Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kusum chaudhary

Others

4  

kusum chaudhary

Others

अंत:करणातील शब्द

अंत:करणातील शब्द

1 min
355


जेव्हा जीव तुटतो तीळतीळ

स्फुरतात शब्द अंत:करणी.

अंत:करणातील शब्दांनीच

होते काळजाचे पाणी पाणी.


स्वराज्याची गर्जना करुनी

दिली टिळकांनी ललकारी.

अंत:करणातील शब्दांनीच

झुंजले मराठा नि केसरी.


अंत:करणातील शब्दांनीच

 रचला इतिहास शिवबांनी

गांधींच्या चलेजाव शब्दानेच 

भारत देश सोडला इंग्रजांनी.


 अंत:करणातील शब्दांनीच

 मनात जागविली संवेदना.

 माणसात देव पाहून बाबांनी

जाणली कुष्ठरोग्यांची वेदना.


अंत:करणातील शब्दांनीच

 जागेल मनात नवचैतन्य.

सारे करूया साहित्याची सेवा

होईल जगात भारतमाता धन्य 


Rate this content
Log in