Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#Pen It Down

SEE WINNERS

Share with friends


फक्त आणि फक्त तुमच्यासाठीची विशेष लेखन स्पर्धा

तुमच्या आत खोलवर एक स्फुल्लिंग – ‘लेखनाचे’ स्फुल्लिंग दडलेले आहे हे आम्हाला ठाऊक आहे. चला तर सज्ज व्हा आणि विशेष करून तुमच्यासाठीच्या या स्पर्धेचा भाग बनून तुमचे विचार तुमच्या लेखणीतून कागदावर उतरू द्या. यामुळे तुम्हाला स्टोरी मिररच्या लाखो वाचकांपर्यंत पोचण्याची संधी मिळणार आहेच पण त्यासोबतच तुम्हाला आकर्षक बक्षीसे जिंकण्याचीही संधी मिळू शकते.

आणि हो, हे तिथेच संपत नाही. यातील निवडक लेखन स्टोरी मिररच्या ई-बुकमध्ये प्रकाशित करण्यात येईल.

तर मग वाट कसली पाहताय? तुमचे लेखन कौशल्य आणि शब्दांची जादू जगाला दाखवण्यासाठी त्वरा करा.


नियम आणि अटी:

  1. स्टोरी मिररवर आजवर पाच किंवा त्याहून कमी कन्टेन्ट प्रकाशित केलेल्या लेखकांसाठीच खुली आहे.
  2. यासाठी शब्दांची मर्यादा नाही.
  3. सर्व सबमिशन्स  contest.storymirror.com येथे सबमिट करावे लागतील अन्यथा ते पात्र ठरणार नाहीत.
  4. लेखनप्रकाराबाबतही कोणतेही बंधन नाही.
  5. लेख/निबंध सबमिट करण्याची परवानगी नाही.
  6. सहभागींनी त्यांच्या मूळ कविता किंवा कथा सबमिट कराव्यात.
  7. https://storymirror.com येथे आधीच सबमिट केलेल्या कथा आणि कविता पुन्हा सबमिट करू नयेत.
  8. स्टोरी मिररचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागींवर बंधनकारक राहील.

 

बक्षीसे

1.सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

2.लेखकांना खालीलप्रमाणे स्टोरी मिररचे व्हाऊचर्स देण्यात येतील. यांचा वापर https://shop.storymirror.com येथून पुस्तके खरेदी करण्यासाठी करता येईल.

  • किमान 3 कन्टेन्ट सबमिट करा आणि रूपये 100 चे व्हाऊचर मिळवा.
  • किमान 5 कन्टेन्ट सबमिट करा आणि रूपये 200 चे व्हाऊचर मिळवा.
  • किमान 7 कन्टेन्ट सबमिट करा आणि रूपये 300 चे व्हाऊचर मिळवा.
  • किमान 10 कन्टेन्ट सबमिट करा आणि रूपये 500 चे व्हाऊचर मिळवा.

3.किमान 15 किंवा त्याहून अधिक कन्टेन्ट सबमिट करणाऱ्या सर्व लेखकांना सन्मानचिन्ह देण्यात येईल.

4.प्रत्येक भाषेतील सर्वोत्कृष्ट 30 कथा आणि कविता ई-बुकमध्ये प्रकाशित करण्यात येतील.

 

कन्टेन्टचे विभाग

  • कथा
  • कविता

 

भाषा

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, बंगाली

 

कालावधी

स्पर्धेचा कालावधी – 15 फेब्रुवारी 2020 ते 15 मार्च 2020

निकाल – एप्रिल 2020

प्रतिक्रिया आणि शंकांच्या समाधानासाठी संपर्क

इ मेल – admin@storymirror.com

फोन नं. - 022-49240082 / 022-49243888 (सोमवार ते शुक्रवार आणि दुसऱ्या, चौथ्या व पाचव्या शनिवारी) सकाळी 10.00 ते सायं. 7.00

व्हाट्सअपः +91-8452804735