बेरोजगार.....
बेरोजगार.....
सोनं विकुन पिकं पेरलं
कर्जाने चारी बाजूने घेरलं
माझे क्षण झालेत गार....
मिळेनात जगण्याचे सारं
मी झालो आज बेरोजगार....
पाऊस पडेना माझं काळरानं
कशी भागेल पोटाची तहान
काळी माती करेना हिरवा शृंगार....
विहीर आटली दुःख दाटली
देवाने माझी भूक का छाटली
काय करू मिळेना रोजगार....
संगमचं राहील उपाशी पोट
सरकारच्या का मनात खोट
कष्ट करीन मी शेतीचा तलपगार....