SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

बकेट लिस्ट (चित्रपट)

बकेट लिस्ट (चित्रपट)

4 mins
137


बकेट लिस्ट हा चित्रपट मी बघितला . त्यात माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन च्या भूमिका आहेत. सुरवातीलाच दाखविले की मधुरा साने जी 41 वर्षाची गृहिणी आहे तिची l हार्ट ट्रान्सप्लांट ची सर्जेरी आहे. तिला तिच्या सर्जरीची थोडेही चिंता नसते. तिला चिंता असते की ती घरी नसताना घरात काय होईल? ती ऑपरेशन थिएटर मध्ये असतांना डॉक्टर ला म्हणते की मला नवऱ्याशी बोलायचे आहे मी बाहेर जाते, नाही तर त्याला आत बोलवा डॉक्टर परमिशन देत नाही मग ती डॉक्टर ना म्हणते की मी सांगते तसेच्या तसे लिहून घ्या आणि माझ्या नवऱ्याला सांगा. ती तिच्या गैरहजेरीत घरात काय करायला पाहिजे ह्याची लिस्ट सांगते. डॉक्टरला आश्यर्य वाटते की ही बाई मरणाच्या दारात उभी असताना देखील स्वतः पेक्षा घरच्यांची काळजी करते..नंतर दोन महिन्यानंतर मधुरा थोडी बरी होते तेव्हा आपली हार्ट सर्जरी झाली हे विसरून घर सांभाळण्यात रमते. प्रत्येकाच्या आवडीनुसार स्वयंपाक करते तेव्हा परत काही तरी त्रास होतो म्हणून डॉक्टर कडे जाते. तेव्हा डॉक्टर तिला म्हणतात की तुझी हार्ट सर्जरी झाली हे विसरून चालणार नाही हे हार्ट फार फार तर 7 ते 8वर्ष काम करेल तेव्हा ती हिशोब लावते की सात आठ वर्षात मुले किती मोठी होतील. ह्याचा हिशोब लावते. तेव्हा ती म्हणते की निदान दहा वर्ष तरी जगली पाहिजे म्हणजे मुले सेटल होतील. तेव्हा डॉक्टर म्हणतात कदाचित जास्त ही जगू शकशील कारण तुझी डोनर यंग होती हे ऐकून ती जाणून घेण्याचा प्रयत्न करते की यंग डोनर कोण असेल कुणामुळे मला नवीन आयुष्य मिळाले. मग तिला समजते एक वीस वर्षाची मुलगी तिची डोनर आहे.मधुरा तिच्या घरी जाते तेव्हा ती सईचा भाऊ दरवाजा उघडतो. ती जेव्हा त्याला सांगते सई तिची हार्ट डोनर आहे आणि तिच्या मुळे तिला नवीन आयुष्य मिळाला. तेव्हा त्याला तिचा अधिकच राग येतो. आणि तो घरी कुणी नाही म्हणून सांगतो पण सईचे आईबाबा तिला घरात बोलावतात आणि सांगतात की तिने आठ लोकांना नवीन आयुष्य वेगवेगळे ऑर्गन दान करून दिले. ती जरी जगात नसली तरी तिच्या मुळे जीवन दान मिळालेल्या लोकांमुळे तिचे अस्तित्व आहे. तिचे आई बाबा सांगतात की ती मित्र मैत्रिणीसोबत दापोली ला जाणार होती आणि तिची बकेट लिस्ट वाचणार होती तेव्हा मधुरा दापोली ला जाण्याचा निर्णय घेते. दापोलीला जाते तेव्हा सईचा भाऊ सईची ती बकेट लिस्ट फेकणार असतो पण ती बकेट लिस्ट मधुरा घेते आणि ती पूर्ण करण्याचा निर्णय घेते. सईच्या मैत्रिणी तिला सांगतात की 21 वर्षाची होण्याच्या आत तिला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या पण ती आधीच गेली आणि तिची बकेट लिस्ट अपूर्णच राहिली. तेव्हा मधुरा निर्णय घेते की तिची बकेट लिस्ट 21व्या वाढदिवसाच्या आधीच पूर्ण करायचे. मधुरा अतिशय पुरातनवादी स्त्री असते पण तिची ती बकेट लिस्ट ज्यात सईने हार्डली डेव्हिड सन शिकून शर्यत जिंकण्याची, पब मध्ये जाऊन ड्रिंक घेण्याची, अरेस्ट होण्याची, स्टेज फिअर असतांना स्टेज वर डान्स करण्याची, वायरल होण्याची  ह्यासारख्या इच्छा पूर्ण करते.आणि हे करत असताना घरच्यांचा विरोध पत्करते पण जिद्दीने बकेट लिस्ट पूर्ण करते..मधुराचे खुप नाव होते आणि वृत्तपत्र ही तिची दखल घेतात. हे चालू असतांना मधुराच्या पतीला अमेरिकेची ऑफर येते. ते सर्व जाण्यासाठी तयार होतात पण आयुष्यात पहिल्यांदा मधुरा स्वतःच्या मनाचे ऐकते आणि नाही म्हणते तेव्हा ती पतीला सांगते की आता पर्यंत माझी ओळख कुणाची पत्नी, कुणाची आई, कुणाची तरी सून म्हणून होती पण माझे स्वतः चे अस्तित्वच नव्हते पण सई ची बकेट लिस्ट पूर्ण करताना मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. आणि आधी मी नव्हते आणि काही तक्रार ही नव्हती आणि जे आयुष्य जगले त्याबद्दल अजिबात तक्रार नाही पण आता मला माझे अस्तित्व जपायचे आहे माझे आयुष्य आता थोडेच शिल्लक आहे आणि ते भरभरून जगायचे आहे. तिचा पती एकटाच अमेरिकेत निघून जातो व सईच्या वाढदिवसाला तोही परत येतो व तिच्या साठी भारतातच राहण्याचा निर्णय घेतो. 

एकंदरीत कथानक चांगले आहे सर्व गृहिणी साधारणतः अश्याच असतात घरच्यांसाठी स्वतःचे अस्तित्व विसरतात पण ह्या चित्रपट बघून त्यांना जाणीव झाली असेल की स्वतः चे आयुष्यही तेव्हडेच महत्वाचे आहे. 

चित्रपट बघताना काही गोष्टी खटकतात जसे 20वर्षाच्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुरा धडपडते पण स्वतःच्या मुलीला शॉर्ट ड्रेस घालायला विरोध करते शेवटी ती परवानगी देते पण सुरवातीला जेव्हा ती सईचे आयुष्य जगते तेव्हा नाही म्हणते. आणि जेव्हा मधुरा पब मध्ये जाऊन सईची इच्छा पूर्ण करते तो सीन चांगला बनवता आला असता पण तो खुपच रटाळ वा ना बनविला. कथानक चांगले असून खिळवून ठेवणारे नाही वाटले. 

माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन सारखे कलाकार असताना त्यांच्या भूमिकेला अजून वाव मिळाला तर चांगले वाटले असते. दर्शकांच्या जास्त अपेक्षा ह्या चित्रपटाकडून होत्या पण त्या पूर्णत्वास आल्या नाहीत.. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational