Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract Others

3  

Sarika Jinturkar

Abstract Others

बाकी आयुष्य आहे

बाकी आयुष्य आहे

1 min
3


सुख असता आनंदाने हसायच

दुःखात मनसोक्त रडायच

 सुखदुःखाच्या झुल्यावर झुलायच

 प्राप्त गोष्टीत समाधानी असायच 

 बाकी आयुष्य आहे चालायच 


थोडे मनासारखे 

बरेच मनाविरुद्ध 

काही क्षण उत्सवाचे 

काही दिवस नैराश्याचे

 ध्येयाने सार झेलायच  

बाकी आयुष्य आहे चालायच 


भूतकाळ बदलता येत नाही भविष्य सावरता येत नाही

वर्तमानाला दोघांमध्ये तोलायच बाकी आयुष्य आहे चालायच 


येणाऱ्याचे स्वागत

 जाणाऱ्याला मात्र जड अंतकरणाने पाहायच 

गेलेल्या क्षणांना मोकळ

 करून हातातल्या क्षणांना भरभरून जगायच  

 बाकी आयुष्य आहे चालायच 


कोणी निंदा, कोणी वंदा

 ज्याचा त्याचा असतो धंदा 

आपण मात्र त्या क्षणात 

 सुख लुटून घ्यायच 

फुलवून मनाचा सुंदर पिसारा 

उंच आकाशात उडायच  

बाकी आयुष्य आहे चालायच 


काही सोबती मिळतील 

काही आपलेच छळतील 

हसत -हसत सार काही पेलायच 

 सल्ला देण अगदी सोप

 अमलात आणण खूप कठीण 

निसर्गाच भान ठेवून 

भावनांना आपल्या जपत मनातील मळभ सार

 कवितेत ओतत रहायच

बाकी आयुष्य आहे चालायच..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract