Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SURESH SARGAR

Abstract Tragedy

3  

SURESH SARGAR

Abstract Tragedy

बदलतोय भारत

बदलतोय भारत

1 min
219


खरंच भारतात बदल घडतोय

गुन्हेगार मोकाट फिरतोय

जनतेमध्ये स्फोट करणारा

आरोपी आजही तुरुंगात

व्ही.आय.पी.सेवा कसा काय उपभोगतोय

इतर सामान्य गुन्हेगार प्रमाणे

त्या आरोपींना सुध्दा शिक्षा द्यायला

तुरुंग अधिकारी कसा काय विसरतोय

खरंच भारतात बदल घडतोय


प्रामाणिक पोलीस अधिकारी सुद्धा

दहशतवाद्यांकडून मारला जातोय

त्याच्या 'ए.टी.एस.'तर्फे शोधलेले संशयित

गुन्हेगार 'एन. आय. ए.' ला अमान्य वाटतोय

'ए. टी.एस.' चा गुन्हेगार

'एन. आय. ए.'चा पुरावा सुध्दा

कसा काय खोटा ठरतोय

होय, भारतात बदल घडतोय


अवैध्य कामांना चाप लावणारा

भ्रष्टाचाराला रोखणारा जनतेच्या

सुधारणेसाठी प्रामाणिक पणे

 काम करणारा अधिकारी

लोकप्रतिनिधी कडून अविश्वास पात्र ठरतोय

    संसदेतील अधिवेशनातील

     घोळ कुठे मिटतोय

प्रत्येक अधिवेशनात गदारोळ असतोय

जे सत्तेत होते तो विरोधी बाकावर

विरोधी बाकावरील सत्तेत बसतोय

  घोषणांचा पाऊसच पडतोय

 अंमलबजावणीचा दुष्काळ कुठे हटतोय

होय भारत बदलतोय


देश म्हणजे घर आहे. घराला सावरणार

कुटुंब प्रमुख घरावरील कारवाईकडे

  कसा काय ऐवढे दुर्लक्ष करतोय

लोकांपुढे अतिरेकी गुंड यांच्यावर

कारवाईचा ढोंगीपणा दाखवतोय

स्वतःच मात्र बॉम्बस्फोट करण्याच्या

   कारवाईत सहभागी असतोय

तो आज ही 'व्ही.आय.पी'.सेवा उपभोगतोय

     खरंच हिंदुस्थानात बदल घडतोय


    समाजाने मोठा केलेला माणूस

मद्यधुंद अवस्थेत रस्तावरील माणसे चिरडतोय

समाजाला चिरडलेल दुःख कसा काय विसरतोय

  हा माणूस पैसा दाबून न्यायालयातून

     निर्दोष कसा काय सुटतोय

त्या कुटुंबाला पैशाने कुठे सुख विकत

      घेऊन देऊ शकतोय

समाजाचा चाहता असणारा समाज चिरडतोय

होय, खरंच. ..भारतात बदल घडतोय  

होय, भारत बदलतोय



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract