष्णुकडे धाव घेतली. जालनधारचा पराभव फक्त वृंदाचे पतिव्रत्य भंग झाल्यावरच शक्य होते. भगवान विष्णुने ऋषींचा अवतार धारण केला आणि दोन मायावी राक्षसच्या हातात जालनधरचे धड आणि शरीर देऊन वृंदाजवळ पाठवले ते बघून वृंदा अत्यन्त दुःखी झाली आणि तिने ऋषीं रूपातील विष्णुला प्रार्थना केली की तिच्या पतीचे प्राण परत द्या. विष्णुने धड आणि शरीराला जोडले आणि त्या शरीरात स्वतः प्रवेश केला आणि अश्या प्रकारे पती समजून वृंदा आनंदी झाली पण वृंदाचे पतीव्रत्य भंग झाल्यामुळे जालनधारचा पराभव करून वध करण्यात देवता यशस्वी झाले. ही गोष्ट कळल्यावर वृंदाने विष्णुला पाषाण हृदयी म्हणून श्राप दिला आणि म्हणाली भगवान विष्णू शालिग्राम दगड व्हाल. भगवान विष्णू तिला म्हणाले तुझ्या पतीव्रताचे फळ म्हणून तु तुळस बनून माझ्यासोबत शालिग्राम रूपात  राहशील आणि जे माझ्यासोबत तुझा कार्तिक महिन्यात विवाह लावतील त्यांना पुण्य मिळेल.  तसेच वृंदा पतीच्या चितेत पतीव्रता गेली आणि त्या ठिकाणी तुळशीचे रोप उगवले.तेव्हापासून तुळशीचे कृष्णासोबत कार्तिक महिन्यात विवाह लावण्याची प्रथा आहे.

तुळशीच्या मंजिरी आपण श्रीकृष्णाला अर्पण करतो तसेच देवाला नैवेद्य अर्पण करतांना त्यात तुळशीची पाने घालून अर्पण करतो. तुळशीला रोज प्रदक्षिणा मारणे, पाणी घालणे हेही हिंदू संस्कृतीत सांगितले आहे.अश्याप्रकारे अध्यात्मिक महत्व आहे.

तुळशी हार गळा कासे पितांबर

आवडे निरंतर हेची ध्यान

असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

 ह्या गोष्टीला वैज्ञानिक कारणे ही आहेत.

तुळशी असे रोपटे आहे जे दिवसातले वीस तास ऑक्सिजन सोडते आणि चार तास कार्बन डाय ऑक्साईड सोडते.त्यामुळे तुळशीच्या सानिध्यात राहिल्याने प्राणवायू मिळतो. तुळशी हार गळ्यात घातल्याने रक्तदाब वाढत नाही. तुळशी अंगणात असल्याने प्रदूषण कमी होते. तुळशीमध्ये कॅलसिअम, झिंक व्हिटॅमिन सी, आयर्न ही जीवनाश्यक तत्वे असतात. तुळशीची पाने खाणे मेंदूसाठी चांगले आहे. तुळशीच्या पानाचा काढा खोकला सर्दीसाठी रामबाण उपाय आहे. तुळशीच्या पानाचा रस लावल्याने त्वचा आणि केस चांगले राहतात. तसेच नायटा आणि इतर त्वचा रोगावर तुळशीच्या पानाचा रस रामबाण उपाय आहे.तुळशीच्या पानाचा चहा पिल्याने किंवा गरम पाण्यात तुळशीची पाने उकळून पिल्याने चयापयाची प्रक्रिया चांगली होते तसेच वजन कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या पानाचा रस ताप, दमा ह्यासाठीही उपयुक्त आहे..

अश्या प्रकारे ही बहुगुणी तुळशी प्रत्येकाच्या घरी हिंदू संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे असायलाच पाहिजे.


Rate this content
Log in